पाटे येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

0

पाटे येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा                           

  दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे:   पाटे ता, चांदवड  येथे  जगतगुरु शंकराचार्य जयंती व मोहिनी एकादशी या विशेष पर्व कालावर सालाबाद प्रमाणे स्वानंद सुख निवासी वै, ह.भ  प यादव स्वामी महाराज काळे  महान तपस्वी वै,ह, भ प बाळाबाबा ढगे   वै हभप रंभाजीमहाराज ठोके यांच्या आशिर्वादाने व हभप वामनांनंद महाराज काळे  वेदाचार्य वैकुंठवासी ह भ प महाराज खांगळ यांच्या कृपा छत्राखाली आचार्य ह भ प बाळकृष्ण महाराज ठोके व दामोदर महाराज ठोके यांच्या सहकार्याने

मंगळवार 25,4,2023ते  मंगळवार दि,2,5,2023  या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे वर्ष 46वे मंगळवार दिनांक 25रोजी पहाटे कलश स्थापना व विणापुजण करुन  आरंभ होईल  दररोज पहाटे भुपाळी व काकडा भजन आरती होईल तशेंच सकाळी 8ते11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी सहा ते सात सामुदायिक हरिपाठ मंगळवार दिनांक 25 रोजी  हभप समाधान महाराज भोजे  जळगाव यांचे कीर्तन तर दि,26रोजी ज्ञानेश्वर महाराज जवळेकर यांचे गुरुवार 27रोजी हभप डॉ रामकृष्ण महाराज लहवितकर शुक्रवार दि 28

 एकनाथ महाराज शास्त्री  पारनेर तर शनिवार दि29रोजीहभप ज्ञानेश्वर माऊली कदम आळंदी रविवार दि 30रोजी  हभप सागर महाराज दिंडे नाशिक सोमवार द 1रोजी अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचे कीर्तन होईल व मंगळवार दि ‌ 2रोजी सकाळी हभप बाळकृष्ण महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होईल नंतर ह भ प सुभाष आहेर यांच्याकडून महाप्रसाद होऊन कार्यक्रम सांगता होईल या कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ पाटे शिवनेरी प्रतिष्ठान मित्र मंडळ पाटे भजनी मंडळ जय बाबाजी भक्त मंडळ जय मल्हार भक्त मंडळ तुळजाभवानी भक्त मंडळ स्वाध्याय परिवार नवनाथ भक्त मंडळ बालगोपाल व महिला मंडळ पाटेहे  सहकार्य करणार आहेत या कार्यक्रमाला कोलटेक दहिवद दिघवद रेडगाव काजी सांगवी सोनी सांगवी नारायण खेडे धनगरवाडी दरसवाडी टाकळी साळसाणे  काळखोडे हिवरखेडे  चांदवड उरधुळ   वाळकेवाडी पिंपळश लासलगाव विटावे वाकी चांदवड तालुका भजणी मंडळ उपस्थित राहणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »