सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या (Organic Farming Benefits)
सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या (Organic Farming Benefits
शेतीसाठी पूर्वीपासून सेंद्रिय खतांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. मात्र आधुनिक काळात अती लोकसंख्येमुळे उत्पादनाची वाढलेली मागणी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचणारा वेळ आणि रासायनिक खतांमुळे होणारे जास्त उत्पादन यामुळे सेंद्रिय पद्धतीने केली जाणारी शेती ही काळाच्या ओघात मागे पडत गेली. मात्र सध्या ग्राहक स्वतःच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत जागरुक झाले आहेत. त्यामुळे पुन्हा सेंद्रिय उत्पादनांचे महत्त्व सर्वांना पटू लागले आहे. ज्यामुळे आजकाल सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्याला चांगली मागणी आणि उत्पन्न पुन्हा मिळू लागले आहे. सेंद्रिय शेतीचे फायदे (Organic Farming Benefits In Marathi) आणि या प्रकारच्या शेतीला का प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी ही सेंद्रिय शेतीची माहिती (organic farming information in marathi) अवश्य वाचा.
जमिनीची सुपिकता राखली जाते (Fertility Of Soil Is Maintained)
चांगल्या गुणवत्तेचे धान्य हवे असेल तर जमिन तितकीच सुपीक असणे आवश्यक आहे. कीटकनाशके आणि रसायनांच्या अती माऱ्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होत जाते. हळू हळू अशा प्रकारे केलेल्या शेतीतून मिळणारे धान्य हे पोषक आणि चांगल्या दर्जाचे राहत नाही. यासाठी सेंद्रिय शेतीला (organic farming meaning in marathi) सुरूवात करण्याआधी जमिन सुपिक करणं खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे जमिनीचा सुपिकपणा वाढला तर कमी साधनसामुग्रीमध्ये आणि कमी पावसाच्या क्षेत्रातदेखील चांगली शेती करता येऊ शकते. यासाठीच जमिन कसताना रसायनांचा वापर कमी करून त्यासाठी गवत अथवा पिकांचे टाकाऊ अवशेष वापरात आणावे. सेंद्रिय आणि जैविक खतांमुळे जमिनीचा कस वाढत जातो.
जलसंधारण आणि जलसंवर्धनास मदत (Supports Water Conservation)
जलसंवर्धनाचे महत्त्व नसल्यामुळे आजकाल पाण्याची नासाडी आणि प्रदूषण होताना आढळते. शेतीसाठी आणि घरासाठी पाण्याची बचत करण्यासाठी या काही सोप्या टिप्स नक्कीच फायदेशीर आहेत. शेतकामासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्स आणि रसायनांच्या निर्मितीसाठी पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. जर सर्वांनी अट्टाहासाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले तर पर्यायाने पाण्याचे प्रदूषण ही कमी होऊ शकते. सेंद्रिय शेतीमुळे पाण्याचे प्रदूषण तर होणार नाहीच शिवाय जलसंवर्धनाचे महत्त्वही लोकांना पटू लागेल. सेंद्रिय शेती निसर्गनियमांनुसार आणि जीवसृष्टीला अनुरूप असल्यामुळे तिच्यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी प्रमाणात होते.
धन्यवाद
🙏🙏🙏