टोमाटो उत्पादन तंत्र updated

0

टोमाटो उत्पादन तंत्र
लागवडीची वेळ: वर्षभर लागवड करू शकता
हवामान: सरासरी 24 ते 28 सें. ग्रेे मासिक तापमानात झाडे चांगली वाढतात. दव नसलेले हवामान पिकास मानवते. फळे पिकून चांगला रंग येण्यासाठी व भरघोस उत्पादन होण्यासाठी पिकास उबदार उन्हाळी हवा मानवते. टोमॅटो हे समशितोष्ण हवामानात येणारे नाजूक पीक असल्याने बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, झिमझिम वा मुसळधार पाऊस, धुई, धुके सुरकी, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही

जमीन: टोंम्याटों लागवडीसाठी मध्यम, भूसभूसीत, वालुकामय, पोयटायुक्त जमीन योग्य असते. भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन योग्य.  पाणथळ, अतिशय भारी ,चोपण, चिंबट जमिनीत टोंम्याटों लागवड करू नका. टोमॅटोच्या केशमुळ्या ह्या जमिनीच्या वरील १ फुट थरात पसरत असल्याने हलक्या जमिनीत हे पीक घेतले जाऊ लागले. हे पीक हलक्या ते मध्यम, तांबूस, करड्या भरपूर निचरा होणाऱ्या जमिनीत येऊ शकते.

मशागत: लागवडीपूर्वी खोल नांगरणी करून एकरी 10 ते 12 टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे 1 ते 2 वखराच्या पाळ्या देऊन गादी वाफे तयार करून घ्यावे

लागवडीची दिशा: पूर्व पश्चिम दिशेने लागवड केल्यास हवे मुळे प्लॉट पडायची भिती टळते.
बियाणे चे प्रमाण: 40 ते 50 ग्राम प्रति एकर

लागवडी चे अंतर: दोन ओळीतील अंतर 4 ते 5 फुट
लागवडी पूर्वी: सध्या पाण्याची कमतरता म्हणा किंवा सुधारीत तंत्रज्ञाना मुळे म्हणा बरेच शेतकरी ड्रीप व मल्चिंग पेपरचा वापर करत आहेत त्यामुळे मातीची भर देणे किंवा भरखत देण्याचा प्रमाण खुप कमी झालेला आहे. ह्या सुधारीत शेती पद्धत मुळे परिपूर्ण व भक्कम बेसल डोस देऊन विद्राव्य खता द्वारे टोमाटो उत्पादन घेण्यावर ज्यास्ती ज्यास्त शेतकऱ्यांचा कल आहे.
ज्या जमिनीत टोमॅटो, भेंडी, वांगी, बटाटा, वेलवर्गीय भाज्या व फळे आधीच्या हंगामात केली असतील तिथे टोमॅटोचे पीक काढण्याचे टाळावे कारन तेथे पहिल्या पिकावरील राहिलेल्या रोगांचे जंतू / कीड पटकन या पिकांचा आश्रय घेते व त्यामुळे रोग व कीड आटोक्याबाहेर जाते

बेसल डोस
100 किलो डी.ए.पी २) 200 किलो 10:26.26 ३) 5 किलो थैमेट ४) 150  किलो निम्बोळी पेंड ५) 10 किलोसूक्ष्म अन्न द्रव्य ६) 20 किलो बेनसल्फ ७) 25 किलो बायोझाईम दाणेदार ८) 100 किलो दुय्यम अन्नद्रव्या

लागवडीनंतर मर रोगास
एकरी बायोझाईम ड्रिप 1ली+   रोको-250 + कोसाॆईड- 250 चुळ दयावी.
पुन्रलागवडी नंतर 4 ते 5 दिवसा आड ड्रीपन देणे.
1
8 ते 34
19:19:19
2 ते 3 किलो

40 ते 61
12:61:00
2 ते 3 किलो

3
64 ते शेवट पर्यंत
00:52:34 / 13:40:13
3 ते 4 किलो
आलटून पालटून द्यावे

4
तोडे चालू झाल्या नंतर दर 10 दिवसांनी 4 किलो 00:00:50 किंवा पोटाशिम सोनेट द्यावे

टिप: वरील खतांच्या मात्रा मार्गदर्शना साठी आहेत. माती परिक्षण व प्रत्यक्ष अनुभव या अनुसार बदल करावेत

पीक संरक्षण: पिकाची व्यवस्तीत पाहणी करुनच पीक संरक्षण चे उपाय करावेत
अ.
किडी व रोग
औषधाचे प्रकार

1
लाल कोळी ओमाईट, डायकोफाल, मेजीसटर, मिटीगेट,मेडन

2
पांढरी माशी
करंज तेल, लासट्रा, लानो, असिफेट, उलाला, सोलोमोन, ओबेरॉन

3
फुल किडे
कराटे, अक्टारा,ईव्हेडंट, रिजेंट, ट्रेसर, कॉन्फिडोर

4
फळ पोखरणारी आळी
लार्वीन + नुअन, कोराजेन, स्पिनोसाड,काईट,प्लेथोरा, हमला,क्रीयाक्रोन

5
करपा
रोको,कर्झेट, कब्रिओ टोप, अमिस्टर, रिडोमिल

5
भुरी
कॉटाफ, इंडेक्स, काराथेन,रीडीम, सेकटीन, रोको, टिल्ट

6
वायरस
पांढऱ्या माशी चे नियंत्रन करणे

अधिक उत्पादन व व्यवस्थापना साठी सूचना:
शक्यतो लागवडीच्या ८ दिवसाआधी ३ दाट मक्याच्या ओळी चारी बाजुने पेरून घेतल्यास फुलकिडे व पांढरी माशी च चांगला नियंत्रण होऊ शकतो विशेष करून उन्हाळ्यात लावल्यास उन्हाची झळ मक्यावर येऊन टोमॅटोच्या झाडास त्रास होत नाही
प्रत्येक ओळी मध्ये कमीतकमी एक ते दोन झेंडू चे रोप लावल्यास येणाऱ्या किडी व रोगांची कल्पना आपल्याला लवकर कळू शकते व त्या अनुशंघाने आपण उपाय योजना राबवू शकतो आणी झेंडू मुळे सुत्रकृमीच पण उत्तम नियंत्रण मिळु शकते
लागवड करते वेळेस रोपांना अंगठ्याने दाबुन नये त्यामुळे रोपाची वाढ खुंटते, मुळी वाकडी होऊन पिकास अन्नपुरवठ्यास अडचण होते आणि एक महिन्याने झाडाच्या शेंड्यावर गोजी होऊन झाड रोगट बनते
मातीची भर देते वेळेस जर शेण खत वापरल्यास फळ वाढीमध्ये खूप मदत होते असे दिसून आले आहे
दोन पाण्याच्या पाळ्यात मोठा खंड पडू देवू नका, त्यमुळे फुल गळ, फळ गळ किंवा फळे तडकणे हे धोके निर्माण होतात
फुलधारणे पासुन कॅल्शियम नईट्रेट (३ किलो प्रती एकर) दर 12 दिवसांनी द्यावे. कॅल्शियम नईट्रेट दिलेल्या दिवशी विद्र्व्या खत देऊ नये.
कॅल्शियम नईट्रेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिजाईस-200 +बोरान 100ग्राम प्रती 200 ली.पाण्यास दिल्यास फुल गळ थांबून फळधारणा चांगली होण्यास मदत होते
जुने तार बांबू वापरत असाल तर वापरण्याआधी मेडन 200 मीली व सल्फर 200 ग्राम 200 ली. पाण्यास हे
कोळीनाषक ची फवारणी घेतल्यास सुप्त अवस्थेत असलेल्या कोळी च नियंत्रण होऊन पुढील संकट टाळता येते
पिवळे व निळे चिकट सापले लावल्यास रस शोषक किडी चा उपद्रव कमी होतो.

टिप:आपला अनुभवाने व हवामान,या अनुसार टोमाटो व्हरायटी करावी.               
🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »