कवी निर्मला खांगळ यांना अक्षरोदय पुरस्कार प्रधान

0

काजी सांगवी वार्ताहरः उत्तम आवारे ः काजीसांगवी जनता विघालयात उपशिक्षक पदावर कार्यरत असलेल्या कवी निर्मला खांगळ यांना नुकत्याच जागतिक महिला दिना निमीताने अक्षरोदय साहित्य मंडळ,महाराष्ट्र.(नांदेड) तर्फे महिला पुरस्काराने  गौरविण्यात आले. 

      जागतिक महिला दिनानिमित्त  महिला गौरव पुरस्कार मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठाण उमरी (नांदेड)तर्फे महाराष्ट्र राज्यातील साहित्य क्षेत्रातील     योगदान देणा-या अनेक महिलांचा गौरविले जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलन डोंबिवली येथे 2017मध्ये व 2018 मध्ये बडोदा (गुजरात)येथे भरलेल्या साहित्य संमेलनात निर्मला  खांगळ यांच्या कवितांची निवड बोली भाषेतील कवी कट्ट्यावर झाली होती. त्यांचे “ऊन सावलीच्या कविता “हा काव्य संग्रह प्रकाशित आहे. त्यात ग्रामीण भागातील शेतक-यांचे दुःख व स्त्रियांच्या जीवनावर प्रकाशझोत त्यांनी आपल्या कवितांमधुन टाकला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दि 10 मार्च रोजी नादेंड येथे अध्यक्षा पंचफुला वाघमारे यांच्या उपस्थित पुरस्कार प्रधान करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »