केंद्र सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना

0

केंद्र सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना

केंद्र सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे व उपकरणांच्या खरेदीसाठी अनुदान पुरवठा करण्यात येतो. सदरअनुदान ट्रॅक्‍टर, ट्रॅक्‍टरचलित अवजारे, बैलचलित अवजारे व स्वयंचलित अवजारे, महिला व शेतमजूर यांच्यासाठी लागणारी अवजारे, कृषिपंप, फलोत्पादनअवजारांसाठी वापरता येतो. 40 अश्‍वशक्तीपर्यंतच्या ट्रॅक्‍टरसाठी किमतीच्या 25 टक्के अनुदान देय असते. या योजने अंतर्गत येणारी काही अवजारे आणि यंत्रे: पॉवर टिलर, ट्रँक्टर, मल्टी क्रॉप थ्रेशर, कल्टीव्हेटर इ. या शिवाय अनेक यंत्रे या योजनेत समाविष्ट आहेत.

केंद्र पुरस्कृत राबविण्यात येणाऱ्या ह्या योजनेच्या अधिक माहिती साठी     कृषी अधिकारी,पंचायत समिती यांना भेटावे.

   राज्यामधे नाफेड कडून मुग खरेदी सुरू. एफ ए क्यू प्रतीच्या मुगाची खरेदी हमी भावाने ४८००+४२५ बोनस एकूण ५२२५ रू. प्रती क्वींटल या आधारभुत किंमतीतखरेदी  आठवड्याच्या सर्व दिवस सुरू राहणार.  मुग खरेदी केंद्रावर आणतांना घ्यावयाची काळजी-१. मुगाची चाळणी करूनच आणावा. २. मुगामधे १२% पेक्षा जास्तकामा नये. ३. मुग केंद्रावर आणतांना ७/१२ उतारा सोबत आणावा. 

·         प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

      ऑनलाइन अर्ज त्वरित करा.

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, ज्या शेतकरी बांधवांनी सन २०१६-२०१७ (१ एप्रिल २०१६ नंतर आतापर्यंत ) या सालात ठिबकसिंचन संच बसविले आहे.अशा शेतकऱ्यानी अर्ज/प्रस्ताव आँनलाईन करावेत.       तसेच इतर शेतकऱ्याना माहिती द्यावी ही विनंती. दिनांक ०७/०९/२०१६ ते०६/१०/२०१६ पासुन या कालावधितच चालु राहणार आहे.

अनुदानासाठी लागणारे कागदपञे:

१.७/१२ ,८अ, पिक नोंद

२.स्टँम्प पेपर १००रू -१

३.बँक पासबुक झेरॉक्स-१क

४.आधार कार्ड झेरॉक्स -१
Krushi-vikas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »