पहा स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्र :Automatic Sowing Machine

0

Automatic Sowing Machine : स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्राने करा पेरणी

Kharif Season : बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राचा सुवर्णमध्य स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्रामध्ये साधण्यात आला आहे.

Sowing Machine : पारंपारिक नांगर किंवा बैल चलित पेरणी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, या पद्धतीमध्ये जास्त बियाणे प्रमाण, असमान बी पडणे, पेरणीसाठी जास्त वेळ लागणे अशा समस्या होतात.

अलीकडे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचा वापर वाढला असला तरी लहान शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखे नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राचा सुवर्णमध्य स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्रामध्ये साधण्यात आला आहे.

या यंत्रामध्ये प्रामुख्याने प्राईमओव्हर (इंजिन असलेला भाग) आणि पेरणी यंत्र या दोन भागांचा समावेश आहे.

सयंत्राची वैशिष्ट्ये :

सयंत्र ३.६ किलोवॅट पेट्रोल इंजिनद्वारे चालविण्यात येते.

यंत्र ३ फाळांसहित येते. फाळामधील अंतर २० ते ३५ सेंमी पर्यंत बदलता येते. तसेच जमिनीत २ ते ६ सेंमी खोलीपर्यंत काम करता येते.

बियाणे आणि खतासाठी वेगवेगळे भाग असतात. नियंत्रित खत आणि बियाणांचा वापर होतो.

यामध्ये तिरकट प्लेट (इन्क्लाइंड प्लेट) यंत्रणेचा वापर करून एका सरीमधील बियाणांमध्ये एकसारखे अंतर राखले जाते. प्लेट्स बदलून विविध प्रकारच्या पीक पेरणीसाठी याचा वापर होतो.

प्राईमओव्हर पेरणी यंत्रापासून वेगळे करून त्याचा वापर आपण अन्य शेती कामांसाठी देखील करू शकतो.

चालकाला कमी श्रम लागतात.

कार्यक्षमता ०.११२ हेक्टर प्रति तास आहे.

पेरणीपूर्वी यंत्राची जोडणी कशी करावी?

पेरणी करताना शिफारस असलेल्या खोलीवर बियाणे पडेल अशी गेज चाकांची जोडणी करावी.

गेज चाकांची जोडणी करताना यंत्र समपातळीत असल्याची खात्री करून घ्यावी.

पिकानुसार बियाणांची मीटरींग प्लेट बियाणांच्या बॉक्समध्ये बसवून घ्याव्यात.

तसेच मीटरींग प्लेट व फ्लूटेड रोलरचे कॅलिब्रेशन योग्य पद्धतीने करावे. बियाणे व खते योग्य मात्रेमध्ये पडत असल्याचे खात्री करून घ्यावी.

प्राइम ओव्हर मधील तेल व इंधन तपासून घ्यावे.

बेल्टचा ताण तपासून घ्यावा. चैन व स्प्रॉकेटचा ताण व ते सरळ रेषेत असल्याची खात्री करून घ्यावी.

चाकांचे बेअरिंग्ज तपासून घ्यावेत.

धन्यवाद

🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »