Tomato

टोमॅटो फवारणी वेळापत्रक,टोमॅटो लागवड पासून ते फळ काढणी पर्यंत स्प्रे ( spray ) व लिक्विड (liqvid) यांची थोडक्यात माहिती.

टोमॅटो शेड्यूल नियोजन :
1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएंट्सचा वापर करावे, DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएंट्स टाळावे.
2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे.
3. लागवडीच्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते.
4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये.
5. फुल धारणेच्या वेळी 12:61:00 किंवा 00:52:34 वापरावे. Chilatade झिक१००+बोरान 100 ग्रॅम झाडांच्या पानांचा कालोकी v सेटिंग सााठी घ्या .
13:00:45(90gm)+calcium nytret (50gm)+boron (30gm) फळधारणा चांगली होने साठी(frute setting spraying schedule 15liter water).
 6. फुगवनीच्या काळामध्ये 00:52:34, पोटॅशियम सोनाईट, 13:40:13, 00:60:20आणि 00:00:50 आलटून पालटून वापरावे.
 7. फुलधारणे पासून कॅल्शियम नायट्रेट दर 10 ते 12 दिवसांनी द्यायचा. टमाटर येेणाराा काळा ठिपका त्यासाठी 
कॅल्शियमची कमतरता असल्यास फळाच्या बुडाला काळा डाग येत असतो. 
8. कॅल्शियम दिल्यानंतर पुढच्या पाण्यात बोरान नक्की देणे, तसा केल्यास कॅल्शियम अपटेक मध्ये पण मदत होते व फुलगळ पण थांबते.
9. मॅग्निशियंम दर 10 ते 12 दिवसांनी दिल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते आणि पानातील हिरवेपणा मध्ये पण वाढ होते.
10. दर 10 ते 15 दिवसांनी ह्युमिक ऍसिड किंवा मायकोरायझा ( रॅली गोल्ड किंवा इसाबीएन किंवा VAM) सोडल्यास पांढऱ्या मुळींची वाढ चांगली होते.
 11. आळीसाठी कोराजन (coragen) किंवा Ampligo फवारणी फुलकळी सेट झाल्यानंतर आवश्य घ्यावा.
12. लागवडीच्या दुसऱ्या आठवड्या पासून ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसीलस आलटून – पालटून दर आठवड्याला देत राहिला तर सर्व बुरशीं पासून चांगला सौंरक्षण मिळते व फवारणीचे खर्च पण मोठ्या प्रमाणात वाचतो। हे पद्धत अवलंबत असाल तर ड्रीप मधून बुरशीनाशक देणे टाळावे.
13. मिक्स मायक्रोन्यूट्रिएन्ट दर 12 ते 15 दिवसांनी द्यावे.
14. भुरी चे स्पोर जाळण्यासाठी M 45 व चांगल्या प्रतिचे फॉस्फोरिक ऍसिडची फवारणी घेतल्यास उत्तम नियंत्रण मिळेल असा तज्ज्ञांचा म्हणणं आहे.
15. लागवडीचे अंतर ज्यास्त ठेवल्यास हवा खेळती राहून करपा आणि अळी चा प्रादुर्भाव कमी होतो.
16. झाडात पोटॅश चा प्रमाण व्यवस्तीत असल्यास भुरी चा प्रादुर्भाव कमी होतो व लाल कोळी असल्यास नियंत्रण सोपा जाते.
17. फुलगळ थांबवायचा असल्यास ड्रीप मधून स्फुरद द्यावे आणि फवारणी मध्ये चिलेटेडे कॅल्शियम व बोरान चा वापर करावा.
18. टोमॅटो मध्ये शेंडा खुडने (टॉपिंग) टाळावे, ते केल्यास व्हायरस वाढायची शक्यता ज्यास्त होते.
19. व्हायरस चे लक्षण दिसताच व्हायरस च्या औषध सोबत ताक वापरावे, ताकातील प्रोटीन व्हायरस सोबत मिक्स होऊन त्यांची उत्पत्ती नियंत्रनात येते.
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »