देवरगाव विद्यालयात रंगली निवडणुक रणधुमाळी :Digital Election

0


चांदवड( दशरथ ठोंबरे):– मराठा विद्या प्रसारक समाज संस्थाचे चांदवड तालुक्यातील योगीराज हरे कृष्ण बाबा जनता विद्यालय देवरगाव विद्यालयात मुख्याध्यापक दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत वोटिंग मशीन या अँड्रॉइड ॲप्स चा वापर करून त्याच्या साह्याने मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली.

भारत हा जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही शासन पद्धती असलेल्या प्रजासत्ताक देश आहे. आपण गावापासून ते देशापर्यंतचा कारभार पाहण्यासाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया राबवित असतो. याच पध्दतीने देवरगाव विद्यालयात 12 पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 12पदासाठी 27 विद्यार्थी उमेदवार रिंगणात उतरले होते. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या पद्धतीने ईव्हीएम चा वापर करून पार पडतात. त्याच पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. सदरील निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण महाले यांनी काम पाहिले. शेवटी क्लोज बटन दाबून मतदान प्रक्रिया संपली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेतील उपशिक्षक शामराव पगार व तात्यासाहेब बोरसे यांनी काम पाहीले त्याच दिवशी मतमोजणी करुन निकाल जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत इयत्ता दहावीतील विदयार्थीनी समीक्षा शिंदे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने प्रंतपधान पदासाठी त्या विजयी झाल्या. तर उपपंतप्रधान पदासाठी आयुष राजेंद्र कुरणे अर्थमंत्री पदासाठी ओम योगेश कुशारे शिस्त मंत्रीपदासाठी संज्योती रामदास सोनवणे क्रीडा मंत्रीपदासाठी-ओम नाना जाधव
शिक्षण मंत्रीपदासाठी स्वरूप ज्ञानेश्वर शिंदे सहल मंत्रीपदासाठी नम्रता जगन्नाथ शिंदे स्वच्छता मंत्रीपदासाठी कृष्णा जगन्नाथ शिंदे
सांस्कृतिक मंत्रीपदासाठी आदिती शरद भवर परिपाठ मंत्री पदासाठी मानसी शरद हिरे वृक्ष संवर्धन मंत्रीपदासाठी कृष्णा शांताराम शिंदे आरोग्य मंत्रीपदासाठी ओमकार सुनील शिंदे .आदी उमेदवार सर्वाधिक मते मिळवत उमेदवार विजयी झाले .
निकाल नंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया कशी असते .व ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करावे. हे प्रत्यक्ष अनुभवा द्वारे विद्यार्थ्यांना प्रथम प्रात्याक्षित देण्यात आले. सदरील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक राहुल दाते,दिलीप गायकवाड , गोविंदा डुकरे, वेणुनाथ गायकवाड यांनी नियोजन व आयोजन केले. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी दत्तू ठोंबरे, संगीता गांगुर्डे, निर्मला खांगळ ,संजय जाधव, नवल देवरे, दीपक जेऊघाले, स्वप्निल ठाकरे, यशवंत चौधरी, आदिनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »