कोंबड्यांना संधिवात होण्याची कारणे, लक्षण व उपचार
संधिवात हा आजार अंडी देणाऱ्या तसेच मांसल कोंबड्यांमध्ये दिसून येतो. या रोगामुळे कोंबड्यांची दहा ते पंधरा टक्के मरतुक होते त्यामुळे पोल्ट्रीधारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. पोल्ट्रीधारक पक्षांना जीवनसत्व ड पुरवठा जास्त प्रमाणात करतात पण जीवनसत्व अ पुरवण्याकडे दुर्लक्ष झाल्यावर कोंबड्यांमध्ये संधिवात आजार दिसून येतो.ब्रॉयलर कोंबडीमध्ये हा रोग सामान्य आसून या रोगामुळे कोंबडी दिवसभर एक जागा सोडत नाहीत व जास्त काळ उभे राहू शकत नाही.जाणून घेऊया संधिवाताचे कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार.
संधिवात होण्याची कारणे
संधिवात हा रोग प्रामुख्याने दोन प्रकारात आढळतो पहिल्या प्रकारामध्ये उदर पोटातील अवयवाच्या बाह्य आवरणाखाली मुख्यत्वे करून मूत्रपिंडामध्ये युरियाचे क्षार जमा होता आणि दुसऱ्या प्रकारात हाडांच्या सांध्यात युरियाचे क्षार जमुन हालचालीला प्रतिबंध होतो. मांसल कोंबड्याच्या खाद्यात जास्त कॅल्शियम झाल्याने तसेच जड क्षारयुक्त पाणी पिण्यास दिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो. जीवनसत्व अ चे प्रमाण कमी झाल्याने व खाण्याचा सोडा जास्त प्रमाणात पक्षांना दिल्यामुळे हा रोग होत आहे. अनुवंशिकतेमुळे देखील या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे समजून आले आहे.
संधिवाताचे लक्षण व उपचार
रोगाची लक्षणे – या रोगामुळे पक्षांची हालचाल कमी होते व तेखाद्य व पाणी कमी पितात.
पक्षांचे पंख विखुरलेले असतात व मलूल दिसतात.
पोटाचे व मांडीचे स्नायू पाण्याच्या कमतरतेमुळे कातडीला चिकटलेले असतात.
कोंबडी दिवसभर एक जागा सोडत नाहीत.
संधिवातावर उपचार – कोंबड्यांमध्ये संधिवात आढळून आल्यास पशुवैद्यक तज्ञाकडून उपचार करावा व उपचारांमध्ये सहाय्यक औषधांचा वापर वाढवावा.
खाद्य व्यवस्थापनात असलेल्या त्रुटी दूर कराव्या.
खाद्यातील प्रथिनांच व क्षारांचे प्रमाण कमी करावे जेणेकरून मूत्रपिंडावर जास्त ताण पडणार नाही.
सौजन्य : ॲग्रोवन