चांदवड तालुक्यातील हजारो क्विंटल कांदा सडला

0

 चांदवड (दशरथ ठोंबरे):–  रब्बी हंगामातील पहिल्या टप्प्यातील लागवड केलेला कांदा पीकाला मागील आठवड्यातील आवकाळी पावसाने चांगलेच जोडपल्याने. व सततच्या खराब वातावरणामुळे तालुकयातील शेतकरयाचा शेतातील काढणी आलेल्या कांदा पीक शेतात सडल्याने. शेतातील हजारो क्विंटल कांदा सडल्याचे चित्र चांदवड तालुकयात पाहवयास मिळत आहे.  कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाणारे चांदवड तालुक्यात पोळ कांदयाच्या हंगामाच्या सुरुवातीलाथोडी आस दिली परतु पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावल्याने शेतकरयानी जुलै अखेर आँगस्ट सुरुवातीस  पहील्या टप्यातील पोळ कांदा ची लागवड  डोगंरपट्यातील हरसुल, हरसुल ,दुगाव कोकणखेडे,  निमोण, दरेगाव, डोणगाव, वाद वराडी, आसरखेडे, मंगरूळ, मतेवाडी ,देणेवाडी ,शिंगवे, मेसंखेडे ,सुतारखेडे, करदळे, डोणगाव, राहुड, उसवाड राजदेरवाडी ,वडबारे ,नांदूर टेक ,आदि भागातील शेतकरयानी मोठ्या प्रमाणात केली होती.  परतु मागीलआठवडयातील आवकाळी पावसाने तालुकयात  घातलेला दुमाकुळ व सततची खराब हवामानाचा फटका या कांदा पीकाला मोठ्या प्रमाणात बसल्याने आज हे कांदा पीक शेतात काढणीला वेग आला असला तरी.बहुतांशी कांदा शेतातच सडल्याने शेतकरयाचे मोठे नुकसान झाले पाहवयास मिळत आहे. तसेच पोळ कांदयाचे एकरी सरासरी 50ते 60क्विंटल कांदाचे उत्पादन शेतकरयाना मिळने अपेक्षीत होते परतु आत्ता काढणे आलेला कांदा सडलेल्या अवस्थेत शेतकऱ्याच्या हातात पडत असल्याने एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन शेतकरयाच्या हाती लागत आहे यामुळे बाजारभाव वाढीव असले तरी हि  अतिवृष्टिच्या बसलेला फटकयामुळे सततचे राहणारे खराब हवामान यामुळेकांदा पीकावरी खर्चाचा अलेख वाढतच गेल्याने शेतकरयाचे  उत्पादन खर्च वजा जाता तोटयाचे गणित मिळत असल्याचे व्यक्त होत आहे  .                                   तालुकयातील डोगरपट्यातील शेतकयाच्या कांदा हा चांगल्या प्रतीचा निर्यात क्षम असल्याने वाशी, दिल्ली, अहमदाबाद, इदोर, बडोतरा, आदी बाजार पेठेत या कांदाला मागणी असुनही शेतकरयाकडुन पुरवढा होत नसल्याची खंत शेतकरयाकडुन व्यक्त होत आहे. मागील तीन ते चार वर्षापुर्वी या बाजार पेठेत तालुकयाच्या डोगरपट्यातुन दररोज सुमारे पन्नास ते साठ ट्रक शेतकरी विक्रीसाठी नेत असे या वर्षी पावसाने कांदा पीक संडल्याने मागणी असुनही पुरवठा होत नाही.शेतकरयाकडुन बोलले जात आहे.शेतात सडलेेेेल्या कांदयामुळे शेतकरयाचे मोठे नुकसान झाल्याने बाजार पेठेना पाहीजे त्या प्रमाणात आजही शेतकरयाकडुन कांदाचा पाहिजे त्याप्रमाणात पुरवढा होत नाही.  प्रतिक्रिया:–पोळ कांदा पीकाला सततची अतिवृष्टि व परतीच्या पावसाचा  कांदापीकाला फटका बसल्याने माझ्या शेतात काढणी आलेला कांदा 50टक्केपेक्षा जास्त प्रमाणात संडल्याने एकरी15ते 20क्विटल कांदयाचे उत्पादन हाती येत आहे  .खराब हवामानामुळे कांदापीकाचा खर्च जास्त झाल्याने बाजार भाव जास्त असले तरी उत्पादन खर्च वजा जाता तोटयाचे आजही गणित मिळत आहे    :-खंडेराव पेंढारी( शेतकरी हरणुल )  

आवकाळी पावसाने तालुकयातील हजरी लावल्याने कांदा पीक शेतातुन काढणी अवस्थेला पुर्ण पणे सडुन गेल्याने माझ्या एक ऐकर क्षेत्रातील कांदयाचे नुकसान झाल्याने पुर्ण कांदापीक ट्रैक्टर साहयाने रोटर फिरवीला :—सुनिल गांगुर्डे (शेतकरी दिघवद)    

फोटो:–चांदवड तालुकयातील कांदा मोठया प्रमाणात सडल्याचे दाखवताना हरणुल येथीलखंडेराव पेंढारी शेतकरी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »