काजी सांगवी विद्यालयात पालकशिक्षक संघाची स्थापना

0

काजीसांगवीः(उत्तम आवारे) - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या काजीसांगवी येथील कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दौलतराव ठाकरे हे होते.. व्यासपीठावर उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाबुराव सोनवणे,प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर.सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, पर्यवेक्षक सुभाष पाटील,पत्रकार बंधू दशरथ ठोंबरे,बाबासाहेब ठाकरे आदि उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२३- २४ या वर्षातील पालक - शिक्षक संघाची स्थापना विद्यालयात करण्यात आली . विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालक व शिक्षक यांचा योग्य समन्वय असणे अतिशय आवश्यक आहे . काजीसांगवी विद्यालयात स्थापन करण्यात आलेला पालक -

शिक्षक संघ पुढीलप्रमाणे -

●अध्यक्ष- चित्तरंजन न्याहारकर
●उपाध्यक्ष- शंकर सोनवणे
●सहसचिव- विनायक ठाकरे
●सचिव – मोतीराम काळे
तसेच सदस्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विद्यालयाचे प्राचार्य मार्गदर्शन करताना म्हणाले मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या काजीसांगवी विद्यालयाचे कामकाज शिस्त,गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रींवर चालते. पालक व शिक्षक यांच्यामध्ये समन्वय असणे अतिशय महत्त्वाचे आहे. याबाबत आपले कर्तव्य व जबाबदारी आपणास समजणे आवश्यक आहे. शालेय गुणवत्ता वाढ व शालेय शिस्त राखण्यासाठी आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे आणि काही समस्या निर्माण होत असतील तर त्या सोडवण्यासाठी पालकांनी शाळेला सहकार्य करणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे. पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील दुवा म्हणजे पालक-शिक्षक संघ होय.त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आहार, वर्तन, अभ्यास, शिस्त, हजेरी या बाबीकडे देखील कटाक्षाने पालकांनी लक्ष देणे अपेक्षित आहे.पालक संघामध्ये निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्येष्ठ शिक्षक माणिक कुंभार्डे यांनी केले.

फोटो - काजीसांगवी येथील हायस्कूलमध्ये पालक - शिक्षक संघाची कार्यकारिणी निवडतांना उपस्थित सर्व मान्यवर...........

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »