पपई वरिल काळे ठिपके
पपई वरिल काळे ठिपके
पपई वरिल काळे ठिपके सरकोस्पोरा पपयी या बुरशी मुळे होतो.
पानांवर करड्या तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. जास्त प्रमाणात संक्रमण असल्यास पपई ची रोगग्रस्त पाने पिवळी पडतात व सुकुन जातात. फळांवर देखिल ठिपके दिसुन येतात.
रोगाच्या नियंत्रणासाठी डायथोन एम ४५, जिनेब, कॅपटन, कॉपर औक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड, यापैकी एकाची १० दिवसांच्या अंतराने दोन वेळेस फवारणी घ्यावी.
  
पपई वरिल डॅपिंग ऑफ
पपई वरिल डॅपिंग ऑफ हा रोग अनेक प्रकारच्या बुरशी मुळे होत असतो. या बुरशींमध्ये पिथियम अफिनीडर्माटम, पिथियम अल्टियम, फायोटप्थोरा पॅरासिटिका, तसेच रायझोक्टोनिया स्पे. चा समावेश होतो.
बुरशी जमिनीत राहते, आणि कोवळ्या रोपांवर हल्ला करते. रोगाची लागण प्रामुख्याने उबदार आणि ओलसर वाचावरणात जास्त प्रमाणात होते. पाण्याच्या संतुलनात बिघाड झाल्यास देखिल रोगाची त्वरित लागण होते.
रोपांच्या खोडात पाणी जमा झाल्या सारखे ते नरम पडते, व खोड खाली झुकुन जाते, व मरुन जाते.
रोगाचे नियंत्रण शक्य नाही, मात्र रोग येवु नये म्हणुन पिकास नियमित पाणी पुरवठा करवा, पाणी देतांना खुप जास्त किंवा खुप कमी असा फरक अचानक करु नये. रोप लागवड केल्यानंतर ट्रायकोडर्मा व्हीरीडे बुरीशीचा वापर करावा. रासायनिक बुरशीनाशकांत मेटालॅक्झिल, कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचा वापर केवळ प्रतिबंधकात्मक बुरशीनाशक म्हणुन कराता येतो. रासायनिक बुरशी नाशक वापरित असल्यास ट्रायकोडर्माचा वापर करु नये.
या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा चा वापर हा रासायनिक बुरशीनाशकांपेक्षा जास्त प्रभावशाली ठरतो. रासायनिक बुरशीनाशके जमिनीत नष्ट होत असल्याने जास्त काळासाठी संरक्षण प्रदान करु शकत नाहीत. मात्र ट्रायकोडर्मा बुरशीसाठी हि मर्यादा राहत नसल्याने जास्त काळ संरक्षण मिळते. ३० दिवसांच्या अतराने ��