देवरगाव विद्यालयात माता पालक व विशाखा समितीची सभा संपन्न
चांदवड (दशरथ ठोंबरे)::- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या योगिराज हरेकृष्ण बाबा जनता विद्यालय देवरगाव येथील हायस्कूलमध्ये माता पालक शिक्षक संघ व विशाखा समिती कार्यकारिणी निवड व सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.लताबाई शिंदे होत्या. व्यासपीठावर मुख्याध्यापक दिलीप सावंत उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षिका संगिता गांगुर्डे यांनी माता पालक संघ व विशाखा समिती स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला.
शैक्षणिक वर्ष 2023 – 24 या वर्षातील माता पालक शिक्षक संघ व विशाखा समिती कार्यकारिणीची निवड विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. त्यात पुढील प्रमाणे कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
● माता पालक शिक्षक संघ-
अध्यक्ष -दिलीप सावंत (मुख्याध्यापक)
उपाध्यक्ष- सुरेखा ज्ञानेश्वर गोसावी
सचिव- संगिता गांगुर्डे
● माता पालक शिक्षक संघ सदस्य-
इयत्ता पाचवीसाठी-मीरा योगेश शिंदे
इयत्ता सहावीसाठी.-सीमा संदीप शिंदे
इयत्ता सातवीसाठी -जयश्री गोविंद शिंदे
इयत्ता आठवीसाठी- सोनिका वसंत शिंदे
इयत्ता नववीसाठी – गायत्री जगन्नाथ शिंदे
इयत्ता दहावीसाठी -सुरेखा राजेंद्र शिंदे
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
● तसेच विशाखा समिती कार्यकारिणी-
अध्यक्ष-दिलीप सावंत (मुख्याध्यापक)
उपाध्यक्ष-.सखुबाई सावकार (आरोग्य सेविका)
सचिव – निर्मला खांगळ.
विशाखा समिती सदस्य-धनश्री शिंदे,उषा देसाई, निर्मला हिरे,रंजना क्षीरसागर, जयश्री क्षीरसागर, कविता जाधव,सुनिता गटकळ.
यांची निवड करण्यात आली.माता पालक शिक्षक संघ व विशाखा समिती यांच्या निवड झालेल्या सर्व सदस्य व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यात आले व माननीय मुख्याध्यापक दिलीप सावंत यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक मनोगतात दिलीप सावंत म्हणाले की, मातांना त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पूर्ण कल्पना देऊन त्यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या विकासाला हातभार आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सर्वांगीण विकास साधणारा संघ म्हणजे माता पालक होय. शालेय शिक्षण प्रक्रियेत मातांना सहभागी करून घेण्यासाठी शाळेद्वारे निर्माण केलेले अनौपचारिक रचनात्मक संघटन म्हणजे माता पालक संघ होय याद्वारे आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आलेख आपणास समजण्यास मदत होते आणि म्हणूनच आजच्या या शुभ दिनी आपण या माता पालक संघ तसेच विशाखा समितीची स्थापना आज केलेली आहे आणि आपले सहकार्य निश्चित आम्हाला मिळणार आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांचे आहार, वर्तन, अभ्यास ,शिस्त ,हजेरी या बाबींकडे देखील आपण कटाक्षाने लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम देखील त्यांनी विशद केले आपला पाल्य आणि आमचा विद्यार्थी हा देशाचा आदर्श नागरिक घडावा यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घ्यायचे आहे असे देखील ते आपल्या मनोगतात म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला खांगळ यांनी केले व कार्यक्रमाचे आभार संगिता गांगुर्डे यांनी मानले.