निंबोळी पावडरचे शेतीमधील कार्य

0

 निंबोळी पावडरचे शेतीमधील कार्य


निंबोळी पावडर



निंबोळी पावडर मध्ये ‘अॅझाडीरेक्टीन’ घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कीटकोश, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते.

 निंबोळी पावडर  हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही.

निंबोळी पावडर  हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतां मधील नत्र टिकून राहते.

निंबोळी पावडर  पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.

 निंबोळी पावडर  मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.

 निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चीटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच माती मधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढरया मुळांची वाढ होण्यास मदत होते.

 निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी उत्पादन व गुणवत्ता वाढते.

निंबोळी पावडरच्या वापराचे प्रमाण –

सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी 200 किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे.

फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास 500 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेण खतासोबत द्यावे.

सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक इ. सर्व शेती प्रकारामध्ये वापराकरिता पूर्ण सुरक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »