तीळ पिक लागवड

0

महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे मिश्रपिक  म्हणूनही तिळाची लागवड केली जाते. तिळाचा मुख्य उपयोग खाद्यतेंप्ल तयार करण्यासाठी केला जातो. कारण ब्रियांमध्ये ४५ ते ५० टक्के तेलाचे प्रमाण असते. तिळाचा साबण, रंग, वनस्पती तूप, औषधी तेल व सुगंधी तेल तयार करण्यासाठीही उपयोग होतो.तिळापासून चटणी व तिळगुळही तयार केला जातो. तिळापासून स्निग्ध पदार्थ मिळतात. भारतातील लोकांचे सरासरी तेल खाण्याचे प्रमाण इतर देशांच्या मानाने मात्र कमी आहे. त्यामुळे तिळाचे उत्पादन वाढवणे ही देशाची गरज आहे. त्यासाठी योग्य जातींची निवड करणे, वेळेवर पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन, तिळाची काढ्णी योग्य अवस्थेत करणे यासारख्या तंत्राचा वापर करून तिळाची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात होत असलेल्या

तीळ,तीळ पिक लागवड,तीळ पिक लागवड,तीळ लागवड,तीळ लागवड माहिती,तीळ लागवड माहिती मराठी,उन्हाळी तीळ लागवड माहिती,उन्हाळी तीळ सुधारित लागवड तंत्रज्ञान,तीळ लागवड पद्धत,पावसाळी तीळ लागवड,तीळ लागवड जाती,उन्हाळी तीळ लागवड,तीळ लागवड कशी करावी,खरीप तीळ लागवड,तीळ,उन्हाळी तीळ लागवड माहिती मराठी,तीळ पीक लागवड करणे,तिळाची लागवड कधी करावी,तीळ पीक लागवड तंत्रज्ञान,तीळ लागवड कधी करावी,तिळाची लागवड कशी करावी,उन्हाळी तीळ लागवड,तीळ रबी,तिळाची लागवड,तीळ खरीप



 तैलाची आयात करणे थांबेल व सर्वसामान्यांच्या आहारातील तैलाचे प्रमाणही वाढेल.



हवामान

बियांच्या चांगल्या उगवणीसाठी दैनंदिन किमान तापमान १५ अंश सें.ग्रॅ.तर कायेिक वाढीसाठी २१ते २६ अंश सें.ग्रे. व फलधारणेसाठी २६ तें १२ अंश सें.ग्रे. तापमान लागतें. याशिवाय रात्री श्रृंड हवा आवश्यक असतें.

जमीन

रेताळ व विम्लयुक्त जमीन सोडल्यास पाण्याचा उत्तम निचरा होणा-या सर्व प्रकारच्या जमिनीत तिळाचे पैिक घेता येते.

पूर्वमशागत



तिळाचे मुळ हे सोट्मुळ या प्रकारचे असल्यामुळे ते ६0 ते ९0 सें.मी. खोल जात असून त्याला बुंध्याजवळ तंतुमय मुळे फुटून जमिनीवर पसरतात. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत पण टाळूवर थोडीशी टणक जमीन तयार करावी. त्यामुहे तिळाची उगवण जोमाने होण्यास मदत होते. म्हणून तीळ पिकासाठी जमिनीची मशागत करताना नांगस्ट करू नये. यासाठी एक ते दोन वेळा कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीनंतर किंवा तीळाच्या पेरणीपूर्वी फळी फिरवावी. जीमन तयार करताना चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.

ब्रियाणे व पेरणी

उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पूर्ण करावी. पेरणीला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळेला मान्सूनपूर्व पावसात सापडण्याची भिती असते. सलग पीक घेताना ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवून पेरणी तिफणीने करावी. उन्हाळी हंगामाकरीता प्रती हेक्टर ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी करताना बियाण्यात बारीक वाळू राख किंवा चाळलेले शेणखत मिसळावे म्हणजे बी दाट न पडता सारख्या अंतरावर पडेल. पेरणीपूर्वी बियाण्यास १ ग्रॅम कार्बन्डॅझिम तसेच ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावों.

सुधारित जाती



उन्हाळी हंगामाकरीता एकेटी-१o१ व एनटी-११-११ या जातीची निवड करावी. या जातीचे गुणधर्म म्हणजे ही जात ९० ते ६५ दिवसांत पक्व होते. दाण्याचा रंग पांढरा आहे. तैलाचे प्रमाण ४८ ते ४९ टक्के असून उत्पादन प्रती हेक्टरी ८ किंवष्ट्ल मिळते.

आंतरमशागत



पेरणीनंतर ७ ते ८ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली व ८ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपांत १५ सें.मी. अंतर ठेवावे. आवश्यकतेनुसार २ ते १ कोळपण्या देऊन २ ते ३ वेळा नेिंदणी करून शेत स्वच्छ ठेवावे. 


खत व्यवस्थापन

पेरणीपूर्वी हेक्टरी १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत द्यावे. माती परीक्षणानुसार पॅरणीच्या वेळेस प्रती हेक्टरी १२.५ किलो नत्र आणि २५ किलो स्फुरद द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता १२.५ केिलो पेरणीनंतर १o दिवसांनी द्यावा.

पाणी व्यवस्थापन

उन्हाळी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसांनी ओलीत करावे. फुलोन्यास सुरूवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ऑलीत द्यावे. मात्र अति पाणीपुरवठा हा वजनात उतार, तेल उतायात घट व विविध बुरशीजन्य रोगासकारणीभूत ठरतो .

पीक संरक्षण



तिळावर मावा, तुड्तुडे, पाने खाणरी अळी व गांधमाशी या प्रामुख्याने आढ्ळणा-या किडी आहेत. यांच्या बंदोबस्तासाठी क्विनंॉलफॉस २५ ई.सी. १000 मि.ली. ५00 लीटर पाण्यातून फवारावे. पानांवरील ठिपक्यांच्या बंदोबस्तासाठी काँपर ऑक्सिक्लोराईड १२५0 ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ हे रोगनाशक १२५० ग्रॅम ५00 लीटर पाण्यात मिसळून फवाणी करावी.

पीक पक्वता  व काढणी

ज्यावेळी पानांचा रंग पिवळा होऊन पाने गळू लागतात, बोंडाचा रंग पिवळसर होतो त्या वेळी पीक काष्ठ्ठणीस योग्य आहे. असे समजावे. काढणीस उशीर झाल्यास उन्हामुळे बोंडे फुठून तीळ गळून पडण्याचा संभव असतो. तर काढणी लवकर झाल्यास दाणे बारीक व कापलेल्या झाडांच्या पेंढ्या उभ्या करून ठेवाव्यात. तीळ चांगले वाळल्यानंतर पेंढ्या कापडावर किंवा ताडपत्रीवर उलट्या करून झटकून तीळ वेगळे करावेत व उन्हात नीट वाळवून नंतर त्याची साठवणूक करावी. उत्पादन : सलग पिकाचे दर हेक्टरी उत्पादन जमिनीच्या मगदुराप्रमाणे व जातीनुसार ६ ते ७ क्विंटल  प्रती हेक्टर येते

source : Maharashtra Gov

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »