सुधारित कलिंगड लागवड new

4

सुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक
सिंचनाचा वापर – श्री. विनायक शिंदे-पाटील
आणि श्री. अंकुश चोरमुले

वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’
असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर
भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि
नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व
पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते.
तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर
भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये
झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची
लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.
कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व
लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही
उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची,
बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त
प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली
असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी
फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द
हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व
त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत,
वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत
व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते
लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज
असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्के असते.
याशिवाय कलिंगडात अ आणि क जीवनसत्त्वे
तसेच अल्प प्रमाणात प्रथिने आणि कर्बोदके
असतात. बिया आकाराने लहान व चपट्या असून
त्यांचा रंग पांढरा, काळा किंवा करडा
असतो, बियांपासून फिकट तेल मिळते. ते खाद्य
व दिव्यांसाठीही उपयुक्त असते. कलिंगडाची
फळे थंडावा देणारी व लघवी साफ करणारी तर
बिया पौष्टिक असतात. बिया पियुष व
थंडाईसारख्या पेयात वापरतात. कलिंगडाच्या
बियांतील मगज अर्धा तोळा व खडीसाखर
अर्धा तोळा एकत्र वाटून घेणे. पोटात दाह
झाल्यास कलिंगड खावे.
कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी
खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे,
सर्व स्थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले
वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी
असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात
मागणी असते. शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक
उन्हाळ्यात सतत लागणारी तहान
शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा
हमखास उपयोग होताना दिसतो.
आरोग्यवर्धक, व्याधीशामक, स्वदिष्ट असून
जाम-जेली, सौस निर्मितीत उपयुक्त असे हे फळ
आहे. सुकवलेल्या बिया आयुर्वेदिकदृष्ट्या
गुणकारी आणि पौष्टिक असतात. त्यामुळे
शेतकरी आता उच्च तंत्राद्यानच्या आधारे
बाराही महिने हे पीक घेऊ लागलेत.
श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश
चोरमुले
जमीन व हवामान :
हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते.
वालुकामय, पोयट्याची, मध्यम ते काळी,
पाण्याचा निचरा असणारी, सेंद्रिययुक्त
जमीन कलिंगड लागवडीसाठी उत्तम राहते.
आठपेक्षा जास्त सामू, चुनखडीयुक्त, चोपण
जमीन, लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा
जमिनीत अतिप्रमाणात असणार्या सोडियम,
केल्शियाम, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड,
कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य
क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग
पडण्याची शक्यता असते.
उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान चांगले
मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर
पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर
कलिंगडाची लागवड केली जाते. कलिंगडाच्या
उत्तम वाढीसाठी २२ ते २५ अंश सेल्सिअस
तापमान उपयुक्त असते. वाढीच्या
कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास
वेलीची वाढ व्यवस्थित होते नाही. पीक
रोगास बळी पडण्याची शक्यता असते.
सुधारित जाती :
कलिंगडाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि
संकरीत अशा अनेक जाती आहेत.
१) शुगरबेबी : हि दोन ते अडीच किलो वजनाची
फळे देणारी, अतिशय गोड, लाल आणि बारीक
बियांची ११ ते १३ टक्के साखरउतारा असणारी
हि जात विक्रीयोग्य आहे. फळांची साल गर्द
हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट
काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी
जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड
असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात
लागवड करतात. शुगर बेबी फक्त ७५ ते ८० दिवसात
हि फळं तयार होतात.
२) अर्का माणिक : हि लम्बवर्तुळाकार पांढरट
पट्टे असणारी ५ ते ६ किलो वजनाची फळं, गर्द
लाल रवेदार गार आणि १२ ते १५ टक्के साखर
असणारी हि जात. या जातीची फळे
आकाराने मोठी, गोल असतात. फळाची
साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड
सालीची असते. अर्का माणिक वाहतुकीस
आणि साठवणीस योग्य आहे. या जातीची फळे
१०० दिवसात तयार होतात.
३) असाही यामाटो : हि जपानी जात ४ ते ७
किलो वजनाची फळे देते. फिकट हिरव्या
रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी
कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे
मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड
गेली.
४) मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल
आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी
असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व
लाल असतो. या दशकात या जातीची
मागणी बर्यापैकी होती.
श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश
चोरमुले
५) मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात
असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे
वजन ६ ते ७ किलो भरते.
६) अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून
फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते
७ किलो वजनाची असतात. फळांच्या
सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी
कमी असते.
७) सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार
होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली
आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे
सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग
फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर
लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या
बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट
वाण. ही जात मरफक्युजॅरियम रोगास सहनशील
आहे.
८) ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार
होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून
बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे.
फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे.
फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय
गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून
बियांचा आकार लहान आहे. दूरच्या बाजारपेठेत
पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
९) शुगर किंग : अतिशय जोमाने वाढणारी मजबूत
वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग
काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक
लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर
रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे
सरासरी वजन ८-१० किलो आहे.
१०) बादशाह : ही जात जोमदार व लवकर तयार
होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली
आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे
असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे
सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर
अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला
गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास
योग्य अशी ही जात आहे.
या सुधारित जातींप्रमाणेच काही खाजगी
कंपनीच्याही भरपूर जाती मार्केटमध्ये उपलब्ध
आहेत. त्या जातींचा अनुभव लक्षात घेऊन
लागवडीसाठी निवड जरूर करावी. सध्या
सिंजेन्टा कंपनीची “ शुगर क्वीन ” ही जात
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये अतिशय प्रसिध्द
झालेली आहे. या जातीची लागवड करणाऱ्या
शेतकऱ्यांचे अनुभव खूप चांगले असल्याने दिवसेंदिवस
या जातीची लागवड वाढत आहे.
काही देशांत बिया नसलेल्या कलिंगडाच्या
जातीही विकसित केलेल्या आहेत. जपानमधील
‘झेंत्सुजी’ भागातील शेतकर्यांनी घनाकृती
आकाराची कलिंगडे तयार केली आहेत. फळ लहान
असताना ते काचेच्या पेटीत वाढून देतात. फळ
मोठे झाले की त्याला आपोआप चौरसाकृती
घनाकार प्राप्त होतो.
बियाणे : साधारणत: शेतकरी एक किलो बी
प्रती एकरी वापरतात. संकरित जातींचे एकरी
३०० ते ३५० ग्रॅम देखील बी पुरेसे होते. थंडीमध्ये
बियांची उगवण कमी होते. वाढ लवकर होत
नाही. यासाठी २५० ग्रॅम बियासाठी २५०
मिली गरम पाण्यात अगोदर बी भिजवून नंतर
सुकवून लावल्यास बियांची उगवण २ ते ३ दिवस
लवकर व निरोगी होते. मर होत नाही.
सर्वसाधारणपणे ६ ते ८ दिवसांनी बियांची
उगवण होते. लागवडी अगोदर बीजप्रक्रिया
करणे आवश्यक आहे.
श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश
चोरमुले
लागवडीचा हंगाम : कलिंगडाची लागवड १७ अंश
ते १८ अंश सेल्सिअस तापमानात थंडी कमी
झाल्यावर म्हणजे सर्वसाधारणपणे १५ डिसेंबर ते
१५ फेब्रुवारी दरम्यान करावी. फळे ऐन
उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये बाजारात
विक्रीसाठी तयार होतात. त्यांना मागणी
अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले
मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये
कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात
करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार
होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला
मिळतो
लागवड :
टरबूज लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी
करून प्रति एकरी चांगले कुजलेले १५ ते १६ टन शेणखत
किंवा कोंबडीखत जमिनीत मिसळून द्यावे.
त्यानंतर ट्रॅक्टर किंवा बैलांच्या साहाय्याने
वखराच्या दोन पाळ्या द्याव्यात.
रोटाव्हेटरचा उपयोग केल्यास खत चांगले
मिसळते. यानंतर गादीवाफे तयार करावेत.
गादीवाफ्याचा आकार दोन फूट रुंद व एक फूट
उंच ठेवावा. दोन गादीवाफ्यांमध्ये आठ फूट अंतर
ठेवावे. गादीवाफा तयार करत असताना
शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा
द्यावी.
खतमात्रा मिसळल्यानंतर गादीवाफा एकसमान
करून मधोमध ठिबकची लॅटरल टाकून ठिबक संचातून
पाणी सोडून लॅटरल तपासणी करून घ्यावी.
त्यानंतर गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा २५ ते
३० मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरावा.
हा कागद वाऱ्याने उडू नये म्हणून
गादीवाफ्याच्या कडेने त्याला मातीची भर
द्यावी. मल्चिंग पेपर लावताना पेपर
गादीवाफ्याला बेडला समांतर राहील, तो
ढिला पडणार नाही याची काळजी घ्यावी
कारण मल्चिंग पेपर ढिला राहिला तर
वाऱ्यामुळे फाटण्याची शक्यता असते. मल्चिंग
पेपर चा विचार करता एक एकरामागे साधारण
४ ते ५ किलो मल्चिंग पेपर लागू शकतो. रोप
लागवडीच्या आदल्या दिवशी लॅटरलच्या
दोन्ही बाजूंस १५ सें.मी. अंतरावर रोपं लावता
येतील अशा अंतरावर छिद्रे पाडून घ्यावीत.
एका ओळीतील दोन छिद्रांमधील अंतर दोन फूट
ठेवावे. छिद्रे पाडून झाल्यावर ठिबक सिंचन
संचाच्या मदतीने गादीवाफा ओला करून
घ्यावा. यानंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी
साधारण १२ दिवस वयाच्या रोपांची लागवड
करून घ्यावी. अशा प्रकारे लागवड केल्यास
एकरामागे साधारण ६००० रोपांची लागवड
करता येऊ शकते.
लागवडीच्या नियोजनानुसार कोकोपीट
ट्रेमध्ये टरबूजाची रोपे तयार करावीत. रोपे
तयार होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी
लागतो. या पिकांची लागवड दोन पद्धतीने
केली जाते. एक म्हणजे रोपे तयार करून आणि
दुसऱ्या पद्धतीमध्ये बियांची थेट
गादीवाफ्यामध्ये टोकण केली जाते. बी टोकन
पद्धतीमध्ये उगवणक्षमता कमी राहाते, त्यामुळे न
उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकण करावे
लागते. यामुळे रोपांची वाढ मागे-पुढे होते,
पुढील पीक व्यवस्थापनात त्याचा अडथळा
येतो, तसेच मजुरीही वाढते. या अडचणी लक्षात
घेऊन रोपे ट्रेमध्ये तयार करून लागवड करावी.
लागवडीपूर्वी बेड पूर्ण ओले करावेत.
गादीवाफ्यात वाफसा स्थिती आल्यावर
रोपांची लागवड सकाळी लवकर किंवा
संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी
झाल्यावर करावी. लागवडीपूर्वी रोपे १
टक्का कार्बेन्डॅझीमच्या द्रावणामध्ये बुडवून
घ्यावेत. गादीवाफ्यावर तयार केलेल्या
छिद्रांमध्ये रोपे सरळ उभी राहातील अशा
पद्धतीने लागवड करावी. रोपांची लागवड पूर्ण
झाल्यावर अर्धा तास ठिबक सिंचन संच चालू
ठेवावा. रोपांची लागवड करून झाल्यानंतर
पहिले सहा दिवस रोज १० मिनिटे किंवा
आवश्यकतेनुसार पाणी देण्यास सुरवात करावी.
नंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार
पाण्याचे नियोजन करावे. शेतात तणांचा
प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी
घ्यावी.
श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश
चोरमुले
अन्नद्रव्ये व्यवस्थापन :
या पिकाला माती परीक्षण अहवालानुसारच
रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा
द्यावी. एकरी २० किलो नत्र, १२ किलो
पालाश, १२ किलो स्फुरद या प्रमाणात
रासायनिक खते द्यावीत. १० दिवसांनी एकरी
२ किलो प्रत्येकी पीएसबी, अँझोटोबॅक्टर,
ट्रायकोडर्मा द्यावे. खतांची मात्रा
सुरवातीला कमी असावी. खते देताना संपूर्ण
शेणखत, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा व
नत्राची एक तृतीयांश मात्रा लागवडीच्या
वेळी द्यावी. उरलेले नत्र दोन समान हप्त्यांत
लागवडीनंतर एक आणि दोन महिन्यांनी द्यावे.
पिकाला फुले लागल्यापासून ते फळे परिपक्व
होईपर्यंत विद्राव्य मात्रा वाढवत न्यावी. खते
देण्यापूर्वी एक तासभर ठिबक संच चालू ठेवावा.
ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते
शिफारशीनुसार द्यावीत.
पिकाच्या
वाढीची
अवस्था
फवारणीच्या
खतांचा प्रकार
प्रमाण
प्रती
लिटर
पाणी
लागवडीनंतर
१० – १५
दिवसांत
१९:१९:१९ २.५-३
ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये २.५-३
ग्रॅम
वरिल
फवारणीनंतर
३०
दिवसांनी
२० टक्के बोरॉन १ ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये २.५-३
ग्रॅम
फुलोरा
अवस्थेत
००:५२:३४ ४-५
ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस्
(ग्रेड नं २)
२.५-३
ग्रॅम
फळ धारणा ००:५२:३४ ४-५
ग्रॅम
बोरॉन १ ग्रॅम
फळ पोसत
असतांना
१३:००:४५ ४-५
ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट २-२.५
ग्रॅम
पाणी व्यवस्थापन :
हे पिक पाण्याबाबत खूपच संवेदनशील आहे.
सुरवातीच्या काळामध्ये पिकाची पाण्याची
गरज कमी असते. पाच ते सहा दिवसांचे अंतराने
पाणी द्यावे. सकाळी ९ च्या आत पाणी
द्यावे. पुढे पीक वाढीनुसार पाण्याची गरजही
वाढत जाते. फळ लागण्याच्या कालावधीनंतर
पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी. पाण्याच्या पाळ्या
अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा
त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो.
जमिनीचा मगदूर आणि पीकवाढीचे टप्पे लक्षात
घेऊन ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी
आणि विद्राव्य खताचे नियोजन करावे.
पीक संरक्षण :
कीड : नागअळी, लाल भुंगेरे, फळमाशी इत्यादी
किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात
असतो. किडींच्या नियंत्रणासाठी बिगर
हंगामात शेतीची चांगली नांगरट व कुळवणी
करावी. म्हणजे लाल भुंगेरे, फळमाशी इत्यादी
किडींच्या सुप्त अवस्था नष्ट होऊन त्याच्या
बंदोबस्तासाठी मदत होईल.
१) नागअळी : टरबूज पिकात नागअळीचा
मोठा धोका असतो. ही अळी वेलीचे पान
पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट,
जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव
झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे
फळांचे पोषण होत नाही. फळे वेडीवाकडी
होऊन फळाची मागणी कमी होते. एकात्मिक
पद्धतीने किडींचे व्यवस्थापन करताना पिवळे
चिकट सापळे, फळमाशी गंध सापळे, प्रकाश
सापळे (लाईटट्रॅप) अशा तीन सापळ्यांचा
प्रयोग करावा.
२) लाल भुंगेरे : हे किडे रंगाने लाल असून
कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात.
३) फळमाशी : या किडीची मादी फळाच्या
सालीवर छिद्र पाडून फळात शिरते व तेथे अंडी
घालते. त्यामुळे आतून पुर्ण फळ सडण्यास सुरुवात
सुरुवात होते. फळमाशी नियंत्रणासाठी
किडलेली फळे जाळावीत. कोकण कृषी
विद्यापिठाने तयार केलेला रक्षक सापळा
वापरावा.
श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश
चोरमुले
रोग :
कलिंगडावर मर, भुरी, खोडावरील डिंक्या
आणि करपा हे रोग पडतात. रोगांपासून
संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास
थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची
अथवा ट्रायकोडर्मा जैविक रोगनियंत्रकाची
५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात
बीजप्रक्रिया करावी.
१) करपा : वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे
पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर
पसरल्याने दमट हवामानामध्ये करपा रोगाचे
प्रमाण वाढल्यास सर्व पाने गळून पडतात.
२) भुरी : पानांवर दोन्ही बाजूंनी पांढरी
बुरशी वाढून पाने भुरकट होऊन गळतात.
३) मर : बुरशीजन्य रोग असून वेळी संपूर्ण जळून
जातात. यासाठी जर्मिनेटर या औषधाचा
वापर बीजप्रक्रियेसाठी केल्यास मर होते
नाही.
विशेष काळजी : फळे लागल्यानंतर फळांचा
पाण्याशी संपर्क येणार नाही, याची
काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क
आल्यास फळे सडतात. यासाठी फळे दोन
सर्यांच्या उंचवट्यावर ठेवावी किंवा
फळाखाली चगाळ (भात, बाजरी, गव्हाचा
काड) ठेवावा. फळे एकाच जागी राहिल्यास
ज्या बाजूने जमिनीशी संपर्क येतो, तेथे फळांना
इजा पोचते. यासाठी फळे मोठी झाल्यानंतर
तोडणीआधी किमान एकदा फिरवून घ्यावीत.
प्लॅस्टिक आच्छादनामुळे फळांचा ओल्या
जमिनीशी थेट संपर्क येत नाही, त्यामुळे
फळांना इजा होत नाही. उन्हापासून फळांचे
संरक्षण करण्यासाठी हळदीचा
पालापाचोळा, उसाचे पाच गावात, इत्यादी
वापरून शेतातील फळे झाकून ठेवावीत. त्यामुळे
उन्हाचा चट्टा न पडता फळे हिरवीगार
राहतात.
काढणी व उत्पादन :
सर्वसाधारणपणे ४० दिवसांनी फूल लागण्यास
सुरुवात होऊन ६० दिवसांनी गुंड्या लागणे सुरू
होते. शक्यतो एका वेलीवर दोनच फळे ठेवावीत.
साधारणपणे ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस
येतात. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीसाठी
तोडेपर्यंत किमान ४० ते ४५ दिवस तापमान ३०
अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
साधारण जातीनिहाय एकरी २० ते ४५ टन
उत्पादन मिळू शकते. प्लास्टिक मल्चिंग चा
वापर केल्यास उत्पन्न वाढते. काढणी सकाळी
करावी. त्यामुळे फळांचा ताजेपणा व
आकर्षकता टिकून राहते व ती चवीला चांगली
रुचकर लागतात.
फळे काढणीस तयार झाल्याची लक्षणे :
फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार
होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या
बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा
आवाज येतो तर अपक्व फळांचा टणटण असा
आवाज येतो.
फळांच्या देठावरील लव फळ पक्क
होण्याच्या वेळी नाहीशी होते.
पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर
टेकलेला भाग पांढरट – पिवळसर रंगाचा
दिसतो.
कलिंगडाच्या देठाजवळील बाळी सुकते.
या वर्षी महाराष्ट्रात पावसाचे दुर्भिक्ष्य
शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरलाय. अशा
वेळी कमी पाणी असताना मल्चिंग पेपरच्या
मदतीने करण्यात येणारी शेती हा एक उत्तम
पर्याय ठरू शकतो. मल्चिंग पेपर च्या मदतीने अशी
नियोजनबद्ध शेती केल्यास मिळणाऱ्या
उत्पादनात होणारी वाढ हि खरोखरच
लक्षणीय आहे. मल्चिंग पेपर आणि ठिबकसिंचन
यांचा संगम शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा
देऊ शकतो. कमी पाण्याचा वापर आणि अधिक
उत्पादन या दोन्ही गोष्टींचा विचार केला
तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दुहेरी नफा मिळू
शकतो. पण, यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि
योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
Source:
– श्री. विनायक शिंदे-
पाटील, अहमदनगर.
पी.एच.डी. स्कॉलर, जुनागढ कृषी
विद्यापीठ, गुजरात.
श्री. अंकुश चोरमुले, सांगली.
पी.एच.डी. स्कॉलर, महात्मा फुले कृषी
विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर

4 thoughts on “सुधारित कलिंगड लागवड new

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »