Kharif Crop Sowing : खरिप पिकांची पेरणी कधी करावी? पेरणीची योग्य वेळ कोणती?

0

यंदा माॅन्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाल्याने असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या रखडल्या आहे.मात्र राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या काही ठिकाणी पेरणीची लगबग सुरू असून शेतीच्या कामांनी वेग पकडला आहे. शेतकरी जमिनीची पूर्व मशागत करून पेरणी करताना दिसत आहे.

जोपर्यंत जमिनीत पुरेशी ओल होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये.कमी कालावधीच्या पिकांची पेरणी लवकर करावी. मूग, उडीद, तुर, सोयाबीन यांची लवकर पेरणी करावी. शक्यतो या पिकांची लागवड ही कोरडवाहू जमिनीतच करावी जेणेकरून त्यांना अतिरिक्त पावसाचा फटका बसणार नाही. कपाशीसाठी लागवडीच्या वेळेस खताची मात्रा द्यावी. शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा झिंक सल्फेट ८ ते १० किलो, गंधक २ किलो प्रति एकरात वापरावे.

सोयाबीन बियानाची उगवण क्षमता तपासूनच त्याची लागवड करावी. सोयाबीन पिकात खोड माशी, खोड किड्यांचा प्रभाव टाळण्यासाठी विटाव्हॅक्स ३ ग्रॅम प्रति किलोसाठी वापरावे. पेरणी करत असताना २ ते ४ सेंटीमीटर अंतरावर वरच करावी जेणेकरून जास्त खोलात पेरणी झाल्यास त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. गरजेनुसार स्फुरद आणि पालाश एकरी ८ ते १० किलोचा वापर केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

तूर या पिकासाठी प्रतिबंधक वाणाची निवड करावी.घरच्या वाणाची निवड करू नये. तूर या पिकालासुध्दा १० किलो प्रती एकर स्फुरद वापरावे.जास्त पाणी झाल्यास निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या जेणेकरून तुरीवर मर येणार नाही.पेरणी करतांना पिकानुसार जमीनीची निवड करावी.

सौजन्य – BBC News, मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »