काजीसांगवी (उत्तम आवारे): मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या काजीसांगवी येथील कै. नरहर पंत कारभारी ठाकरे जनता माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, काजीसांगवी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सीमा वारके होत्या.व्यासपीठावर प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर,सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर,जेष्ठ शिक्षक अर्जुन आहेर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.इयत्ता ९ वी अ च्या वर्गांने सदर कार्यक्रम सादर केला. कोमल ढोमसे व काही विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता पाचवी अ च्या वर्गातील विद्यार्थिनींनी हिंदीमध्ये नाट्यसंवाद सादर केला.शिक्षक मनोगतात शितल राठोड यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य सांगितले. अध्यक्षीय मनोगतात विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वारके मॅडम म्हणाल्या, "भारतातील पहिली स्त्री शिक्षिका,भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ तसेच कवयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते .महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीत त्यांनी एक महत्त्वाचे स्थान बजावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका निंबाळकर हिने केले तर आभार श्रेया ठाकरे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक- शिक्षिका तसेच विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. फोटो - काजीसांगवी येथील विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतांना उपस्थित सर्व मान्यवर............