मधुमक्षिकापालन व्यवसाय कसा सुरु करावा

0
Madhmashi

मधुमक्षिकापालन व्यवसाय कसा सुरु करावा?

नैसर्गिक मध मिळवण्यासाठी मधमाश्या पाळणे यालाच म्हणतात मधुमक्षिकापालन. मध चवीला अतिशय मधुर असते तसेच त्याचा उपयोग औषधी म्हणूनही केला जातो. आरोग्य चांगले राहावे यासाठी काही लोक दुधात मध मिसळून पितात. तोंड आलेले असेल तर मध देतात. ते इतके पौष्टिक असते की बाळाला जन्म झाल्यानंतरसुद्धा देतात. आपल्या दैनंदिन जीवनात मधाचे अनेक फायदे बघायला मिळतात. आपण मार्केटमधून मध खरेदी करतो पण ते शुद्ध असेलच याची खात्री देता येत नाही. बरेच लोक त्यात गूळ किंवा साखरेचा पाक मिसळतात. कधी कधी आपल्याला मधाची तातडीची गरज पडते पण ते आपल्याकडे उपलब्ध नसते. 


आपल्या मनात असाही प्रश्न येतो की मध बनते कसे? मार्केटमध्ये मधाला प्रचंड मागणी आहे परंतु त्याचा पुरवठा कमी आहे. शेतकरी बांधवांसाठी हे क्षेत्र इतके उपयुक्त आहे की यात अजिबात स्पर्धा नाही. मधुमक्षिकापालनमधून आणखी एक दुय्यम उत्पादन मिळते, ज्याची मार्केटमध्ये खूप मागणी आहे आणि ते म्हणजे मेण, ज्यापासून मेणबत्ती तयार करतात. म्हणजे व्यवसाय एक आहे पण त्याचे फायदे अनेक आहेत. नवोदित व्यावसायिकांना ही एक सुवर्णसंधी आहे, कमी गुंतवणूक करून व कमी कालावधीत भरपूर उत्पन्न कमवू शकतात.

मधुमक्षिकापालन सुरु करण्यासाठी मूलभूत आवश्यकता-

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठ्या, मोकळ्या जागेची गरज असते, जिथे तुम्हाला पेट्या ठेवता येतील. मधमाश्या पेट्या किती संख्येत आहेत, त्यावर जागेचा आकार अवलंबून असतो. तुम्ही २०० ते ३०० पेट्या ठेवणार असाल, तर तुम्हाला अंदाजे ४००० ते ५००० स्क्वेअर फुट एवढी जागा लागेल. जागेचा प्रश्न सुटला की मधमाश्या ठेवण्यासाठी पेट्या खरेदी कराव्या लागतात. मधमाश्या वेगळ्या खरेदी कराव्या लागत नाहीत, त्या त्यातच असतात. या उद्योगात शेतकरी विदेशी मधमाश्याही खरेदी करू शकतात, ज्यांचं मध बनवण्याचं प्रमाण जास्त असतं. यामध्ये एपिस मेलीफेरा, एपिस फ्लोरिया, एपिस दोरसाला, एपिस इंडिका अशा प्रजाती येतात. एपिस मेलीफेरा सर्वांत जास्त मध देणारी आणि अंडे देणारी मधमाशी मानली जाते. ही प्रजात खरेदी करणेही फायदेशीर असते. या लघु उद्योगाला साहाय्य म्हणून सरकारकडून आपल्याला २ ते ५ लाख रुपये कर्जही मिळू शकते. याव्यतिरिक्त या व्यवसायासाठी चाकू, रिमुव्हिंग मशीन आणि मध गोळा करण्यासाठी ड्रमची गरज असते. यानंतर मध काढणाऱ्या मशीनची गरज असते, ज्याची किंमत २५००० ते ३०००० असते.

मधुमक्षिकापालन व्यवसाय सुरु करण्याचे प्रशिक्षण कसे घ्यावे?

आपल्या देशात लाखो तरुण बेरोजगार आहेत. बेरोजगार लोक हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू इच्छित असतील तर तुम्ही सरकारकडून दिले जाणारे प्रशिक्षणही घेऊ शकतात. भारत सरकारच्या सेन्ट्रल बी रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटकडे जाऊ शकता किंवा   https://nbb.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊनही तुम्ही विविध माहिती जाणून घेऊ शकता. हे प्रशिक्षण घेतल्यावर तुम्ही हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवू शकता. केवळ ३००० ते ५००० एवढे नाममात्र शुल्क भरून तुम्ही मधुमक्षिकापालन करण्याचे उत्तम प्रशिक्षण घेऊ शकता.

मधुमक्षिकापालन केव्हा आणि कुठे करावे?

मधुमक्षिकापालन करण्यासाठी सर्वोत्तम कालावधी जानेवारी ते मार्च आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा असतो. ज्याठिकाणी मधुमक्षिकापालन करायचे आहे, ती जागा अतिशय स्वच्छ व नीटनेटकी असायला हवी. जिथे फुलांची शेती असेल तिथे मधुमक्षिकापालन व्यवसाय बहरतो, कारण मधमाश्या जितक्या फुलांमधून रस शोषतील, तेवढे उत्तम दर्जाचे मध प्राप्त होते.

मध कसे गोळा करावे?

शेतकरी बांधवांनी सर्वांत आधी हे बघणे महत्त्वाचे आहे की मधमाश्या मध जिथे गोळा करतात, ते पोळे मधाने पूर्ण भरलेले आहे की नाही. पोळ्यांत मध व्यवस्थित जमा झाले असेल तर ते काढतांना दक्षता घ्यावी. ज्याठिकाणी पदार्थ जमा झाले असतील, ते चाकूने वेगळे करावेत. जो माल तुम्ही वेगळा केला आहे, त्याला यंत्रात जमा करावा. यानंतर यंत्र सुरु कराल तेव्हा त्या पदार्थांमधून मध वेगळे होऊन अपोआप बाहेर पडेल. काढलेले मध चांगल्या पद्धतीने साठवून ठेवावे. मागणीनुसार तुम्ही मध साठवून ठेवू शकता. यंत्रातून मध काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे.

मधुमक्षिकापालन करून किती नफा कमवू शकता?

मधमाश्या पाळण्याच्या एका पेटीची किंमत सुमारे ३५०० रुपये असते. एका पेटीत १० फ्रेम्स असतात. एका फ्रेममध्ये २५० ते ३०० मधमाश्या राहतात. एका फ्रेममधून २०० ग्रॅम मध काढले जाते. याचा अर्थ, एका पेटीतून आपण २ किलो मध काढू शकता. फ्रेम्स रिकाम्या झाल्या की १० ते १५ दिवसांच्या कालावधीत मधमाश्या पुन्हा पेटीतील फ्रेम्स मधाने भरून टाकतात. एका महिन्यात एका पेटीतून आपण ४ किलो मध प्राप्त करू शकता. ७ लाख रुपयांच्या पेट्या विकत आणल्यावर एका महिन्यांत आपण १२०० किलो मधाचे उत्पादन करू शकता. तुम्ही मध मार्केटमध्ये ८० रुपये ते १०० रुपये किलो या हिशेबाने विकू शकता. अशा तऱ्हेने, आपण एका महिन्याला १,१५,००० रुपये किमतीचे मध विकू शकता. याशिवाय, तुम्ही मार्केटमध्ये मेणही विकू शकता. सर्व खर्च वजा जाता, शेतकरी महिन्याला ७०००० ते ८०००० रुपये कमवू शकतो.

मधुमक्षिकापालन व्यवसायातील मध व मेण ही उत्पादने कुठे विकावीत?

मधुमक्षिकापालनमधून आपल्याला मुख्यतः मध व मेण मिळते. प्रत्येक शहर व गावाला मधाची गरज असते. तेथील प्रत्येक जनरल स्टोर्सवर तुम्ही हे विकू शकता. यातून तुम्ही आपल्या व्यवसायाचा जास्तीत जास्त प्रचार करू शकता. असे बरेच खाद्यपदार्थ आहेत की ज्यामध्ये मधाचा वापर केला जातो. ज्या कंपन्या असे खाद्यपदार्थ बनवतात त्यांना ही तुम्ही मध विकू शकता. खूप कंपन्या अशाही असतील की त्या तुमच्या मधाला त्यांचे लेबल लावून विकतील. त्यांनाही तुम्ही मध विकलं तरी हरकत नाही. कारण याचे दोन फायदे आहेत. आपले मध चांगल्या दरात विकले जाते व एखाद्या मोठ्या कंपनीमुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. यामुळे मार्केटमध्ये आपले गुडविल तयार होते. तुम्ही स्वतः मध आणि मेण विकू शकता, पण त्यासाठी खर्च जास्त लागेल. पण महत्त्वाकांक्षी असाल तर थोडी रिस्क घेऊन तुम्ही श्रीमंत होऊ शकता.

पावसाळा ऋतूत मधमाश्यांची कशी काळजी घ्याल?

पावसाळ्यात मधुमक्षिकापालन करण्यासाठी अशी जागा निवडावी की जिथे पाणी जमा होणार नाही. साखरेचे पाणी उकळून त्यामध्ये बी-कॉम्प्लेक्स कॅप्सूल आदि औषधी मिसळून ठेवून दिल्यास मधमाश्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पावसाळ्यांत अधून-मधून स्वच्छ ऊन असते, तेव्हा पेट्यांतून फ्रेम्स बाहेर काढाव्या. योग्य साफसफाई केल्यावर त्यांना ऊन दाखवावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »