महामार्ग पोलीस विभागाकडून अपघात टाळण्याकरिता जनजागृती

0

चांदवड(पत्रकार: दशरथ ठोंबरे):–महामार्ग पोलीस मदत केंद्र पिंपळगाव यांचेकडून राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली शाळा महाविद्यालय कारखाने बाजार टोलनाके इत्यादी ठिकाणी स्वतः पोहोचून जास्तीत जास्त लोकांपर्यंत वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम तत्परतेने पार पाडले जाते . त्याचाच एक भाग म्हणून मुंबई आग्रा महामार्गालगत , सोग्रस फाट्याजवळ असलेल्या Avee बॉयलर या कंपनीमध्ये जाऊन तेथील कामगार तसेच वाहन चालक यांना श्रीमती वर्षा कदम प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस विभाग पिंपळगाव यांनी वाहतूक नियमांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. *वाहन विम्याचे महत्त्व समजावून सांगून ,अपघातग्रस्तांना तातडीने मदत प्राप्त करून देणे हे आपले कर्तव्य आहे याबाबत जाणीव करून देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाच्या अनुषंगाने अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रास सामोरे जाणार नाही बाबत सविस्तर माहिती दिली. * कंपनीतील दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या सर्व कामगारांना कंपनी प्रशासनाच्यावतीने हेल्मेट पुरविण्याबाबत तसेच विना हेल्मेट कोणीही कामगार या कंपनीमध्ये प्रवेश मिळणार नाही याबाबत कंपनीचे संचालक यांनी मान्यता दर्शविली असून लवकरच सदर निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल बाबत आश्वासित केलेले आहेत. सदर वेळी कंपनीतील मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. जड वाहने महामार्गावरून चालविताना लेनची शिस्त पाळावी तसेच मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळावा या अनुषंगाने सूचना देऊन कायदेशीर कारवाई बाबतचे थोडक्यात माहिती दिली. E-challan डिवाइस मशीन ,स्पीड गन,Tint meter आधुनिक साधन विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमावेळी कंपनीचे संचालक श्री गांगुर्डे , सुपरवायझर श्री चव्हाण, मॅनेजर ,वाहन चालक ,तसेच, कंपनीचे कामगार असे सुमारे 50 ते 60 लोक उपस्थित होते. महामार्ग पोलीस विभागाकडील पोलीस हवालदार श्री रायभोळे ,घोलवड, सय्यद, पोलीस नाईक उमेश सानप, जगताप,गोधडे ,गुंजाळ ,मुलमुले , शिंदे या सर्वांनी कार्यक्रमा योजनांमध्ये मोलाचे सहकार्य केले सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »