शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर
काजीसांगवीः (उत्तम आवारे)
दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे चांदवड तालुक्यामध्ये दुष्काळाच्या उंबरठ्यावर अनेक गावांमध्ये पाऊस नसल्यामुळे सोयाबीन मका बाजरी भुईमूग इत्यादी पीक सुकून जळून जात असल्याचे दिसत आहे तर कांदा रोपे लागणीला आले आहे पण पाऊस नसल्यामुळे लागवड कशी करावी हा प्रश्न मोठा पडला आहे यात त्या पिकांनाच पाणी नाही पाणी प्यायची पण हाल होणार आहे तर कांदा लागवड कोठून करायचे महागडे बीए घेऊन पिके जळून चालले आहे व आर्थिक वर्षामध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात व दुष्काळी संकट सापडणार आहे यात अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे काजी सांगवी पन्हाळे नन्हावे हिवरखेडे गंगावे विटावे पाटे रेडगाव साळसाने रायपुर इत्यादी भागांमध्ये पुरेसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर आलेला आहे