पाटे कोलटेक ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी योगेश खांगळ बिनविरोध
पाटे कोलटेक ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी योगेश खांगळ बिनविरोध
पाटे कोलटेक ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी योगेश खांगळ बिनविरोध काजीसांगवी:—(उत्तम आवारे) चांदवड तालुक्यातील पाटे -कोलटेक ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी योगेश खांगळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाटे कोलटेक ग्रुप ग्रामपंचायत च्या विद्यमान उपसरपंच पदी शिवसेनेचे नेते साहेबराव चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने येथील उपसरपंच पद हे रिक्त झाले होते .त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक श्रीमती व्ही .के .भालेराव यांनी सरपंच रंगनाथ सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची विशेष बैठक बोलावून त्यामध्ये उपसरपंच पदासाठी वेळेनुसार योगेश खांगळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भालेराव ,सरपंच रंगनाथ सूर्यवंशी तसेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी नवनिर्वाचित उपसरपंच योगेश खांगळ यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य साहेबराव चव्हाण, अर्जुन चव्हाण, सविता ठोके ,विलास केदारे ,अंजली खांगळ, सुनंदा ठोके, संगीता खुरसणे, मंगला तळेकर आदींसह गावातील डॉ.अजय ठोके, अनिल ठोके ,रवींद्र खांगळ, भाऊसाहेब खांगळ, आदींस ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.