द्राक्ष फळ छटणी नंतरचे कीड व्यवस्थापन (ऑक्टोबर ते मार्च)

0
  • नवीन फुटी निघणे अवस्था
    उडद्या मुंगेरे
    लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 सीएस 0.5 मिली/लीटर किंवा इमडाकोप्रीड 17.8 एसएल 0.30 मिली/लीटर या प्रमाणात प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी.
  • छाटणी नंतर १२ – ३० दिवस
    फूल किडे
    जर फूल किड्यांची संख्या 2 पेक्षा अधिक प्रति फांदी इतकी असेल, तर फिप्रोनिल 80 डबल्यू. जी. 0.05 ग्रॅम/लीटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 सीएस 0.5 मिली / लीटर किंवा इमडाकोप्रीड 17.8 एसएल 0.30 मिली / लीटर या प्रमाणात फवारणी घ्यावी.
    तुडतुडे
    प्रकाश सापळे एक सापळा प्रति हेक्टर या प्रमाणात ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात स्थापित करावेत, ज्याद्वारे प्रौढ तुडतुड्यांचा बंदोबस्त होऊ शकतो. प्रकाश सापळे द्राक्षबागेपासून 15 फूट दूर व 3 फूट उंचीवर लावावेत.
  • ३१ – ५० दिवस
    फूलकिडे :
    जर 2 फूलकिडे प्रति फांदी आढळले तर फिप्रोनिल 80 डबल्यू. जी. 0.05 ग्रॅम / लीटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5 सीएस 0.5 मिली / लीटर किंवा इमॅमेक्टिन बेन्झोएट 5 एसजी 0.22 ग्रॅम/लीटर किंवा इमडाक्लोप्रीड 17.8 एसएल 0.3 मिली / लीटर या प्रमाणात फवारावे.
    तुडतुडे :
    फूलकिड्यांच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेली किटकनाशके बागेमधील तुडतुड्यांची संख्या देखील नियंत्रित ठेवतात.
    पिठ्या ढेकूण :
    पिठ्या ढेकूण किडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल याची आळवणी 1.5 मिली प्रति लीटर प्रति झाड या प्रमाणात देणे उपयुक्त ठरते.
    अळ्या
    क्लोरोपायरीफॉस (०.०८%) किंवा कार्बारील फवारणी करून सुरवंटांना प्रभावीपणे नियंत्रित करता येते. (0.125%) किंवा डायक्लोरोवोस (0.1%). मेथोमाईल (०.०५%) आणि ओले सल्फर (०.२%) यांचे मिश्रण आहे.वाढीच्या तरुण अवस्थेत अळ्या नियंत्रित करण्यासाठी प्रभावी. फेरोमोन सापळ्यांचा वापर प्रभावी आहे.
  • ५० – ७५ दिवस
    पिठ्या ढेकूण :
    जर या किडीच्या प्रादुर्भाव 5 % पेक्षा जास्त आढळून आल्यास बूप्रोफेझीन 25 एस.सी. याच्या 10 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या 1.25 मिली प्रति लीटर पाणी या प्रमाणात घ्याव्यात त्याद्वारे किडीचे योग्य व्यवस्थापन होऊ शकते
     
    फुलकिडे
    इमामेक्टिन बेन्झोएट 6 एसजी, 0.22 ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. (जर फुलकिड्यांची संख्या 2 किडे प्रति घड किंवा फांदी या प्रमाणात आढळल्यास या काळात शेंड्यांची सक्रिय वाढ दिसून आल्यास ती खडून काढावी हवाद्वारे किडींची संख्या आटोक्यात आणता येते.
    कोळी
    पाण्याचा ताण असणाऱ्या द्राक्षबागेत कोळ्यांचे प्रमाण अधिक आढळून येते म्हणून पुरेसा पाणी पुरवठा बागेस द्यावा. किडींचा तीव्र प्रादुर्भाव असल्यास कोळीनाशक औषधापूर्वी पाण्याची फवारणी घ्यावी त्यामुळे पानांवरील कोळ्याच्या जाळ्या कमी होऊन कोळीनाशक औषधाचा प्रभाव वाढण्यास मदत होईल. गंधक 80 डब्ल्यू. डी. जी. 1.5 ते 2.0 ग्रॅम/लीटर या प्रमाणात घेतलेली फवारणी कीड नियंत्रणात ठेवण्यास प्रभावी ठरते.
  • ७० – ९० दिवस
    पिठ्या ढेकूण
    जर या किडीच्या प्रादुर्भाव 5 % पेक्षा जास्त आढळून आल्यास बूप्रोफेझीन 25 एस.सी. याच्या 10 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या 1.25 मिली प्रति लीटर पाणी या प्रमाणात घ्याव्यात त्याद्वारे किडीचे योग्य व्यवस्थापन होऊ शकते (पिठ्या ढेकूण किडीचे व्यवस्थापन मण्यांमध्ये पाणी भरण्याच्या अवस्थेपूर्वी करणे गरजेचे आहे. या अवस्थेनंतर व्यवस्थापन करणे अत्यंत कठीण आहे.)
    कोळी :
    किडींचा तीव्र प्रादुर्भाव असल्यास कोळीनाशक औषधापूर्वी पाण्याची फवारणी घ्यावी त्यामुळे पानांवरील कोळ्याच्या जाळ्या कमी होऊन कोळीनाशक औषधाचा प्रभाव वाढण्यास मदत होईल. गंधक 80 डब्ल्यू. डी. जी. 1.5 ते 2.0 ग्रॅम/लीटर या प्रमाणात
    फुलकिडे
    इमामेक्टिन बेन्झोएट 6 एसजी, 0.22 ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. (जर फुलकिड्यांची संख्या 2 किडे प्रति घड किंवा फांदी या प्रमाणात आढळल्यास या काळात शेंड्यांची सक्रिय वाढ दिसून आल्यास ती खडून काढावी हवाद्वारे किडींची संख्या आटोक्यात आणता येते.
  • ९० दिवसांच्या पुढे
    किटकनाशकांचा पूर्व हंगाम कालखंड (पी. एच. आय.) नियंत्रित ठेवावा आणि एका हंगामात एका किटकनाशकाच्या दोनपेक्षा अधिक फवारण्या घेऊ नयेत.
    कोळी
    गंधक 8 डब्ल्यू डी जी 1.5 ते 2.0 ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणात घेतलेली फवारणी प्रभावीपणे कीड नियंत्रित करते. सदर फवारणीपूर्वी सकाळच्या वेळेत पाण्याची फवारणी 1000 लीटर प्रति एकर या प्रमाणात घ्यावी, ज्याद्वारे पानांवरील कोळी तसेच त्यांच्या जाळ्या निघून जातील.
     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »