माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित,श्रीमती जे आर गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न.💐💐💐💐💐
दिघवद(प्रतिनिधी कैलास सोनवणे) :श्रीमती जे आर गुंजाळ विद्यालय चांदवड येथे प्राध्यापक संजय कोतवाल, प्राध्यापक अशोक ठोके व शिक्षकेतर कर्मचारी सुकदेव हांडगे यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲड. नितीनभाऊ ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खंडेराव आहेर हे होते.व्यासपिठावर प्रमुख पाहुणे संस्थेचे सेवक संचालक श्री जगन्नाथ निंबाळकर, प्राचार्य लोहकरे सर, पर्यवेक्षक आहेर सर,माध्यमिक, उच्च माध्यमिक व अभिनव बालविकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष,सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य लोहकरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रथम संस्थेतर्फे व विद्यालयातर्फे कोतवाल सर व सौ कोतवाल मॅडम,ठोके सर व सौ ठोके मॅडम, हांडगेमामा व सौ हांडगेताई यांचा आदरणीय सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शिक्षक मनोगतात प्राध्यापक टर्ले सर यांनी कोतवाल सर, ठोके सर व हांडगेमामा यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा व संस्थेसाठी दिलेल्या योगदानाचा परिचय करून दिला.सत्कारमूर्तींच्या वतीने प्राध्यापक हांडगेसर, प्राध्यापक कोतवाल मॅडम व अनुष्का ठोके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच कोतवाल सर व ठोके सर यांनीही मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही आपली कर्मभूमी असून या संस्थेमुळे च आज आम्ही आहोत.तिच्यामुळेच आम्हांला आज समाजात मान-सन्मान मिळाला आहे अशा शब्दात संस्थेप्रती असलेले प्रेम व संस्थेचे ऋण व्यक्त केले.आदरणीय सरचिटणीस नितीन भाऊ ठाकरे यांनी सर्व सत्कार मूर्तींना शुभेच्छा देवून संस्थेच्या प्रगतीशील वाटचालीमध्ये सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा आहे, आज मराठा विद्या प्रसारक समाज संस्था समाजात एक नामांकित व अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते त्यासाठी प्रत्येक सेवकाने आपले कार्य निष्ठेने व काळजीपूर्वक पार पाडले पाहिजे असे सांगितले.अध्यक्षीय भाषणात श्री खंडेराव आहेर यांनी ही सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा देवून जेव्हा गरज पडेल तेव्हा मदत करण्यास पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक टर्ले सर व प्राध्यापिका श्रीमती प्रिया नांदे यांनी केले.
कार्यक्रमास श्रीमती जे. आर. गुंजाळ परिवार,तालुक्यातील अनेक मान्यवर,प्राचार्य , मुख्याध्यापक, ,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.