‘ नाशिक रन ‘ चॅरिटेबल ट्रस्ट ची संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाहेगाव साळ विद्यालयास भेट.

0

(उत्तम आवरे) : महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्था संचलित

 संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाहेगाव साळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक. 

 ‘ नाशिक रन ‘ चॅरिटेबल  ट्रस्ट ची विद्यालयास भेट. 

 आज दिनांक 17 मे 2023 रोजी नाशिक रन चॅरिटेबल 

 ट्रस्टचे पदाधिकारी मा. श्री प्रबल रे साहेब , मा.श्री कासार साहेब,  मा. श्री अनिल दैठणकर साहेब, मा.श्री अशोक पाटील साहेब, व मा. श्री देशमुख साहेब यांनी आज विद्यालयास भेट दिली. 

 याप्रसंगी यापूर्वी नाशिक रन चॅरिटेबल  ट्रस्ट तर्फे विद्यालयास जे काही आर्थिक सहाय्य करून त्यातून शाळेसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जसे की, इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम , प्लास्टर , फरशी , इमारतीचे रंगकाम, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, शाळेत येणाऱ्या मुलींसाठी सायकल, तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्य , शाळेसाठी वॉल कंपाऊंड, तसेच फर्निचर , त्याचबरोबर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे ,संगणक यासारख्या अनेक सोयी सुविधा नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट ने आर्थिक सहाय्य करून उपलब्ध करून दिल्या त्या सोयी सुविधांची विद्यालयातर्फे जोपासना व्यवस्थितरित्या होते आहे किंवा नाही यासाठी नाशिक रन चॅरिटेबल टेबल ट्रस्टच्या  पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन निरीक्षण केले. याप्रसंगी नाशिक रन चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांनी  विद्यालयात येऊन सर्व सोयी सुविधांचे निरीक्षण केले असता समाधान व्यक्त केले व महात्मा फुले सांस्कृतिक, कला , क्रीडा व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ व विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. 

याप्रसंगी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी  सन्मा.श्री प्रबल रे साहेब यांनी शिक्षकांसोबत संवाद साधला. 

याप्रसंगी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी मा.श्री प्रबल रे साहेब यांचा सत्कार महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री एन. एस .मंडलिक साहेब यांचे हस्ते करण्यात आला. तसेच मा. श्री. कासार साहेब यांचा सत्कार  मा.श्री .बाजीराव खैरे यांचे हस्ते करण्यात  आला. तसेच मा. श्री. अनिल दैठणकर साहेब यांचा सत्कार श्री .भारतजी खैरे यांचे हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर मा. श्री. अशोक पाटील साहेब यांचा सत्कार मा. श्री .अरुण माळी यांचे हस्ते करण्यात आला. तसेच मा.श्री .देशमुख साहेब यांचा सत्कार मा. श्री पोपटराव सोमवंशी यांचे हस्ते करण्यात आला. 

 याप्रसंगी मा.श्री कासार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर  सन्मा.श्री. प्रबल रे साहेब यांनी विद्यालयातील सर्व भौतिक सोयी सुविधांची पाहणी करून आपले मनोगत व्यक्त करताना समाधान व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी याप्रसंगी महात्मा फुले सांस्कृतिक ,कला, क्रीडा व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष संचालक मंडळ व विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »