काजीसांगवी विद्यालयात कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन
काजीसांगवी विद्यालयात कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन………
काजीसांगवी(उत्तम आवारे) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर,मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, पर्यवेक्षक सुभाष पाटील जेष्ठ शिक्षक अर्जुन आहेर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिक्षक मनोगतातुन जेष्ठ शिक्षक माणिक कुंभार्डे यांनी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतातुनन्याहारकर सर यांनी एक शेतकरी कुटुंबात ४ एप्रिल १९४८ मध्ये जन्म घेतलेली व्यक्तीमत्व अभ्यासातिल असणारी हुशारी मुळे पुणे,नाशिक या ठिकाणी आपले शिक्षण त्यांनी पुर्ण करुन अनेक सामाजिक व राजकीय कार्यात आपला आगळा वेगळा ठसा उमटवला. मविप्र संस्थेचे सरचिटणीस पदावरती काम करत असताना शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रीच्या माध्यमातून आपले कार्य त्यांनी पुर्ण केले.सलग १३ वर्षे अतिशय कल्पकतेने व सेवाभावी वृत्तीने संस्थेचे कार्य त्यांनी केले हे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान कोल्हे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.