थंडीत घ्या त्वचेची काळजी..
हिवाळ्यात त्वचेचे रक्षण करण्यासाठी खास टिप्स…!

0

थंडीत आपल्या त्वचेतील ओलावा कमी होतो.कडाक्याची थंडी आणि कोरडेपणा यामुळे त्वचेचे सौंदर्य बाधित होत आहे.या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे खुप गरजेचे असते.हिवाळ्यात त्वचा सॉफ्ट राहण्यासाठी त्वचेला सूट होईल अशीच क्रीम अथवा बॉडीलोशन वापरावे.

थंडीत कडक पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा जास्त ड्राय पडू शकते. त्यामुळे शरीराला मानवेल एवढे गरम पाणी आंघोळीसाठी घेतले जावे.

थंडीमध्ये त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी करा हे घरगुती उपाय:

हळद (Turmeric) भारतीय स्किन टोनसाठी सर्वात प्रभावी, स्वस्त आणि घरगुती उपचारांपैकी एक आहे. रोज कामासाठी बाहेर पडल्यावर उन्हामुळे त्वचेचा रंग डल पडतो. तर कधी थंडीमुळे कोरेडपणा, काळपटपणा येतो. नेहमी नेहमी पार्लरला जाऊन फेशियल, ब्लिच करायला सगळ्यांनाच वेळ मिळतो असं नाही. (Haldi Skin Benefits) घरच्याघरी काही सोप्या उपायांचा वापर करून तुम्ही ग्लोईंग त्वचा मिळवू शकता.

गुलाबपाणी, चंदन पावडर आणि मधात हळद मिसळून लावल्यास चेहऱ्यावर मुरुमांची समस्या राहणार नाही.

खोबऱ्याच्या तेलात मॉइश्चरायझिंग गुण असतात.थंडीत रात्री झोपताना चेहऱ्याला नारळाचे तेल लावून झोपावे. हे तेल त्वचेत मुरते यामुळे कोरडेपणा कमी होतो.

त्वचेवरील डाग दूर करणारा फेस पॅक बनवण्यासाठी ताजे दही आणि बेसनमध्ये हळद मिसळून फेस पॅक बनवा. पॅक सुकल्यावर ताज्या पाण्याने चेहरा धुवा.

थंडीच्या दिवसांमध्ये ओठांची काळजी घ्यावी. ओठ कोरडे पडल्याने त्याला भेगा पडू शकतातओठांना लोणी, दुधाची साय अथवा गावरान तूपदेखील लावू शकता.

हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होत असेल तर आठवड्यातून दोन दिवस केळीचा मास्क चेहऱ्यावर लावा. यासाठी केळी चांगले मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. थोडावेळ तसेच राहु द्या आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

हिवाळ्यात उटण वापरणे खूप फायदेशीर आहे. उटण्यामध्ये बरेच आयुर्वेदीक घटक असतात, त्यामुळे त्वचा मुलायम होते. यामध्ये दूध किंवा पाणी घालून त्याने त्वचेला मसाज केल्यास त्वचेवरची घाण आणि डेड स्किन निघून जाते.

कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी मध खूप फायदेशीर आहे. एका भांड्यात एक चमचा मध घ्या आणि स्वच्छ चेहऱ्यावर चांगले लावा.१० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »