पाऊस किती झाला हे कसे मोजला
आपण खुपवेळा वाचलं किंवा पाहिलं असेल कि पाऊस हे लांबीमध्ये (मिलीमीटर,सेंटिमीटर किंवा इंच) मोजला जातो, त्यासाठी कुठलंही Calculation (गणना) केलं जात नाही. त्यामागे कारण असा कि, पावसाच्या थेंबाला ठराविक आकार किंवा वजन नसते.
पर्जन्यमापन
पर्जन्यमापनासाठी वापरणाऱ्या उपकरणाला Rainmeter (रेनमीटर) किंवा हाइड्रोमीटर, यूडोमीटर, प्लवीओमीटर या ओमब्रोमीटर म्हटला जातो. पावसाचे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरण खालील खालीलप्रमाणे असते,
१) एक काचेची नळी किंवा कंटेनर ज्याला ‘Collecting Bottle’ म्हटलं जातो. ह्या नळीला बाहेरून धातूचा मुलामा चढवलेला असतो. ह्या नळीमध्ये, पावसाचे जमाझालेले पाणी एकत्रित केला जातो.
२) काचेच्यानळीवर एक नरसाळा लावलेला असतो ज्यामुळे पाणी इकडे-तिकडे जात नाही.
३) ह्या नळीला हलु नये म्हणून सिमेंटच्या आधाराने पावसात उघड्यावर ठेवला जातो. नळीला कुठल्याही झाडाखाली किंवा शेडखाली खाली ठेवला जात नाही कारण त्याने पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने गोळा होत नाही.
४) रोज ठराविक वेळानंतर ह्या नळीमध्ये जमाझालेलं पावसाचे पाणी एका काचेच्या पात्रात (Beaker) जमा केला जातो. काचेच्या पात्राला मोजमापन करण्यासाठी मिलीमीटर, सेंटीमीटर किंवा इंच मध्ये खुणा असतात (जसे पट्टीवर असतात तसे) आणि त्याद्वारे जमाझालेल्या पाण्याची उंची मोजली जाते.
५) आलेली उंची हि त्या ठिकाणाची त्या वेळेत झालेल्या पावसाची मापन असते.
६) ह्यात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची मापं (लांबी लांबी आणि रुंदी) जगात सगळ्याठिकाणी सारखीच ठेवली जाते. म्हणजेच नळीची लांबी २०३ मिलीमीटर आणि नरसाळ्याची व्यास ५ इंच ठेवली जाते.
७) आजकाल नळी आणि नरसाळा वेगळे वेगळे नसतात, ते एकत्रितपणे नळीवरच मोजमापीसाठी खुणा केलेल्या असतात.
८) भारतात हवामान विभागाद्वारे पावसाची दिवसातून २ वेळा (सकाळी ८ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता) मोजमापन केला जातो.
९) आलेल्या निरीक्षणांची नोंद वर्षानुवर्षे ठेवली आणि केली जाते. त्याचा उपयोग त्या भागाचा सरासरी पर्जन्यवृष्टी किती झालं किंवा अंदाज किती होईल ह्याच भाकीत केला जातो.
Source
*स्मार्ट किसान