चांदवड येथे कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन
चांदवड येथे कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन
काजीसांगवी:(उत्तम आवारे) उपजिल्हा रुग्णालय चांदवड जिल्हा नाशिक येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुशिलकुमार शिंदे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ पंकज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एन .सी.डी. विभागा मार्फत आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या करिता गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि स्थनांचा कर्करोग याचे निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी एनसीडी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . अभिजित निकम व नाशिक गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या . डॉ. रुपाली निकम डॉ. संकलेचा मॅडम, डॉ. वाळवेकर मॅडम ,नामको हॉस्पिटल नाशिक उपस्थित होते. तसेच शिबीर यशस्वी करण्यासाठी इन्चार्ज स्टाफ नर्स सौ. सावंत व वंजारी, स्टाफ नर्स सौ जगताप, सौ बाबरे, सौ कदम , सौ सविता पवार यांनी परिश्रम घेतले. जवळपास २०० महिलांची तपासणी झाली त्यात 16 नमुने संदेहास्पद दिसून आल्याने त्यांना पुढील उपचारा करिता संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक येथे पाठवले जाणार आहे.