Rain Update : जाणून घ्या राज्यात कोणत्या भागात पडणार पाऊस?कोणत्या जिल्ह्यात काय परीस्थिती?

0

राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस पडत होता.मात्र आता मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.हवामान खात्याने मुंबईत ५ जुलैसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आणि ६-७ जुलैसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.गेल्‍या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण राहात असले तरी नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसलेला नाही.जुलै महीना चालू झाला तरी पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.शहरवासीयांच्‍या देखील नजरा आकाशाकडे लागून आहे.नाशिक जिल्ह्यात ९ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड,निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या सलग तीन ते चार दिवस पेरणीयोग्य ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय करु नये, असा सल्ला इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ ते ८ जुलै दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.तसेच पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांतही पुढील तीन ते चार दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना,हिंगोलीआणि परभणी जिल्ह्यांसह विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती तसेच नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातील चांगला पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून सरासरी १६५ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा जून अखेर सरासरी १४८.६ मिलीमीटर म्हणजेच ९० टक्के पाऊस झाला आहे.तसेच जुलै महिन्यात राज्यातील बहुतांश बागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे.त्यामुळे जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »