समृध्द सार्वजनिक वाचनालये ही गावाची शान असतात.
समृध्द सार्वजनिक वाचनालये ही गावाची शान असतात.
कैलास सोनवणे (दिघवद): जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी व लेखक डॉ कैलास सलादे हे होते मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे सरचिटणीस चंद्रकांत मामा भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास जेष्ठ वाचक मधुकर सलादे कल्याण राव भालेराव नंदकुमार येशि राजेश गायकवाड ग्रंथपाल अनिल पवार माधव पाचोरकर संध्या खैरनार यांच्या सह अनेक वाचकांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली
वडनेर भैरव गावातील सार्वजनिक वाचनालयाने वाचक म्हणून मला घडवले,समृध्द केले. उभ्या आयुष्यात चार शब्द लिहिण्याचे धाडस केले त्याचे श्रेय गावातील वाचनालयालाच जाते.शाळा काॅलेजात असताना बाबा कदमांची, सुहास शिरवळकरांची, अण्णा साठे यांची पुस्तक अभ्यासाच्या पुस्तकात लपवून वाचली.ज्या वाचनालयातील पुस्तकांनी जगण्याची उमेद दिली,स्वतःचं अस्तित्वाची जाणीव दिली त्याच पाऊण शतकांची समृध्द परंपरा लाभलेल्या वडनेर भैरव येथील सार्वजनिक वाचनालयात आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून गेलो हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीयच….1956 मध्ये स्थापन झालेले आणि 25 हजारापेक्षा अधिक पुस्तकांनी समृध्द असलेल्या गावाच्या या वाचनालयाला स्वतःची इमारत नाहीये. वाचणारा वाचकही वाचनालयाकडे फिरकेनासा झाला आहे. गाव आर्थिकदृष्ट्या समृध्द आहे.महाराष्ट्रातील दुबई म्हणून गावाचा भारतभर नावलौकिक आहे.माञ नुसते आर्थिक समृध्द असून चालत नाही, ही आर्थिक समृध्दी टीकवायची असेल, स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टीकवायचे असेल तर पुस्तकांना पर्याय नाही.गावाने या सामाजिक व सांस्कृतिक वारशाची जपणूक केली पाहिजे.कारण सार्वजनिक वाचनालये ही गावाची शान असतात ही शान टिकवणे गावकऱ्यांच्या हाती आहे, ही सुबुद्धी गावाला, गावातील पुढाऱ्यांना येवो असे नम्रपणे या निमित्ताने वाटते.
सार्वजनिक वाचनालयात प्रमुख अतिथी म्हणून सन्मान करताना वाचनालयाचे सरचिटणीस व पञकार श्री.चंद्रकांत भंडारे, ज्येष्ठ वाचक मधुकर अण्णा सलादे, कल्याणराव भालेराव, नंदकुमार येशी, राजेश गायकवाड, ग्रंथपाल व पञकार अनिल पवार, माधव पाचोरकर, संध्या खैरनार व इतर ग्रंथप्रेमी मंडळी…यावेळी अमूल्य पुस्तकांचे भव्य असे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.