Crop Insurance : कापूस, सोयाबीनला ५० हजारांचे विमा संरक्षण

0

पीकविमा योजनेअंतर्गत सोयाबीन व कापूस या पिकांना ५० हजारांचे पीकविमा संरक्षण मिळणार आहे.

पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.तसेच जिल्ह्यात ओरिएण्टल इंन्शुरन्स या कंपनीची पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत नियुक्ती केली आहे.

भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृणधान्य व कडधान्य तसेच भुईमूग, कारळा, सोयाबीन ही गळीत धान्य पिके आणि कापूस खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील.या योजनेमध्ये परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे,दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट या बाबींचा समावेश आहे.३१ जुलै पीकविमा भरण्याची अंतिम तारिख आहे.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम

पीक रक्कम (रुपये प्रति. हेक्टर)

मका ३५ हजार ५९८

कापूस ५० हजार

सोयबीन ५० हजार

बाजरी २७ हजार ५००

तूर ३६ हजार ८००

मूग २२ हजार ५००

स्रोत – ॲग्रोवन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »