अशी ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता

0

अशी ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता :

1) नत्र – झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते,
फूट व फळे कमी येतात.

2) स्फुरद – पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

3) पालाश – पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

4) जस्त – पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो.
पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

5) लोह – शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ
खुंटते.

6) तांबे – पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद
वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.

7) बोरॉन – टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन
पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने
मरतात.

9) मॉलिब्डेनम – पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात.
पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

10) गंधक – झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.
________________________
P पचवन्यासठि पिकाला–
Zn Mn Fe B लागते.

N पचवन्यासठि —
Mo Cu S B लागते.

K पचवन्यासठि–
Ca Mg B लागते.

N जास्त झाल्यावर–
K Mo Ca Mg कमी पडते.

P  जास्त झाल्यावर —
Zn Cu Fe N कमी पडते.

K जास्त झाल्यावर–
Mg N Ca B Mg K Ca कमी पडते.

Ca जास्त झाल्यावर–
P Mg Zn B कमी पडते.

Zn जास्त झाल्यावर —
Ca Fe K कमी पडते.

Fe जास्त झाल्यावर–
Cu Zn P Mn कमी पडते.

Cu जास्त झाल्यावर–
Mn Fe कमी पडते.

Na जास्त झाल्यावर–
K Ca Mg कमी पडते.

            म्हणून अन्नद्रव्ये बेलेन्स करून दिली पाहिजेत.

  म्हणजे एक जास्त झाल्यावर दूसरे कमी पडू नये आणि पिकामधे अडचणी येवू नये.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »