कलिंगड व खरबूज लागवड

0

🌿🌾🌱 कृषी विकास 🌿🌾🌱

कलिंगड 🍉 व खरबूज🍈 लागवड:

जमीन व हवामान:
मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. या पिकांकरता जमिनीचा सामू(pH) ५.५ ते ७ योग्य असतो. दोन्ही पिकासाठी उष्णव कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. विलींची वाढ होण्या करिता २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच १८  अंश सेल्सिअस च्या खाली व ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व  फळधारणेवर  विपरीत परिणाम होतो. २१ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही.

लागवड हंगाम:
या पिकांची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते.

बियाण्याचे प्रमाण:
कालीगंडासाठी हेक्टरी २.५ ते ३ किलो बियाणे व खारबुजासाठी हेक्टरी १.५ ते २ किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रतीकिलो बियाणास ३ ग्रॅम थायरम चोळावे.

पूर्वमशागत:
शेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावीव एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले १५ते २० गाड्या शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी.

लागवड:
कलिंगड व खरबूजाची लागवड बिया टोकून करतात कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. या पिकांची लागवड खालील प्रकारे केली जाते.
१). आळे पद्धत –
ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३-४ बिया टोक्याव्यात.

२). सरी वरंबा पद्धत –
2 X ०.५ मीटर अंतरावर कलिंगडासाठी तर खरबूजासाठी १ X ०.५ मीटर अंतरावर ३ ते ४ बिया टोकून लावाव्यात.

३). रुंद गादी वाफ्यावर लागवड –
या पद्धतीतलागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेळ गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येत खरब होत नाहीत. यासाठी३ ते ४ मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोक्याव्यात.

खते व पाणी व्यवस्थापन:
दोन्ही पिकासाठी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश लागवडीपुर्व द्यावा व लागवडीनंतर १ महिन्यांनी ५०किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे वेलीच्या वाढीच्या काळात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर ८ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात कलिंगडाला साधारणपणे १५-१७ पाळ्या द्याव्या लागतात.

आंतरमशागत:
बी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढूनरान भुसभुशीत ठेवावे. रानातील म्होठले तण हातानी उपटून टाकावे. भारी जमिनीत बे पेरल्या नंतर पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडकहोतो. अशा जमिनीस प्रथमतः पाणी देऊन वाफसाआल्यानंतर बी टोकावे.

वाण
🍉कलिंगड🍉
1)अर्का ज्योती –
ही संकरितजात असून फळ मध्यम ते मोठ्या आकराचे फिकट हिरव्यारंगाचे व गडद हिरवे पट्टेअसलेले असून गरगडदगुलाबी व गोड असतो. ही जात साठवणूकीस व वाहतुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ८०० क्विंटल मिळते.

2)अर्का माणिक –
या जातीच्या फळांचा आकार अंडाकृती ,साल पातळ हिरव्या रंगाची असून गडदहिरवे पट्टे असतात. फळाचे वजन ६ किलो पर्यंत असते. हेक्टरी उत्पादन ६०० क्विंटल मिळते.

3)आशियाई यामाटो –
ही जपानीजात असून मध्यम अवधीत तयारे होते. फळांचे सरासरी वजन ७ ते ८ किलो असते. फळ फिकट रंगचे व गडदपट्टे असलेले असते. गर गडद गुलाबी व गोड असतो.

4)शुगर बेबी –
ही जात महारष्ट्रात लोकप्रिय आहे. फळ मध्यम आकाराचे ४ ते ५ किलो चे असून फळाचा रंग कळपात हिराव असून गर लाल अत्यंत गोड असून बिया लहान असतात.

5)न्यू हँम्प शायर –
ही जात फळांची लवकर येणारी जात अंडाकृती असून साल पातळ हिरव्या रंगाची व त्यावरहिरवे पट्टे असणारी असूनगर गडद लाल व गोड असतो.

या शिवाय दुर्गापुर केसर,अर्का माणिक,पुसा बेदाणा या जाती लागवडीस योग्य आहेत.

🍈टरबूज🍈
1)पुसा शरबती –
या जातीची फळांचा आकार गोल,किंचित लांबट ,साल खडबडीत जाळीयुक्त आणि मधून मधूनहिरवे पट्टे ,गर नारंगी रंगाचा व जाड असतो.

2)हरा मधु –
ही जात उशिरा येणारी असून फळांचा आकारगोल असतो. फळाची वरची साल पांढरी असून त्यावर खोलगट हिरवे पट्टे असतात. गर फिकट व हिरव्या रंगाचा गोड असतो,

3)अर्का राजहंस –
ही लवकर येणारी जात असून फळ मध्यम ते मोठे १ त्ये १.५ किलोचे असते. साल मळकट पांढरे असते. फळ गोड असून साठवनुकीस उत्तम असते. हेक्टरी उत्पादन ३२० क्विंटल मिळते.

4)दुर्गापूर मधु –
मध्यम अवधीत तयार होणारी जात असून फळे लांबट लहान असून साल फिक्कट हिरव्यारंगाची असते व त्यावर हिरव्या रंगाच्या धरी असतात. गर फिक्कट हिरव्या रंगाचा गोड असतो.

5)अर्का जीत –
ही लावकर येणारी जात असून फळांचे वजन ४०० ते ८०० ग्रॅम असते. फळे आकाराने गोल, आकर्षक व पिवळ्या रंगाचेअसते.

या शिवाय लखनऊ सफेदा, खारीधारी, फैजाबादी इत्यादी स्थानिक जाती लागवडीस योग्य आहेत.

रोग व 🐛कीड🐞
अ) रोग
1)भुरी –
या रोगाची सुरवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पंच्या पृष्टभागाव्रर वाढते त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.
उपाय – डीनोकॅप किंवा कार्बेन्दँझिम हे औषध ९०लिटर पाण्यात १० ग्रॅम या प्रमाणत मिसळून फवारावे.नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फवारवे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फावरणी करावी.

2)केवडा –
पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो.
उपाय- डायथेन झेड -७८ ०.२%तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल.

3)मार –
हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात. व कालांतराने मारतात.
उपाय – हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपुर्व १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे.

ब) कीड
1)फळमाशी –
या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते. त्यामुळे आळी फळातील गर खाते त्यामुळे फळे सडतात.
उपाय- कीड लागलेली व खालीपडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मेँलाँथीऑन या औषधाचा १ टक्का तीव्रतेचा फवारा मारावा.

2)तांबडे भुंगे –
बी उगूवूनअंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्यारंगाचे भुंगेरे उपजीविका करतात.

3)मावा –
हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडून मलूल पडतात.
उपाय- किड दिसल्यास मँलाँथीआँनहे औषध ०.१ टक्का या प्रमाणात फवारावे.

काढणी व उत्पादन:
कलिंगड व खरबूज काढणी फळ पुर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पत्रातील फळे बगयातीपेक्षाथोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यापासून ३ ते ३.५ महिन्यात काढणी सुरु होते व ३ ते ४ आवडयात पुर्ण होते.

आकार व रंगावरून फळांची पक्वता ठरविणे कठीण आहे. फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालील प्रमाने आहेत-
१) कलिंगडात देठाजवळ बाळी (टेन्दरील) सुकली किते तयार झाले असे समजावे.
२) तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ असा आवाज येतो. मात्र कच्चेअसल्यास ध्तुच्या वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो.
३) कलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा पंधुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे .
४) तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर असा फळातून आवाज येतो.
५) फळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसतो.

कलिंगडाचे व खरबुजाचे अनुक्रमे हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल आणि   १०० ते १५० क्विंटल येते.

       🌾🌾🍒🍎🍏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »