लवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती
लवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती –
बीडीएन 711
1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे.
2) पक्वता कालावधी 150-155 दिवस.
3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते.
4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते.
5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका.
6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य.
7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.
8) प्रथिने 19.5 ते 21.5 टक्के.
9) उत्तम डाळ गुणवत्ता
बीडीएन 708 (अमोल)
1) वाणाच्या दाण्यांचा रंग लाल आहे, फुलांचा रंग पिवळा आहे.
2) खोडाचा रंग लालसर हिरवा आहे.
3) कमी वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी जातीची शिफारस.
4) मध्यम जमिनीत व कोरडवाहू क्षेत्रावर जिथे संरक्षित पाणी देण्याची सोय नाही, अशा ठिकाणी घेण्यास हरकत नाही.
5) मध्यम कालावधीत म्हणजेच 155-165 दिवसांत तयार होतो.
6) उत्पादन 14-17 क्विंटल प्रति हेक्टरी.
7) बीडीएन 708 हा वाण निमपसरा असल्याने आंतरपीक पद्धतीसाठी अत्यंत चांगला आहे.

कापसामध्ये आंतरपीक म्हणून लागवडीस उपयोगी.
मारुती (आयसीपी 8863) वाणाची महाराष्ट्रासाठी शिफारस नाही –
हा वाण वांझपणा रोगास अतिशय बळी पडतो. कर्नाटक राज्याच्या काही जिल्ह्यांसाठी हा वाण प्रसारित करण्यात आला असला, तरी महाराष्ट्र राज्यासाठी या वाणाची शिफारस करण्यात आलेली नाही,
त्यामुळे या वाणाची लागवड महाराष्ट्रात करू नये.

संकर वाणांचा वापर टाळावा –
खासगी बीजोत्पादन कंपन्या तुरीचे संकर वाण विकसित करत आहेत. इक्रिसॅट संस्थेनेसुद्धा आयसीपीएच 2671 (पुष्कल) हा संकर वाण विकसित केला आहे;
परंतु या वाणांमध्ये खालील बाबी आढळून येतात.
1) नपुंसक झाडांचे प्रमाण.
2) मादी वाणामध्ये फूल, शेंगा व दाण्यांत फरक.
3) दाण्यांच्या आकारमानात, रंगात व गुणवत्तेत फरक असल्याने बाजारमूल्य कमी मिळते.

4) बीएसएमआर 736 किंवा 853 पेक्षा कमी उत्पादन येते.
5) तूर पिकामध्ये अधिकृतपणे बीटी वाण आलेला नाही.
उशिरा पेरणीसाठी लागवडीचे अंतर –
पेरणी कालावधी पेरणी अंतर (सें.मी.) जाती लागवड पद्धत/ रोपसंख्या
5) तूर पिकामध्ये अधिकृतपणे बीटी वाण आलेला नाही.
उशिरा पेरणीसाठी लागवडीचे अंतर –
पेरणी कालावधी पेरणी अंतर (सें.मी.) जाती लागवड पद्धत/ रोपसंख्या
15 जुलैपर्यंत 90 x 20 बीएसएमआर 736, 853,
बीडीएन 708,
बीडीएन 711
कोरडवाहू सलग 55555/ हे.
बीडीएन 708,
बीडीएन 711
कोरडवाहू सलग 55555/ हे.
45 x 15 बीएसएमआर 736, 853, बीडीएन 708 आंतरपीक (4ः2) 55555/ हे.
90 x 90 बीएसएमआर 736, 853, बीडीएन 708 बागायती (2 पाणी) 12000/ हे.
150 x 60 बीएसएमआर 736, 853, बीडीएन 708 बागायती (मध्यम जमीन) 11000/ हे.
रोपे
रोपे
15 ते 30 जुलै 90 x 20 बीडीएन 708, बीडीएन 711 (अमोल) कोरडवाहू 55555/ हे.
ऑगस्ट पहिला आठवडा 45 x 15 बीडीएन 808, बीडीएन 711 (अमोल) कोरडवाहू सलग 180,000/ हे.
बीजप्रक्रिया महत्त्वाची –
पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अत्यंत गरजेची आहे. उशिरा पेरणीसाठी बीडीएन 708 (अमोल) व बीडीएन 711 या जातींची निवड करावी. सर्वांनाच या जातीचे बियाणे उपलब्ध होत नाही.
काही शेतकरी स्थानिक जातींची लागवड करतात.
स्थानिक जातींमध्ये मर व वांझ रोग मोठ्या प्रमाणात येतो.
मर रोगाच्या नियंत्रणासाठी 2.5 ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यानंतर पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबीयम जिवाणूसंवर्धक आणि 250 ग्रॅम पीएसबी जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. तसेच, चार ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी.
साधारणपणे 15 ते 30 जुलै दरम्यान भुईमूग/ तूर/ मूग/ उडीद ही आंतरपिके न घेता बाजरी/ सूर्यफूल/ तीळ ही आंतरपिके घ्यावीत. 4ः2 किंवा 2ः1 ओळी या प्रमाणात 45 x 15 सें.मी. अंतरावर पेरून घ्यावीत. 30 जुलैनंतर आंतरपीक घेऊ नये. सलग लागवड ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येऊ शकते; परंतु उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत घट येते.

रोपे पद्धतीने लागवड –
जातींची निवड –
1) बीएसएमआर 736, बीएसएम 853 या जातींपासून अधिक उत्पादन मिळते.
रोपे यशस्वीपणे लागवड केली जाऊ शकतात. तथापि, 160 ते 190 दिवसांत तयार होणाऱ्या सर्व जातींची लागवड यशस्वीपणे करता येते.
2) कोरडवाहू पद्धतीमध्येही या जाती यशस्वी ठरलेल्या आहेत, कारण कालावधी 15 ते 20 दिवसांनी कमी होतो.
3) बीडीएन 708, विपुला, पीकेव्ही तारा या जातीसुद्धा यशस्वी रोपे लागवडीसाठी वापरल्या जाऊ शकतात. 160 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या जातींची रोपे लागवडीसाठी निवड करू नये.

रोपे पुनर्लागवडीचे फायदे –
1) नियमित हंगामाच्या एक महिना अगोदर रोपांची वाढ होते.
2) वाढीच्या व फुलोऱ्याच्या काळात जमिनीत ओलावा कमी झाल्यास त्याचा परिणाम रोपे लागवडीच्या पिकावर होत नाही.
3) पिकाचा कालावधी 15 ते 20 दिवसांनी कमी होतो, एकाच वेळी पीक काढणीस तयार होते.
4) वातावरणाचा होणारा अनिष्ट परिणाम टाळ
ता येतो.
5) किडी व रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो.
6) परिणामकारक वाढ मिळाल्यामुळे उत्पादकतेत कोरडवाहू पिकात 30 टक्क्यांपर्यंत वाढ मिळते.
7) रोपांच्या पुनर्लागवडीसाठी तुरीची कोणतीही मध्यम कालावधीची जात वापरता येते.
रोपे तयार करण्याची पद्धत –
A. पॉलिथिन पिशवी पद्धत –
1) 9 x 3 (लांब x रुंद) किंवा 9 x 4 आकाराची पॉलिथिन पिशवी निवडावी. तुरीला सोटमुळे असल्यामुळे पिशवीची लांबी जास्त असावी.
2) 7-2-1 माती – शेणखत – रेती या प्रमाणात मिश्रण तयार करून पिशव्या भरून घ्याव्यात.
3) एका पिशवीत बीजप्रक्रिया केलेल्या दोन बिया टोकण कराव्यात व पाणी द्यावे.
4) चार आठवड्यांचे रोप लागवडीसाठी वापरावे.
5) 22 हजार रोपे एका हेक्टरसाठी 5 x 1 फूट लागवडीच्या अंतरासाठी वापरावीत.
B. गादीवाफा पद्धत –
1) दहा मीटर लांब (आवश्यकतेप्रमाणे), एक मी. रुंद व एक फूट उंचीचे गादीवाफे तयार करावेत.
2) या गादीवाफ्यांवर शेणखत व रेती पसरून मातीत मिसळून लावावी.
3) गादीवाफे लागवड क्षेत्राजवळ असावेत.
4) 30 x 10 सें.मी अंतरावर बीजप्रक्रिया करून बियाणे लागवड करावी.
5) चार आठवड्यांचे रोप लागवडीसाठी वापरावे.

अशी करा लागवड –
1) माती परीक्षण करूनच खत मात्रा निश्चित कराव्यात. प्रति हेक्टरी 2.5 टन शेणखत, कोरडवाहू लागवडीसाठी 25 किलो नत्र + 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी एवढी मात्रा बियाण्याच्या खाली खत पडेल, अशा पद्धतीने पेरून द्यावी.
बागायती पिकासाठी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 30 किलो पालाश, 20 किलो गंधक, 15 किलो झिंक सल्फेट एवढी मात्रा अवश्य पेरणीपूर्वी द्यावी.
कोरडवाहू पिकासाठी 90 ते 110 दिवसांनी दोन टक्के युरियाचे द्रावण पिकावर फवारावे. पाऊस पडल्यावर जमिनीत ओलावा भरपूर असताना लागवड करावी.
2) वाफसा आल्यानंतर भारी जमिनीत सहा फुटांवर व मध्यम जमिनीत पाच फुटांवर खोल सरी टाकावी. दोन फूट अंतरावर पिशव्या मांडाव्या. हलक्या हाताने पॉलिथिन पिशवी एका बाजूने खालच्या भागापर्यंत कापून वेगळी करावी. मातीसह रोप अशा पद्धतीने सरीमध्ये ठेवावे, की जमिनीच्या मातीबरोबरच रोपाची माती लागली पाहिजे. जास्त खोल किंवा उथळ लागवड करू नये. रोप सरळ ठेवून बाजूची माती लावून हाताने घट्ट दाबून घ्यावे.
लागवड पूर्ण झाल्यावर सरी बुजवून टाकावी. पाऊस 12 तासांच्या आत पडला नाही तर ताबडतोब पाणी द्यावे.
3) गादीवाफ्यावरील रोपे लागवड करताना काळजी घेणे गरजेचे आहे. रोपे काढण्यापूर्वी मुळ्या तुटणार नाहीत, अशा पद्धतीने मातीसह रोपे वाफ्यावरून काढावीत.
4) रोपे अलग करण्यापूर्वी हलके पाणी द्यावे व वाफ्याखालच्या बाजूने उकरून रोपे अलग करावीत. ही रोपे लागवड करताना काढल्याबरोबर लागवड संपवावी. त्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
5) लागवड करत असताना जमिनीत भरपूर ओलावा असणे आवश्यक आहे. लागवडीच्या वेळी रोपाच्या पहिल्या पानाच्या थोडे खालपर्यंतचा भाग जमिनीत असला पाहिजे. त्यानंतर रोपाच्या बाजूची माती हाताने घट्ट दाबून घ्यावी.
आंतरपीक अवश्य घ्यावे –
तूर मुख्यतः आंतरपीक म्हणूनच शिफारस केलेले पीक आहे, त्यामुळे खालीलप्रमाणे आंतरपीक लागवड करता येते.
लागवड अंतर पीक पद्धत ओळीचे प्रमाण परिस्थिती
45 x 15 सें.मी. मूग, उडीद, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, भुईमूग, बाजरी + तूर (सर्वजाती, बीडीएन 711 वगळून) 4-2 कोरडवाहू
45 x 15 सें.मी. किंवा 60 x 30 सें.मी. ज्वारी, मका + तूर 3-3 कोरडवाहू
150 x 30 सें.मी. किंवा 180 x 60 सें.मी. मूग, उडीद, सोयाबीन + तूर 3-1 बागायती
90 x 90 सें.मी. 120 x 60 सें.मी. 150 x 30 सें.मी. कापूस + तूर (बीडीएन 708) 8-1 6-1 4-1 कोरडवाहू बागायती
तुरीची विरळणी –
चौकटीत सांगितल्याप्रमाणे अंतराचा अभ्यास करावा, त्याप्रमाणे तूर पिकामध्ये विरळणी करून एका ठिकाणी एकच झाड ठेवावे. तुरीची विरळणी पेरणीनंतर चवथ्या आठवड्यात करावी. बऱ्याच ठिकाणी उगवण कमी होते, अशा ठिकाणी पेरणीनंतर दोन आठवड्यांतच तूट भरून काढावी. एका ठिकाणी दोन बिया टोकाव्या किंवा दमट वातावरणात जमिनीत भरपूर ओल असताना विरळणीच्या वेळी काढाे रोप मातीसह काढून लागवड करावी. बुडाची माती दाबावी.
Source:
कृषि विभाग
कृषि विभाग
७३६ ,, 736 हावान सोयाबीन मध्ये किती अंतरावर करावा
छान माहिती खूप छान माहिती
माहिती अभिनंदन अभिनंदन