दिघवद शाळेत पालक मेळावा संपन्न
कैलास सोनवणे: आज दिनांक -१३ जून २०२३ रोजी जि. प. शाळा दिघवद येथे सरपंच सौ वाल्याबई पवार यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळावा संपन्न झाला.वर्गनिहाय प्रतिनिधित्व देऊन पालकांमधून सदस्य निवड करण्यात आली.
तसेच सर्व सदस्यांमधून अमर सोपान मापारी यांची अध्यक्ष तर गोविंद मापारी यांची उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रकाश बंजारा यांनी केले.प्रसंगी माजी सरपंच उत्तम झालटे राजाराम मापारी कैलास पगार आत्ताचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक गांगुर्डे मुख्याध्यापिकाअलका बोरसे उपशिक्षिका संगिता महाले धिरज पवार सर उपस्थित होते उपस्थित होते.
यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अमर मापारी व उपाध्यक्ष गोविंद मापारी यांचा सत्कार ग्रामपंचायत सरपंच वालयाबाई पवार व संचालक मंडळांनी केला तसेच दिघवद सोसायटीचे अध्यक्ष नारायण गांगुर्डे यांनी वसंचालकांनी केला यावेळी आनंदा गांगुर्डे राजाराम मापारी किरण मापारी किशोर मापारी मोतीराम पवार रमण मापारी नामदेव मापारी बंटी बारगळ सुनील मापारी योगेश मापारी बंडु मापारी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते