️डाळींब छाटणी नियोजन
️डाळींब छाटणी नियोजन
डाळींबाची छाटणी हंगामनिहाय बदलते. आंबे बहार किंवा मृग बहार धरण्याची तयारी चालू असेल तर छाटणी करताना जमिनीलगतचे फुटवे, झाडांत व झाडाबाहेर आडव्या वाढणाऱ्या फांदया, तेल्या युक्त तसेच इतर रोगांनी ग्रस्त फांदया काढून टाकाव्यात. वाळलेल्या फांद्या व वाळलेले काटे काढावेत, जिवंत काटा ,,,,त्याचे केवळ टोकदार टोक मारावे , त्याला मागे डोळे असतात व तेथेच फुले निघतात. आंबेबहारासाठी पेन्सिल साईजची काडी छाटली जाते, परंतु तापमानाचा अंदाज घेऊन रिफिल काडी व पेन्सिल काडी यांच्या दरम्यानच्या साईजची काडी छाटावी तसेच मृग व हस्त बहारातही मेनकाडीचे टोक , शेंडयाकडील भाग छाटावा, आतील जाळे काढावे, व्हाईट शुट अजिबात ठेवू नयेत.. उंदराच्या शेपटीप्रमाणे लोंबणाऱ्या सर्व बारिक काडया छाटाव्यात. छाटणीनंतर लगेच जिवामृत २०० ली. पाण्यासाठी २०ली. या प्रमाणात वापरावे. पहिले पाणी देण्यापूर्वी प्रति झाड २०० ग्रॅम घनजिवामृत आच्छादनाखाली ( जेथे पाण्याची व्यवस्था केली असेल तेथे म्हणजे घनजिवामृत ओले झाले पाहिजे)टाकावे.पहिल्याच पाण्याबरोबर जिवामृत देण्याची व्यवस्था करावी मात्र जिवामृत बनवितांना सेटिंग ६० % पर्यत होईल तोपर्यंत २०० ली. पाण्यात केवळ अडिच ली.गोमुत्र वापरावे. नैसर्गिक 🍂पानगळ🍂 होण्यावर जास्त भर दयावा. पाण्याच्या ठिकाणी कडधान्ये व झेंडू लागवड आवश्यक आहे.
बहार नियोजन करतांना शक्यतो हवामानाचा व जामिनीचा विचार करूनच बहार धरावा.तेल्याचा विचार करता व उत्पनाचा विचार करता शक्यतो
हस्त बहार -(सप्टें- आक्टोमध्ये फुल निघते ) किंवा
आंबे ( जाने-फेबु मध्ये फुल निघतात ) बहार चांगला असतो.
डाळींब हे अस्ताव्यस्त वाढणारे कोरडवाहु फळझाड आहे,,, परंतु तरीही पूर्वी डोगराळ भागात उत्तम फळे येत असत,,,, आपण आपल्या हव्यासापोटी डाळींबाला बागायती फळझाडाचे रूप दिले… म्हणूनच झाडास वळण देणे म्हणजेच छाटणी करणे ह्या दोन उपचारपद्धती वृद्धींगत झाल्यात…
💥डाळीबाला वळण देण्याचे / छाटणी करण्याचे उद्देश: –
१ ) झाडापासुन प्रकाश व हवा खेळती रहावी,,
२ ) झाडांच्या फांदया व आकार संतुलित राहावा,,,
३ ) बागेची मशागत, आंतरपिके, फवारणी, फळ काढणी यांना समस्या निर्माण होऊ नये,,,
४ ) झाडांची वाढ व विस्तार मर्यादित ठेवणे,,
५ ) बहाराची फुले व्यवस्थित येणे व फळांना इजा न पोहचणे…
वास्तविक गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ज्या फांदया हस्तांदोलन करून संघर्षात स्वतःची शक्ती वाया घालत असतील त्याच काढल्या पाहिजेत… माझ्या बागेत मी ४ वर्षापासुन छाटणी केलेली नाही मात्र फळे चांगल्या दर्जाची व उत्तम साईजचीच निघतात..
💥 वळण देण्याच्या / छाटणीचे प्रकार
१ ) मुख्य खोड पद्धत,,
२ ) मोकळा मध्यभाग पद्धत,,
३ ) अनेक खोड पद्धत ( चुकीची पद्धत आहे ),,
४ ) तीन किंवा चार खोड पद्धत,,
५ ) वळण देण्यासाठीची गोलाकार पद्धत,,
६ ) बहार धरण्यासाठीची छाटणी,,
७ ) नुतनीकरणाची छाटणी पद्धत,,,
८ ) पंजा छाटणी पद्धत,,
९ ) बारामती छाटणी पद्धत,,
१० ) रिफील काडी छाटणी पद्धत,,
११ ) पेन्सिल काडी छाटणी पद्धत,,
१२ ) एक काडी छाटणी पद्धत,,
१३ ) हस्तांदोलन फांदी छाटणी पद्धत…
Source:
✏️ तुषार भाटेवाल🖌
✏️९८६०९०३७११🖌
🙏नमन- सुभाष पालेकर गुरुजी🙏