युरियाला पर्याय म्हणून वापरा रायझोबियम

1
      organic nitrogen source,organic nitrogen fertilizer,organic nitrogen fertilizer for plants,organic nitrogen fertilizer for paddy,natural npk,organic gardening,organic farming,nitrogen fertilize,village agriculture,agriculture telugu,telugu lo vyavasayam,vyavasayam,organic fertilizer,npk fertilizer,homemade fertilizer,sumantv,sumantv rythu,సుమన్ టీవీ రైతు,how to cultivate without urea fertilizer,purushotham,natural farming,fertilizer,natural farming without urea
                              रायझोबियम
 २५ एकर क्षेत्राला जिवाणू खत वापरणे ते ही पीक वाढीचा अवस्थेत असताना थोडे अवघड जाते. आम्ही त्यांना रायझोबियम चा व्यतिरिक्त पी. एस.बी(स्फुरद विरघवणारे जिवाणू) आणि के.एम.बी(पालाश उपलब्ध करणारे जिवाणू) हे ही वापरण्यास दिले. ह्याचा वापर होण्यासाठी आम्ही १टन लाकडी भुस्याचा वापर केला आणि हे सर्व जिवाणू हे त्या लाकडी भुस्यमध्ये मिसळले. हा भुस्सा आम्ही त्यांचा २५ एकर क्षेत्रावर विस्कटुन घेतला. ऐन पावसात आम्ही ते खत विस्कटुन घेतले जेणेकरून जिवाणूंचे परिणाम लवकर मिळतील. जिवाणूंचा परिणाम हे १०दिवसानंतर जाणवू लागला. झाडांची वाढ आणि काळोखी ह्या दोन्ही घटकांमध्ये सुधारणा झाली होती. पानाचा काळोखी मध्ये वृद्धी ह्याचा अर्थ पानांची प्रकाशसंश्लेषण करण्याची क्षमता ही वाढली. जेवढं जास्त प्रकाशसंश्लेषण होणार तेवढी जास्त साखर खोडामध्ये साठणार. जेवढी जास्त साखर खोडामध्ये साठणार तेवढं चांगले दाणे भरणार आणि उत्पादन वाढणार. ह्या सगळ्याच फायदा असा झाला की शेतकरी जो दर वर्षी एकरी ₹१०००/- खर्च करत होता तो ह्या वेळी फक्त एकरी ₹२००/- मध्ये तेवढंच उत्पादन आले. त्या शेतकऱ्याला एकरी ७ क्विंटल ते १२ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाले. पूर्वीही तेवढंच उत्पादन येत होते आताही तेवढंच उत्पादन येते फक्त उत्पादनखर्च हा ५ पटीने कमी आला. कुठल्याही धंद्यात कवडी वाचली की कवडी कमावली असा समज असतो. ह्या सर्व पध्दतीमध्ये जमिनीचा पोत सुधारला. झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढली. उत्पादन खर्च ५ पटीने कमी झाला. आम्ही आमचा शेतात कुठलेही खत न घालता आधी एवढे उत्पादन घेतो. रायझोबियम हा जिवाणू मुळीवर राहून नत्र स्थिर करण्याचे काम करतो. रायझोबियम चा वापरा मुळे भुईमूग किंवा इतर तेलबिया ह्यांच्यात तेलाचे प्रमाण वाढते. त्यामुळे उत्पादनही वाढते. हरभरा ,तूर ,वाटाणे,तीळ,मोहरी,जवस आणि इतर द्विदल पिकांमध्ये नत्र स्थिर करण्याची क्षमता ह्या जिवाणू मध्ये आहे. झाडांमध्ये संप्रेरक तयार करण्यास ही रायझोबियम मदद करते. सायटोकायनिन, ऑक्सिन,जिब्रेलीन, एबीसीसीक ऍसिड निर्मित मध्ये ही रायझोबियम मदद करते. आता पर्यंत आपण ह्या जिवाणूचा वापर हा फक्त बेणेप्रक्रिये साठी करायचो. आपण नकळत त्याचा क्षमतेवर मर्यादा आणतोय. युरिया ला हा जिवाणू एक उत्तम पर्याय आहे असे ह्या प्रयोगाअंती स्पष्ट सांगता येईल.                       
🙏🙏

1 thought on “युरियाला पर्याय म्हणून वापरा रायझोबियम

  1. जैविक सेंद्रिय शेती च शेतकऱ्यांना शेती खर्चातून वाचवू शकते आणि जगाला पण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »