जीवामृत माहिती : कसे बनवतात व कसे वापरता

1

जीवामृत: प्रमाण 1 एकर साठी: 
200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे. दिवसातून दोनदा सकाळ व  संध्याकाळ काठीने ढवळावे.
महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना  200 ते 400 ली. जीवामृत दयावे.
ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे.

फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :
पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड व नंतरचे 6 महिने 500 मिली जीवामृत प्रति झाड
दुसऱ्या वर्षी: प्रती  झाड 1 ते 2 लिटर जीवामृत प्रति झाड
तिसरया वर्षी: प्रती झाड 2 ते 3 लिटर जीवामृत प्रति झाड
चौथ्या वर्षी: प्रती झाड 4 ते 5 लिटर जीवामृत प्रति झाड
पाचव्या वर्षी: प्रती झाड 5 ते 10 लिटर जीवामृत प्रति झाड
आणी त्यानंतर 5 लिटर प्रती झाड हे प्रमाण  कायम राहील

जिवामृताच्या फवारण्या: 
 १.खरिप पिकांसाठी: प्रमाण प्रती एकर 

 • पहिली फवारणी: पेरणीच्या 30 दिवसांनी
  100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
 • दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या 20 दिवसांनी
  150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत.
 • तिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसांनी
  200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत.
 • शेवटची फवारणी : फळ बाल्यावस्थेत/ दाने दूध अवस्थेत असताना.
  200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक.

२.भाजीपाला पिकांसाठी प्रमाण प्रती एकरी 

 • 1 ली फवारणी : पेरणीनंतर 1 महिन्यानी
  100 लि. पाणी + 5 लि.गाळलेले जिवामृत
 • 2 री फवारणी : पहिल्या फवारणीच्या 10 दिवसांनी
  100 लि. नीमास्त्र किंवा 100 लि.पाणी + 3 लि.दशपर्णीअर्क
 • 3 री फवारणी : दुसऱ्या  फवारणीच्या 10 दिवसांनी
  100 लि. पाणी + 2.5 लि. आंबट ताक
 • 4 थी फवारणी : तिसऱ्या  फवारणीच्या 10 दिवसांनी
  150 लि. पाणी + 10 लि.गाळलेले जीवामृत
 • 5 वि फवारणी : चौथ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
  150 लि. पाणी + 5 लि.ब्रम्हास्त्र किंवा
  150 लि. पाणी + 5 ते 6 लि. दशपर्णीअर्क
 • 6 वी फवारणी : पाचव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
  150 लि. पाणी + 4 लि. आंबट ताक
 • 7 वी फवारणी : सहाव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
  200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत
 • 8 वी फवारणी : सातव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
  200 लि. पाणी + 6 लि.अग्नीस्त्र किंवा
  200 लि. पाणाी + 8 ते 10 लि. दशपर्णीअर्क
 • शेवटची फवारणी :आठव्या फवारणीच्या 10 दिवसा
  200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक किंवा
  200 लि. सप्तधान्यांकुर अर्क
 • 3.नविन फळबागांसाठी :प्रमाण  प्रती एकर 
 • 1 ली फवारणी :कलम लावल्यानंतर 1 महिन्यानी
  100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
 • 2 री फवारणी : पहिल्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
  150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत
 • 3 री फवारणी :दुसऱ्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
  200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
  व पुढील फवारण्या ह्याच प्रमाणात  ठेवाव्यात.प्रतिमाह 200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
  जीवामृत  व पाणी हे नेहमी दुपारी  12 वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या  बाहेर दयावे.

4.उभ्या झाडांमध्ये जीवामृत फवारणी वेळापत्रक :(वय 5 ते 10 वर्ष)
फळे तोंडणीनंतर तुटलेल्या देठाच्या भागांतुन स्त्राव बाहेर निघतो व त्या स्त्रावाची मेजवानी घेण्यासाठी हानीकारक बुरशी वाढायला लागते व फांदयामध्ये प्रवेश करतात व झाडांना बुरशीजन्य रोग होतात. म्हणून  जीवामृताच्या फवारणी व वाळलेल्या काडया काढल्या  पाहिजेत .
झाडाला विश्रांती दिल्यानंतर व फळ तोंडणी नंतर 2 महिण्यानंतर 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत गाळलेले ह्य फवारणी नंतर नवीन बहार येईपर्यंत प्रति महिना  फवारणे.   झाड जेव्हा फुलांवर येतात तेव्हा पासून  कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात.
फळ लागल्या नंतर(फळ धारणा) सुरूवात झाल्यानंतर आलटून पालटून  प्रत्येक 15 दिवसांनी जीवामृत व ताकाची फवारणी करावी
प्रमाण: 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत  200 लिटर पाणी + 6 लिटर आंबट ताक
जीवामृत 48 ते 72 तासात तयार होते. तयार झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरता येते. कारण 7 दिवसांपर्यंत किनवन क्रिया सुरळीत चालू  असते व संजीवकांची  निर्मीती अव्याहत चालू असते. परंतु 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू  होते व जीवामृताचा येतो जीवामृतामध्ये बाहेरचे कोणतेही संजीवक  वापरू नये. फक्त जीवामृताची फवारणी करावी.

जीवामृताच्या फवारण्या का?

1) जीवामृत हे जीवाणूचे  विरजन आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरशी नाशक, विषाणू  नाशक आहे. त्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशी, विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येते.
2) कोणत्याही  झाडाचे एक चौरस फुट पान प्रकाश संश्‍लेषनक्रिये द्वारे सुर्यप्रकाशातून  फोटान कणांचा रुपात  एका दिवसाला 12.5 किलो कॅलरीज गोळा करते. सोबतच मुळयांनी जमिनीतून  घेतलेल्या पाण्याशी व पानांनी घेतलेल्या कर्बाम्लाचे सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासून 4.5ग्रॅम अन्न निर्मिती होते. संध्याकाळी त्या अन्नाची विल्लेवाट लावले जाते. त्यापैकी काही  अन्न मुळयावाटे जमिनीतील जीवाणुंना खाऊ घातल जाते व काही अन्न श्वसनासाठी खर्च होतो. काही  अन्न दुसऱ्या दिवशीच्या झाडाच्या वाढीसाठी खर्च होतो व शिल्लक राहिलेल अन्न दाण्याचे  पोषण शेंगा व फळांचे पोषण होण्यासाठी वापरले जाते. किंवा  ऊसाच्या खोडामध्ये साठवले जाते. या एका दिवसात तयार झालेले अन्न 4.5 ग्रॅम अन्ना पैकी आपल्याला 1.5 ग्रॅम धान्याचे उत्पादन मिळते किंवा 2.25ग्रॅम फळाचे टनेज मिळतं .
जेव्हा आपण एक चौरसफुट पानांत 4.5ग्रॅम अन्न निर्मिती करतो तेव्हा आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्य व 2.25 ग्रॅम फळाचं  टनेज मिळतं . हा टनेज आपल्याला एक चौरसफुट पानावर जमा होणारी 12.5कॅलरी सूर्य ऊर्जा होय. म्हणजे जर आपण पानांचा आकार दुप्पट केला तर आपल्याला टनेजसुद्धा जास्त मिळेल. पानांचा  आकार वाढवणारे हारमोंस जीवामृतामध्ये असतात व जीवामृतांची फवारणी केल्याने आपल्याला चमत्कार दिसतो.
3) कधी कधी जोरदार पाऊस झाल्यानंतर किंवा पिकाला पाणी दिल्यानंतर मुळी जवळच्या सगळया पोकळया पाण्यांन भरतात त्यामुळे पोकळयांमधील हवा निघून  जाते व जीवाणूंना  व मुळयांना प्राण वायू मिळत नाही  व पिकं पिवळ पडतात  कारण जमिनीतून  नत्राचा पुरवठा थांबलेला असतो. अशा वेळी झिरोबजेट नैसर्गिक शेती मध्ये अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवामृतांची फवारणी केल्यानंतर जीवामृतात असलेले अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवाणू पानावर पसरतात व हवेतून नत्र घेऊन पानांना देतात. एवढेच नाही तर अशा आणीबाणीच्या काळात हवेत तरंगणारे धुळीचे कण हे जीवाणू खेचून घेतात व पानांना खनिजं  उपलब्ध करतात

1 thought on “जीवामृत माहिती : कसे बनवतात व कसे वापरता

 1. केळी विषयक माहिती पाहिजे सुरुवाती पासुन कोण कोण ते खत पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »