Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

0

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम व रब्बी हंगामात राबविण्यात येणार आसून सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी ही योजना लागू आहे.या योजनेमध्ये परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान ,पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट या बाबींचा समावेश आहे.या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.पीकविमा संरक्षण मिळविण्यासाठी तसेच योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.अंतिम दिनांकापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

१) शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पोर्टलवर नोंदणी करता येईल.

२) तसेच पीक विम्यासाठी अर्ज करायचा असल्यास शेतकरी सरकार केंद्र किंवा CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर)मध्ये जाऊन अर्ज करू शकतात.

३) दुसर म्हणजे बँकेत, तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून अर्ज करू शकता.

४) पंतप्रधान पीक विमा (Pik Vima २०२३) योजनेच्या वेबसाईटवर शेतकरी स्वत: देखील अर्ज करू शकतात. म्हणजेच National Crop Insurance Portal (NCIP) यावर.

Pik Vima २०२३

कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी ?

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी : नगर, अमरावती, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, नागपूर जिल्हा (टोल फ्री क्रमांक 18001024088, दूरध्वनी क्रमांक 02268623005)

एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स : बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर जिल्हा ( संपर्क 18002660700, 02262346234)

भारतीय कृषी विमा कंपनी : बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव जिल्हा (संपर्क 18004195004, 022 61710912)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »