हरभरा लागवड

0

हरभरा लागवड
हरभरा किंवा हरबरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घांटा असें म्हणतात. याचे मूळस्थान तुर्कस्तान आहे असे मानतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते. हरभरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३०किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करुन देतो .हरभऱ्यापासून डाळ,बेसन किंवा भाजी ही तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. पांनाची भाजी पण तयार करतात. अंकूर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते.

A) जमिनीची निवड :-
१) मध्यम ते भारी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन सर्वोत्तम ठरते.
२) चोपण, निचरा न होणाऱ्या जमिनीत तसेच आम्ल जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
३) जमिनीची कमीत कमी मशागत करावी. त्यामुळे जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल.

B) पेरणीचा कालावधी व पद्धत :-
१) जिरायती हरभऱ्याची पेरणी ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.
२) जिरायती परिस्थितीत देशी हरभरा झाडांची हेक्‍टरी संख्या राखण्याकरिता बियाणे चार तास पाण्यात भिजवून व नंतर सावलीत वाळवून बीजप्रक्रिया करूनच पेरावे.
३) ओलिताखाली हरभरा ऑक्‍टोबरच्या दुसरा पंधरवड्यात पेरल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी.
४) देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळीतील अंतर ३० सें.मी., तर दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे.
५) काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे.
६) ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वाफा पद्धत वापरणे फायद्याचे ठरते.

C) बियाण्याचे प्रमाण :-
१) हरभरा वाणांच्या लहान दाण्यांचा वाणाकरिता (उदा. विजय, विशाल, दिग्विजय,आयसीसीव्ही-१०, एकेजीएस-१, साकी ९५१६) : ५०-६० किलो प्रतिहेक्‍टर.
२) मध्यम आकारमानाच्या वाणाकरिता (उदा. जाकी ९२१८) :  ७५-८० किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.
३) काबुली वाणांमध्ये आयसीसीव्ही-२, पीकेव्ही काबुली-२ व पीकेव्ही काबुली-४ : १०० ते १२५ किलो प्रतिहेक्‍टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.

D) सुधारित वाण :-
१) देशी हरभरा : हा हरभरा मुख्यत्वे डाळीकरिता व बेसनाकरिता वापरतात. या प्रकारामध्ये साधारणतः दाण्याचा रंग फिक्कट काथ्या ते पिवळसर असतो. दाण्याच्या आकार मध्यम असतो.
२) भारती (आय.सी.सी.व्ही. १०) : हा वाण जिरायती, तसेच बागायती परस्थितीत चांगला येतो. हा वाण मररोग प्रतिबंधक असून, ११० ते ११५ दिवसात कापणीस तयार होतो. जिरायतीत हेक्‍टरी १४ ते १५ क्विंटल तर ओलितामध्ये ३० ते ३२ क्विंटल प्रतिहेक्‍टर उत्पादन मिळते.
३) विजय (फुले जी-८१-१-१) : जिरायती, ओलिताखाली तसेच उशिरा पेरणीकरिता प्रसारित केला आहे. मररोगास प्रतिकारक्षम असून, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. जिरायतीत हेक्‍टरी १५ ते २० क्विंटल व ओलिताखाली ३५ ते ४० क्विंटल व उशिरा पेरणी केल्यास १६ ते १८ क्विंटल प्रतिहेक्‍टर अशी उत्पादनक्षमता आहे.
४) जाकी ९२१८ : हा देशी हरभऱ्याचा अतिटपोर दाण्याचा वाण आहे. हा वाण लवकर परिपक्व होणारा (१०५ ते ११० दिवस) आणि मररोग प्रतिबंधक आहे. सरासरी उत्पादन १८ ते २० क्विंटल प्रतिहेक्‍टर एवढे आहे. हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे. हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.

E) काबुली हरभरा :-
१) हा हरभरा छोले भटोरे बनविण्यासाठी वापरतात. या हरभऱ्याच्या प्रकारामध्ये दाण्याचा रंग पांढरा असतो.
२) श्‍वेता (आय.सी.सी.व्ही.-२) : मर रोगास प्रतिकारक्षम आहे. दाणे टपोरे असून, जिरायतीमध्ये ८५ ते ९० दिवसात तर ओलिताखाली १०० ते १०५ दिवसांत पक्व होतो. जिरायतीमध्ये ८ ते १०, तर ओलिताखाली २० ते २२ क्विंटल प्रतिहेक्‍टर उत्पादन मिळते.
३) पीकेव्ही काबुली-२ : मर रोग प्रतिकारक्षम. पेरणीस उशीर व पाण्याचा ताण पडल्यास टपोरेपणावर परिणाम होतो. म्हणून या वाणाची लागवड योग्यवेळी ओलिताखाली करावी. ओलिताखाली उत्पादन १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्‍टर मिळते.
४) विराट : हा काबुली वाण टपोऱ्या दाण्याचा आहे. हा वाण मररोग प्रतिकारक्षम असून, ओलिताखाली ३० ते ३२ क्विंटल प्रतिहेक्‍टर उत्पादन मिळते.
५) पीकेव्ही काबुली- ४ : या वाणाच्या दाण्याचा आकार अतीटपोर आहे. मर रोगास साधारण प्रतिकारक्षम. या वाणाचे सरासरी उत्पादन १५ क्विंटल एवढे मिळते.

F) गुलाबी हरभरा :-
१) गुलक- १ : टपोऱ्या दाण्याचा वाण. मुळकुजव्या व मर रोगास प्रतिकारक असून, दाणे चांगले टपोरे, गोल व गुळगुळीत असतात. फुटाणे तसेच डाळे तयार केल्यास त्यांचे प्रमाण डी-८ पेक्षा जास्त आहे.

G) हिरवा हरभरा :-
१) दाण्याचा रंग वाळल्यानंतरसुद्धा हिरवा राहतो. उसळ, पुलाव करण्यास उत्कृष्ट.
२) पीकेव्ही हरिता : हा वाण ओलिताखाली लागवडीसाठी योग्य. मर रोगास प्रतिकारक. उत्पादन सरासरी २० ते २२ क्विंटल प्रतिहेक्‍टर आहे.

H) बीजप्रक्रिया :-
१) मर, मूळकुज किंवा मानकुज (स्क्‍लेरोशियम मूळकुज) रोगांपासून बचाव करण्यासाठी : पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.

I) जिवाणू संवर्धन वापरण्याची पद्धत :-
१) रायझोबियम व स्फुरद उपलब्ध करणारी जीवाणू संवर्धने प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावी.
२) प्रथम १२५ ग्रॅम गूळ प्रतिलिटर गरम पाण्यात विरघळून घ्यावा. थंड द्रावणात २५० ग्रॅम प्रत्येक संवर्धन मिसळून लेप तयार करावा.
३) १० किलो बियाण्यास हा लेप पुरेसा आहे. बियाणे ताडपत्री, फरशी किंवा प्लॅस्टिकवर घेऊन संपूर्ण बियाण्यावर आवरण होईल या प्रमाणे मिसळावे. असे बियाणे सावलीत वाळवावे. त्वरीत पेरणीसाठी वापरावे. बुरशीनाशकांची प्रक्रिया आधीच केली असल्यास अशा बियाण्यास संवर्धन दीडपट वापरावे.

J) खतांची मात्रा :-
१) हरभऱ्याची पेरणी करताना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावा.
२) गंधक किंवा जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीत नत्र व स्फुरदासोबत २० किलो गंधक किंवा २५ किलो झिंक सल्फेट प्रतिहेक्‍टरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे.
३) फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी व त्यानंतर दुसरी फवारणी १० दिवसांनी करावी.

K) आंतरमशागत :-
पीक ४० ते ४५ दिवसांपर्यंत दोन डवरणीच्या पाळ्या व एक निंदणी आवश्‍यकतेनुसार देऊन पीक तणविरहित ठेवावे.

L) ओलीत व्यवस्थापन :-
१) उगवणीनंतर पहिले पाणी पीक कळीवर असताना (४० ते ४५ दिवसांनी),  दुसरे पाणी घाटे भरतेवेळी (७० ते ७५ दिवसांनी) द्याव. मर्यादित ओलीत असल्यास कमीत कमी एक ओलीत घाटे भरतेवेळी द्यावे.
२) दोन ओळी रुंद वरंबा सरी पद्धतीने ओलीत केल्यास इतर पद्धतीच्या मानाने ३० टक्के पाण्याची बचत होते. तसेच उत्पादनात २० टक्के वाढ मिळते. 
३) मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, कळी असताना दुसरे व घाटे भरतेवळी तिसरे पाणी द्यावे. हलक्‍या जमिनीवर घेतलेल्या हरभऱ्याला मात्र पिकाची स्थिती पाहून उगवणीनंतर ओलीत करावे.
४) अधिक प्रमाणात पाणी दिल्यास पीक उभळण्याचा धोका असतो. जमिनीचा प्रकार आणि खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. मात्र पाणी देण्यास उशीर करून जमिनीस भेगा पडू देऊ नयेत. तसेच पाणी साचू देऊ नये. अन्यथा मुळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
५) हरभरा पिकास एक ओलीत दिल्यास उत्पादनात ३० टक्के वाढ होते, तर दोन ओलीत दिल्यास ५२ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते

M) कीड रोग नियंत्रण :-
a) कीड नियंत्रण :-
अ) घाटेअळी :- ही अळी अमेरीकन बोंड अळी, हिरवी बोंड अळी, हरभऱ्यावरील घाटे अळी व तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी अशा विविध नावांनी ओळखली जाते. पूर्ण विकसित घाटे अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात) व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.
१) नुकसान :-
लहान अळ्या सुरवातीस पानावरील आवरण खरडून खातात. अशी पाने काही अंशी जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. विकसित घाटे अळी कळ्या व फुले कुरतडून खातात. पूर्ण वाढ झालेली अवस्था तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते.
२) घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण :-
> उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी करावी. त्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात, तसेच उन्हामुळे मरतात.
> वाणनिहाय शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.
> घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये ल्युरचा वापर करावा. शेतात हेक्‍टरी ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी.
> शेतात दरहेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. पक्ष्यांमुळे अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.
> घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी.
३) वनस्पतिजन्य कीटकनाशके :-
सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे.
४) जैविक व्यवस्थापन :-
घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे.
५) रासायनिक नियंत्रण :-
हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी क्लोरअँट्रानिलीप्रोल (२० एससी) २.५ मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ब) गोनोसेफॅलम भुंगा :-
भुंग्याचा रंग काळपट, भुरकट असतो. किडीची मादी जमिनीत अंडी घालते. अळी अवस्था जमिनीत राहते. प्रौढ जमिनीच्या वरच्या थरात फटीत राहतात. भुंगे दिवसा सहसासहजी दिसत नाहीत, प्रौढ भुंगे जमिनीत राहून बियांचा अंकुर खातात. उगवण झालेली रोपे जमिनीलगत कापून पडल्याप्रमाणे दिसतात.
१) नियंत्रण :-
> प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम क्‍लोथियानिडीन (५० डब्ल्यूडीजी) प्रक्रिया करावी.
> पेरणीच्या वेळी फोरेट (१० जी) १० किलो प्रतिहेक्‍टरी जमिनीत मिसळावे.
> पीक उगवणीनंतर २० दिवसांनी क्‍लोरपायरिफॉस (२० इसी) २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

क) लष्करी अळी (स्पोडोप्टेरा) :-
प्रौढ पतंग मध्यम आकाराचा असतो. अंडी फिकट रंगाची गोलाकार असतात. अंडी पानावर किंवा फांदीवर सरासरी १५० च्या समूहामध्ये दिली जातात. अळी पानावर आणि घाट्यावर प्रादुर्भाव करते.

ड) रोप कुरतडणारी अळी (कटवर्म) :-
अळी दिवसा जमिनीत लपते. रात्रीच्या वेळी लहान रोप जमिनीलगत कापते.

इ) पाने पोखरणारी अळी :-
प्रौढ पतंग चकाकणारे, गडद रंगाचे असतात. मादी पानावर अंडी घालते.  अळी पिवळ्या रंगाची असते. अळी पानामध्ये शिरून आतील हरितद्रव्य खाते. यामुळे पानाच्या वरच्या बाजूस नागमोडी आकाराच्या रेषा दिसतात.
१) नियंत्रण :-
प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ई) मावा :-
प्रौढावस्था ही चमकदार काळ्या रंगाची असते. बऱ्याच वेळा पंखधारी असते. फांद्या, फुले शेंगावर कीड वसाहत करून राहते. प्रादुर्भाव झालेल्या रोपाची पाने आकसतात. अशावेळी पाण्याचा ताण पडल्यास रोपे वाळतात. हरभऱ्यावरील स्टंट रोगाचा प्रसार या किडीमुळे होतो.

b) रोग नियंत्रण :-
अ) मर :-
हा रोग फ्युजारियम ऑक्‍सिस्पोरम बुरशीमुळे होतो. प्रादुर्भावग्रस्त रोपांची कोवळी पाने आणि फांद्या सुकतात. शेवटी संपूर्ण झाड वाळते.
१) नियंत्रण :-
मर रोग प्रतिकारक जातीची लागवड करावी. (उदा : जॅकी-९२१८, विजय, आयसीसीव्ही-१०, विशाल, विराट).  ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी.

ब) कोरडी मूळकूज :-
रोगाचा प्रादुर्भाव रायझोक्‍टोनिया बटाटीकोला बुरशीमुळे होतो. रोगग्रस्त रोपांची वरील पाने व देठ पिवळा पडून झुकतात. त्यानंतर पाने गवती रंगाची होतात. मुळे सडतात. रोपे उपटली असता सहज निघून येतात.

क) ओली मूळकूज :-
रोगाचा प्रादुर्भाव फ्युजेरियम सोलेनी बुरशीमुळे होतो. रोपे बुटकी होतात. पाने पिवळी पडून वाढ खुंटते. रोप उपटून पाहिल्यास मुळे कुजलेली दिसतात. सालीवर बुरशीची काळसर वाढ दिसून येते.
१) नियंत्रण :
थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. रोगग्रस्त झाडांचे अवशेष नष्ट करावेत.

N) काढणी :-
हरभऱ्याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात. घाटे वाळू लागतात. त्यानंतर पिकाची कापणी करावी. अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होते. त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी.🙏🙏-: !! हरभरा लागवड तंत्रज्ञान !! :-

हरभऱ्याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात. घाटे वाळू लागतात. त्यानंतर पिकाची कापणी करावी. अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होते. त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी.🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »