मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञान काय आहे

0
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञान
जैवपूंज ( बायोफ्लाक ) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत जास्त घनतेमध्ये माशांची साठवणूक करून कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो किंवा अजिबात पाणी बदलले जात नाही . येत्या काळात हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे .
पाण्याची कमतरता आणि जमिनीची अत्यल्प उपलब्धता :
असल्याने मत्स्य संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण पद्धती अवलवल्या जातात . संवर्धन कालावधीमध्ये पाण्याच्या गुणवत्तेविषयी ( अमोनिया , नाइट्राईट ) समस्या उद्भवतात . मत्स्यशेतीमध्ये मासे उत्पादन खर्चाच्या ५० टक्केपेक्षा जास्त हिस्सा मत्स्यखाद्याचा असतो . त्यामुळे हा खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन मिळणे आवश्यक आहे . या सर्व समस्यांवर मत्स्यशेतीमध्ये जैवपूंज ( वायोफ्लाक ) तंत्रज्ञान पर्याय आहे . या तत्रज्ञानामध्ये जास्तीत जास्त घनतेमध्ये माशाची साठवणूक करून कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो .

जैवपूंज तंत्रज्ञान
:
 अनुदान जैवपूंज ( बायोफ्लाक ) म्हणजे एकपेशीय वनस्पती , जिवाणू , आदिजीव आणि टाकीतील इतर सेंद्रिय घटक जसे उरलेले अनुदानास खाद्य , माशांची विष्ठा यांचा पूंजका . हा पुंजका जिवाणूंनी सोडलेल्या चिकट पदार्थांच्या सहाय्याने एकत्रित बांधला जातो .
    मत्स्यसंवर्धन तलावात शिल्लक राहिलेले खाद्य , माशांची विष्ठा आणि अमोनिया इ . साचतात . अमोनियाचे रूपांतर  नाईट्रोमोनास व नायट्रोकोकस जिवाणूंच्या साह्याने नाईट्राईटमध्ये होते . नाईट्राईटचे रूपांतर नाईट्रोबँक्टर व नायट्रोस्पीरा जिवाणूंच्या साह्याने नाईट्रटमध्ये होते आणि त्यानंतर नायट्रोजनमध्ये होते .
पाण्यातील नायट्रोजनच्या प्रमाणानुसार कार्बनचा पुरवठा करणे आवश्यक आहे . जर कार्बन व नायट्रोजन गुणोत्तर १०  किंवा त्यापेक्षा अधिक ( १० – २० : १ ) असे ठेवले तर टाकाऊ घटकांचा वापर परपोषित जिवाणू स्वतच्या पोषणासाठी  करतात आणि पाण्यात जैवपूंज ( वायोफ्लाक ) तयार होतो . जैवपूजमध्ये जिवाणू , प्राणीप्लवंग , सूत्रकृमी ( निमेटोडस ) असतात .
  संवर्धित प्राणी जैवपूंज – प्लवंग खाद्य म्हणून वापर करतात . हवेचा पुरवठा करून जैवपूज पाण्यात तरंगत ठेवायचा . अशा प्रकारे या पद्धतीमध्ये टाकाऊ घटकापासून तलावात खाद्य तयार होते . ते संवर्धनादरम्यान वापरण्यात येणारे मासे किंवा कोळंबीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते . या तंत्रज्ञानामध्ये अमोनियाचे प्रमाण कमी करता येत असल्याने पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा कमी वापर व पुनर्वापर यामुळे या तत्रज्ञानाला झिरो वॉटर तंत्रज्ञान असे म्हटले जाते .
  बायोप्लाक पद्धतीमध्ये मत्स्यसंवर्धन करताना प्रथम पॉलिथिन लाईन तलाव पाण्याने भरून घ्यावेत . हवेचा पुरवठा करावा . त्यात उतर सवधनयुक्त तलावातील चिखल ५० किलो ग्रम प्रति हवटर या प्रमाणात टाकावा , जलद गतीने जेवपूज तयार होण्यासाठी नायट्रोजन पते २५ किलो ग्रम प्रति हेक्टर या प्रमाणात आणि कार्वन स्त्रोत साखर किवा मोलॅसिस टाकावे . यानंतर संवर्धनासाठी मासे / कोळवी सोडून त्याना खाद्य द्यावे . हे मासे / कोळंबी जैवपूंजचा खाद्य म्हणून वापर करू शकतात . तसेच हे मासे / कोळंबी व त्यांची पिल्ले पाण्यात असणारे सस्पेडेड सॉलिडचे प्रमाण जास्त असले तरी जगू शकतात . यामध्ये कोळंबी , तिलापिया व कार्प जातीच्या माशांचे संवर्धन केले जाते . तिलापियाचे १५ – २० किलो ग्रॅम प्रति घनमीटर , कोळंबीचे १५ ते २० टन प्रति हेक्टर व रोहू बोटूकली १५० नग प्रति घनमीटर एवढे उत्पादन मिळू शकते .
 या पद्धतीमध्ये पाण्यातील जैवपूंजांचे प्रमाण तपासणे गरजेचे असते . यासाठी इमहाफ कोन वापरावेत . इमहाफ कोनमध्ये तलावातील १ लिटर पाणी भरून पाण्यातील जैवपूंज तळाला साचल्यावर सुमारे २० मिनिटांनी जैवपूंजाचे प्रमाण ( मि . लि . / लि . ) तपासावे . मासे / कोळंबी संवर्धनासाठी जैवपूंजाचे प्रमाण १० ते १५ मि . लि . / लि . तर तिलापियाच्या संवर्धनासाठी २५ – ५० ते ५० मि . लि . / लि . असावे .

खाद्यातील घटकांचे प्रमाण :
      जेवपूज पद्धतीने मत्स्यसंवर्धन करताना खाद्याबरोबर कार्बन स्त्रोत वापरले जातात . सहज व स्वस्त दरात उपलब्ध होणारे कार्वन स्त्रोत जसे मोलसिस , भाताचा कोडा , गव्हाचा कोडा , गूळ , साखर इत्यादी वापरावेत . सुरुवातीलाच कार्बन स्त्रोतातील कार्वनचे प्रमाण तपासून घ्यावे , जेणेकरून तलावात मिसळायचे दैनदिन कार्बनचे प्रमाण ठरवता येईल . कार्बन व नायट्रोजन गुणोत्तर १० किवा त्यापेक्षा अधिक ( १० – २० : १ ) असावे . खाद्यातून पाण्यात जाणाऱ्या नायट्रोजनची मात्रा खाद्याच्या प्रथिनांच्या प्रमाणावर अवलंबून असते . म्हणजेच खाद्यातील प्रथिनाचे प्रमाण माहिती असावे . नायट्रोजनच्या मात्रेनुसार आपण कार्बन स्त्रोताची दैनदिन मात्र ठरवू शकतो .
  जेवपूजचा आकार संवर्धन काळात वाढतो . जसा आकार वाढतो तसा तो तळाशी जमा होतो . त्यामुळे यापासून हानीकारक वायुची निर्मिती होऊन ते संवर्धन केल्या जाणान्या मासे / कोळवीला घातक असतात . त्यामुळे तळाशी । गोळा झालेला गाळ ( स्लज ) काढून टाकावा.

डॉ . केतन चौधरी

(
मत्स्य महाविद्यालय , शिरगाव , रत्नागिरी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »