सूत्रकृमींचा प्रादुर्भाव व उपाययोजना

0

सूत्रकृमींचा प्रादुर्भाव व उपाययोजना

📝 *- डॉ. मंदिनी गोकटे नरखेडकर, भाऊसाहेब नाईकवाडी*

सूत्रकृमींना सामान्यपणे गोलाकार जंत असे म्हटले जाते. त्यांचा दंडगोलाकार व दोन्ही बाजूला निमूळता असून, शरीराचे भाग पडत नाहीत. सूत्रकृमींचे विविध प्रकार असून, माणूस, प्राणी, वनस्पती व कीटक यांनाही ते हानी पोचवतात. काही सूत्रकृमी हे जीवाणू व बुरशीवर, तर काही सूत्रकृमी दुसऱ्या सूत्रकृमींना खाऊन जगतात. बहुतेक वनस्पती परजीवी सूत्रकृमी २ मि.मी. पेक्षा लहान असून, डोळ्यांना सहज दिसत नाहीत. सूक्ष्मदर्शकांखाली पाहिल्यास गांडुळासारखे दिसतात. त्यांच्या हालचाली नागमोडी असतात.

*- सूत्रकृमींमुळे होणारे नुकसान -*

– बहुतांश पिकांवर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो. केवळ सूत्रकृमी प्रादुर्भावामुळे जागतिक उत्पादनात सुमारे १० टक्क्यांपर्यंत घट होत असल्याचे अनुमान आहे.
– वनस्पती परजीवी सूत्रकृमी झाडांच्या मुळ्यांना इजा करून, त्यात सुईसारखी सोंड खुपसून विशेष द्रव्य सोडतात. तसेच रस शोषून घेतात. झाडांना कमी अन्नद्रव्य व पाणी मिळाल्याने त्यांची वाढ खुंटते.
– झाडे अन्य रोगांनाही सहज बळी पडतात.

– पिकांमधील सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कसा ओळखावा?
– सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे झाडे कोमेजतात व पिवळी पडतात. कपाशी शेतात पिवळे पडलेले पट्टे, तसेच वाळलेल्या वनस्पतींची वारंवार पाहणी करावी. उन्हाळा, दुष्काळ अशा प्रतिकूल परिस्थितीसाठी आवश्यक सहन क्षमता कमी होते. बोंडाचा आकार लहान राहतो. लिंटची टक्केवारी कमी होते. एखाद्या विशेष पट्ट्यात येणारी झाडे कमकुवत आणि पिवळी पडत असल्यास, त्या ठिकाणी सूत्रकृमींची समस्या असू शकते.
– खुरटलेल्या झाडांची मुळे तपासावीत. मुळांमध्ये सोटमुळांचे प्रमाण अधिक, लहान मुळे कमी असल्यास किंवा झाडांची मुळे काळसर व चट्टे असलेली असल्यास सूत्रकृमींची समस्या असू शकते.
– सोयाबीन, हरभरा, वाटाणा यांसारख्या शेंगावर्गीय पिकांच्या मुळावर असलेल्या गाठी व सूत्रकृमींच्या गाठी यात फरक असतो. नत्र स्थिरीकरणाच्या गाठी मुळांपासून वेगळ्या करता येतात. मात्र, सूत्रकृमींमुळे झालेल्या गाठी झाडांच्या मुळ्यापासून अलग करता येत नाहीत.
– जमिनीच्या योग्य मशागतीनंतरही कपाशीला बोंडे आणि लिंटचे प्रमाण कमी राहत असल्यास, पिकांमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असू शकतो.

*कापसामध्ये आढळणारे सूत्रकृमी -*
– कापसामध्ये १९ प्रकारचे सूत्रकृमी आढळून येतात. भारतीय संदर्भानुसार पुढील काही सूत्रकृमींच्या महत्त्वाचा सर्वसामान्य प्रजाती आहेत जसे की, रोटीलेनकस रेनिफोरमिस, मेलिडोगायना इनक्वागनेटा, होप्लोलेमस स्पे. प्रेटीलेनकस स्पे आदी.
– भारतात सर्वत्र आढळणाऱ्या रोटीलेनकस रेनिफोरमिस या प्रजातीला सामान्यतः रेनिफार्म सूत्रकृमी म्हणतात. ही प्रजात प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण भारतात कापसामध्ये व ११५ पेक्षा जास्त वनस्पती प्रजातीवर आढळते. या सूत्रकृमींच्या अ आणि ब रेनिफॉर्म अशा दोन प्रजाती असून, त्यातील फक्त अ प्रजाती कपाशीमध्ये आढळते. या सूत्रकृमींमुळे कपाशीचे सुमारे १४.७ टक्के नुकसान होते. उत्पादन घट, लिंट टक्केवारी आणि धाग्याचा विस्तार कमी होतो. तसेच सूत्रकृमी प्रादुर्भावामुळे कपाशीत मर रोगाचे प्रमाण वाढते. या सूत्रकृमीची मादी मूत्रपिंडाच्या आकाराची असते.

*- मूळगाठ सूत्रकृमी मुख्यतः* पंजाब आणि हरियाना राज्यांतील मुख्यतः अमेरिकन जातीच्या कापसामध्ये आढळून येतो. या सूत्रकृमींच्या पाच प्रजातींपैकी ३ आणि ४ या प्रजाती कापसावर हल्ला करतात. प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या मुळ्यावर गाठी दिसतात. या सूत्रकृमींची सहिष्णुता मर्यादा २७ अंडे/ पिले प्रति १००० ग्रॅम माती ही आहे. या सूत्रकृमींची मादी गोलाकार असते.
– होप्लोलेमस स्पे. या प्रजातीला सर्वसाधारणपणे लान्स नेमाटोड म्हणतात. त्यांचा प्रादुर्भाव झाडांच्या रोपावस्थेत होतो. ही सूत्रकृमी प्रामुख्याने रस वाहिन्यावर हल्ला करते. त्यातील रस शोषण करते. या सूत्रकृमीमुळे मुळांवर वरील भागात घट्ट पट्टा तयार झाल्याने पाणी वाहून नेण्यात मुळांना अडचणी येतात.
– लीजन सूत्रकृमी प्रेटीलेन्कस स्पे. या सूत्रकृमींचा कापसामध्ये प्रादुर्भाव होतो. सूत्रकृमींमुळे सुरवातीला मुळ्यावर लहान आकाराचा पाणीदार व्रण किंवा चट्टा निर्माण होतो. नंतर हे चट्टे मोठे होत जातात. झाडांची पाने आखडून, ती पिवळी पडतात. झाडांची वाढ पूर्णपणे खुंटते. जोम कमी होऊन हळूहळू ते कोमेजून जाते.

*- सूत्रकृमींमुळे वाढतो अन्य रोगांचा प्रादुर्भाव -*

– सूत्रकृमींनी झाडांच्या मुळांना इजा करत असल्याने अन्यत जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांचा सहज प्रसार होतो.
– सूत्रकृमी आणि फ्युझारियम या बुरशीचा प्रादुर्भाव एकाच वेळेस झाल्यास, झाड

📚  *माहिती संदर्भ अग्रोवन*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »