द्राक्षवेलीं च्या खरड छाटणीनंतरचे किड व्यवस्थापन (ऑक्टोबर ते एप्रिल) :

0


छाटणी नंतरचा कालावधी व वाढीच्या अवस्थेनुसार कीड नियंत्रणाचे उपाय

 • पूर्व छाटणी कालावधी
  पिठ्या ढेकूण :
  जर 5 टक्के द्राक्षवेलीवर किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास छाटणीच्या वेळी मिथोमिल 40 एसपी, 1 ग्रॅम प्रति लीटर प्रमाणात किड लागलेल्या जागेवर फवारणी घ्यावी.
  कोळी :
  जर तीव्र प्रादुर्भाव असेल तर कोळीनाशक औषधापूर्वी फक्त पाण्याची फवारणी घ्यावी ज्याद्वारे पानांवरील कोळयाच्या जाळया कमी होऊन त्यानंतर कोळीनाशक औषधाचा प्रभावीपणा दिसून येतो.
   गंधक 80 डबल्यू.डी. जी. 1.5 ते 2.0 ग्राम प्रति लीटर पाणी या प्रमाणात घेतलेली एक फवारणी किडीची संख्या कमी करण्यास मदत करते.
  खोडकिड :
  कीडबाधित द्राक्षवेलीवर एक-एक करून उपचार करणे आवश्यक आहे. वेलींवर असणारी छिद्रे तपासा, जर छिद्रे विष्टा किंवा लाकडाच्या भूश्याने भरलेली असतील तर पातळ लोखंडी गज किंवा तार यांसारखी तीक्ष्ण साधने वापरुन त्यांना स्वच्छ करा. शक्यतो ते छिद्र विस्तीर्ण करा आणि आतील खोड अळी काढून मारून टाका.
 • छाटणीनंतर 8-12 टि डोळे फुटण्याची अवस्था
   उडद्या भुंगेरे (लॅम्बडा सायहॅलोथ्रिन)
  5 सीएस. याची 0.5 मिली प्रति लीटर किंवा इमडाक्लोप्रीड 17.8 एस. एल. याची 0.30 मिली प्रति लीटर या प्रमाणात प्रतिबंधात्मक फवारणी घेणे प्रभावी आहे.
 • छाटणीनंतर १५ ते ५० दिवस
  उडद्या भुंगेरे
  आवश्यक असल्यास, लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5 सी. एस. याची 0.5 मिली प्रति लीटर किंवा इमडाक्लोप्रीड 17.5 एस.एल. याची 0.30 मिली प्रति लीटर या प्रमाणात देता येईल.
  पिठ्या ढेकूण :
  जर किडीचा प्रादुर्भाव 5 % पेक्षा कमी असेल तर किडलेल्या जागी उपाययोजना करावी अन्यथा जास्त असल्यास पूर्ण द्राक्षबागेस फवारणी घ्यावी. बूप्रोफेझीन 25 एससी याची 1.25 मिली प्रति लीटर पाणी या प्रमाणात 10 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या फायदेशीर ठरतात.
  फुलकिडे आणि तुडतुडे :
  जर फुलकिड्यांची संख्या प्रति फांदी 3 पेक्षा अधिक असल्यास, फिप्रोनिल 80 डबल्यूजी, 0.05 ग्रॅम प्रति लीटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5 सीएस 0.5 मिली प्रति लीटर किंवा इमडाक्लोप्रीड 17.8 एसएल 0.30 मिली लीटर या प्रमाणात फवारणी घेणे प्रभावी ठरते.
   वरील फवारणीत बागेतील तुडतुड्यांच्या संख्येची देखील काळजी घेतात.
  खोड किडा :
  प्रौढ भुंगेरे हे प्रकाशाकडे आकर्षित होतात, म्हणून बागेमध्ये प्रकाश सापळे हे प्रति हेक्टरी एक या प्रमाणात विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये प्रतिस्थापित केल्याने प्रौढ भुंगेऱ्यांना पकडणे शक्य होते. प्रकाश सापळे द्राक्षबागेपासून 15 फूट दूर व 3 फूट उंचीवर लावावेत.
 • जून ते ऑक्टोबर दरम्यान
  चाफेर भुंगेरा :
  प्रादुर्भाव आढळून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 सीएस याची 0.5 मिली प्रति | लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी त्यामुळे प्रौढ़ चाफेर भुंगेरे मारण्यास मदत होते. खोड किडीसाठी लावलेल्या प्रकाश सापळ्यांचा चाफेर भुंगेरे नियंत्रित करण्यासाठीही उपयोग होतो.
  पिठ्या ढेकूण :
  खोडाची व ओलांड्याची साल काढून त्यांना मिथोमिल 40 एसपी 1 ग्रॅम प्रति लीटर पाणी याने धुवून घेतल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
  अळया :
  खोडकिड्यांसाठी लावलेले प्रकाश सापळे हे प्रौढ पतंग नियंत्रित करण्यास मदत करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »