सोयाबीन लागवड

0

सोयाबीन लागवड
सोयाबीन लागवड,सोयाबीन लागवड कशी करावी,सोयाबीन लागवड माहिती,सोयाबीन लागवड पद्धत,सोयाबीन लागवड यशोगाथा,सोयाबीन लागवड कालावधी,उन्हाळी सोयाबीन लागवड,सोयाबीन लागवड तंत्रज्ञान,सोयाबीन लागवड विषयी माहिती,सोयाबीन पिकाची लागवड,सोयाबीन लागवड तंत्र,सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती,सोयाबीन पिकाची लागवड कशी करावी,सोयाबीन लागवड pdf,सोयाबीन लागवड अंतर,सोयाबीन पिकाची माहिती,सोयाबीन पिकाचे नियोजन,सोयाबीन,सोयाबीन फवारणी औषध,सोयाबीन वाण,सोयाबीन पिक लागवड,सोयाबीन पीक लागवड,सोयाबीन लागवड कशी करायची,सोयाबीन च्या जाती
सोयाबीन हे महत्वाचे पीक ठरतेय. जमीनिची सुपिकता वाढवन्या सोबत उत्तम नफा मिळवून देणारे पीक अशी सोयाबिनची ओळख आहे. पण आपली सरसरी उत्पादकता खूप कमी म्हणजे साधारण पणे ९०० ते १८५० किलो प्रति हेक्टर इतकी आहे. याच्या वाढीसाठी सुधारीत तंत्र वापरन्याची आवश्यकता आहे.
सोयाबीन पिकाकरीता लागणारी जमिन –
१) लागवडीसाठी मध्यम ते भारी, लालसर, गाळाची किंवा पोयट्याची जमीन योग्य असते.


२) भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी
३) पिकाच्या उत्तम वाढीसाठी खोल जमीन, मोकळ्या हवेची, अधिक पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली,उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली जमीन योग्य असते.
४) चोपण व क्षारपड जमिन वापरू नये
५) पुर्वी सुर्यफुल घेतलेले शेत वापरू नये
६) जमिन मे महिन्यात नांगरट केलेली उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ असावी.
७) जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यत असलेली निवडावी.
८) एकदम हलक्या मुरमाड जमिनी या पिकास योग्य नसतात.
९) कुळवाची शेवटची पाळी देण्यापूर्वी शेतात हेक्‍टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.
१०) त्याप्रमाणे शेतातील अगोदरची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ ठेवावे.
११) जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबिनचे पीक घेवू नये.
१२) नांगरणी नंतर वखराच्या पाळ्या देवून जमीन समपातळीत करावी.
१३) पेरणी करावयाच्या क्षेत्राची माती परिक्षण करुण घ्यावे.
१४) सरीवर पेरणीसाठी २.५ ते ३ फुटांवर सऱ्या पाडाव्यात.
१५) पेरणी करतानाच १५ किलो फोरेट प्रति हेक्टर दिल्यास खोडमाशी व चक्री भूंग्याचे नियंत्रण उत्तम होते.
१६) रोग नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी.
इत्यादि.


योग्य बियाणे वाण निवड:

NRC soyabin website वर ७० पेक्षा अधिक वाणांची माहिती दिली आहे पण आपल्या भागासाठी शिफारशीत करण्यात आलेल्या अधिक उत्पन्न,रोग प्रतिकारक शक्ति, अल्प-दिर्घ कालावधी इत्यादि बाबींचा विचार करुण ४ वाणांची निवड अंतिम करावी. त्या नुसार बियाणे उप्लब्धतेचे नियोजन करावे.
विभागनिहाय शिफारशीत सोयाबीनचे सुधारित वाण

मराठवाडा :
एमएयूएस ७१, एमएयूएस ८१, एमयूएस १५८, एमएयूएस ४७, एमएयूएस ६१, एमएयुएस ६१-२ आणि जेएस ३३५.

विदर्भ :
टीएएमएस ३७, टीएएमएस ९८-२१, एमएयूएस ७१, एमएयूएस ८१ आणि जेएस ३३५

पश्‍चिम महाराष्ट्र :
डीएस २२८ (फुले कल्याणी), एमएसीएस ५८, एमएसीएस ४५० आणि जेएस ३३५.इत्यादि सुधारित वाणांची निवड करावी. तसेच जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍वविद्यालयाने विकसित केलेल्या जेएस ३३५, जेएस ९३-०५, जेएस ९७-५२, जेएस ९५-६० आणि इंदूर येथील सोयाबीन संचालनालयाने विकसित केलेल्या एनआरसी ३७ या पैकी किंवा ईतर आपणास योग्य वाटनार्या वाणाची निवड करावी.
*या* *वर्षी* *सुधा* *सोयाबीन* *बियन्याचा* *मोठा* *तूटवड़ा* *आहे* *, त्यामुळे* *वेळीच* *तैयारी* *करा*

घरचे सोयाबीन बियाणे वापर:

सोयाबीन हे स्‍वपरागसिंचीत पीक असुन पेरलेल्‍या वाणाचे गुणधर्म व त्‍यापासुन उत्‍पादीत सोयाबीन बियाणे यामध्‍ये अधिक तफावत आढळत नाही. सोयाबीन पीकाच्‍या लागवडीमध्‍ये वापरण्‍यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्‍याने बियाणे प्रत्‍येक वर्षी बदलण्‍याची गरज नसते. एकदा प्रमाणित बियाणे पेरल्‍यानंतर त्‍यापासुन उत्‍पादीत बियाणे सतत तीन वर्षापर्यंत वापरता येते. यासाठी शेतक-यांनी विविध कंपनीचे बाजारात विक्रीसाठी आलेले बियाण्‍याचा आग्रह न धरता स्‍वत:कडील बियाणे वापरावे. याच बरोबर आपल्‍या घरचे बियाणे वापरल्‍यामुळे बियाणे खर्चात बचत करता येईल. यासाठी शेतक-यांनी खरीप हंगामासाठी आपल्‍या शेतामध्‍ये गेल्‍यावर्षी प्रमाणित बियाण्‍यांपासुन घेतलेल्‍या सोयाबीनच्‍या उत्‍पादनातुन स्‍वत:कडील बियाणे पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन पिकाच्‍या पेरणीसाठी प्रती हेक्‍टरी ७५ कि. ग्रॅ. बियाणे म्‍हणजेच एकरी ३० कि. ग्रॅ. बियाणे लागते, याप्रमाणे आपल्‍या क्षेत्रानुसार बियाणे पेरणीपुर्वी उपलब्‍ध करून स्‍वच्‍छ करून ठेवावे.

उगवणशक्‍ती तपासणी: video

सोयाबीन पिकाच्‍या बियाण्‍यात अंकुर हे आवरणालगतच असुन ते अतिशय नाजुक असते. बाहेरून होणा-या आघातामुळे बियाण्‍यास नुकसान होऊन त्‍याची उगवणक्षमता कमी होण्‍याची दाट शक्‍यता असते. त्‍यामुळे सोयाबीनचे बियाणे असणारे पोते उंचीवरून फेकु नयेत किंवा बियाणे आपटणार नाही याची काळजी घ्‍यावी. येत्‍या हंगामामध्‍ये आपण मागील वर्षी उत्‍पादीत घरचे बियाणे वापरणार असल्‍यास त्‍याची उगवणक्षमता तपासणे आवश्‍यक आहे. याकरीता घरच्‍याघरी उगवणशक्‍ती तपासता येते. यासाठी आपण जे सोयाबीन बियाणे म्‍हणुन वापरणार आहोत त्‍यातुन काडीकचरा निवडुन बिया मोजुन घ्‍याव्‍यात. हे बियाणे ओले कापड किंवा रद्दीपेपरमध्‍ये चार ते पाच दिवसांसाठी गुंडाळुन ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »