द्राक्ष व्यापाऱ्यांकडून चार शेतकऱ्यांची २१ लाखांची फसवणूक

0

द्राक्ष व्यापाऱ्यांकडून चार शेतकऱ्यांची २१ लाखांची फसवणूक

Grape Farmer : द्राक्ष खरेदी पोटी धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे.

Nashik News : द्राक्ष खरेदी पोटी धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चांदवड, उगाव व कोपरगाव येथील द्राक्ष व्यापाऱ्यांनी सुमारे ४ शेतकऱ्यांची २१ लाख ७९ हजार ३८० रुपयांची फसवणूक केली असून, याप्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी योगेश परसराम भंडारे (रा. कारखाना रोड) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. यामध्ये योगेश भंडारे (११ लाख), बाळासाहेब खंडेराव भंडारे (५ लाख), (धनंजय जगन्नाथ पाटील (३ लाख ५३ हजार), ज्ञानेश्वर भाऊसाहेब भंडारे २ लाख २६ हजार याप्रमाणे एकूण चौघा जणांची फसवणूक झाली आहे.

त्यानुसार संशयित व्यापारी आलम आमीन बागवान (रा. बागवान गल्ली, चांदवड), कलीम बागवान (रा. गांधीनगर, कोपरगाव) व वसीम ऊर्फ फिरोज युसूफ शेख आणि बबलू शेख (दोघे रा.उगाव, ता. निफाड) यांनी एप्रिल महिन्यात संगनमताने भंडारे यांच्यासोबत कसबे सुकेणे शिवारातील द्राक्ष माल खरेदीचा व्यवहार केला होता.

५५ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती

मार्च व एप्रिल महिन्यांत या व्यापाऱ्यांनी द्राक्ष मालाची खरेदी केली आहे. त्यातील फसवणूक झालेल्या चार शेतकऱ्यांच्या वतीने ओझर पोलिस ठाण्यात देण्यात आली. मात्र ओझर, पिंपळगाव परिसरात जवळपास ५५ शेतकऱ्यांची याच व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याची चर्चा आहे.

धन्यवाद

🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »