कराडच्या मुजावर कॉलनीतील ‘त्या’ बहुचर्चित भीषण स्फोटातील जखमी ११ वर्षीय मुलीची मृत्युशी झुंज अखेर निष्फळ…
कराडच्या मुजावर कॉलनीतील ‘त्या’ बहुचर्चित भीषण स्फोटातील जखमी ११ वर्षीय मुलगी जोया शरीफ मुल्ला हिची मृत्युशी झुंज अखेर निष्फळ ठरली.
कराडच्या मुजावर कॉलनीतील ‘त्या’ बहुचर्चित भीषण स्फोटातील जखमी ११ वर्षीय मुलगी जोया शरीफ मुल्ला हिची मृत्युशी झुंज अखेर निष्फळ ठरली. आई, वडिलांनंतर जोयाचेही आज गुरुवारी उपचारा दरम्यान, निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते शरीफ मुबारक मुल्ला यांच्या राहत्या २५ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी भीषण स्फोट झाला होता. त्यात शरीफ मुल्ला यांच्यासह त्यांची पत्नी सुलताना, मुलगी जोयां आणि मुलगा सात वर्षांचा मुलगाराहत गंभीर जखमी झाले होते. या स्फोटात घटनास्थळा लगतची घरे व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर ३१ ऑक्टोंबरला शरीफ यांच्या पत्नी तर, ३ नोव्हेंबरला शरीफ मुल्ला यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. तर, त्यांच्या जखमी दोन लहान मुलांवर मिरज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यामध्ये मुलगा राहत हा बरा झाल्याने काही दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आला होता. तर जोयावर मिरज येथे उपचार सुरू होते. तिथे अखेर आज तिची मुत्युशी झुंज अपयशी ठरली.