राज्यात थंडीचा कडाका वाढणार!उत्तर भारत थंडीने गारठला, विदर्भात पाऊसाची शक्यता..

0

राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा तडाखा वाढण्यापूर्वीच अचानक हवामानात बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे शनिवारी विदर्भात पाऊस झाला. आता संपूर्ण महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट येण्याची भीती आहे. नागपूरसह लगतच्या भागात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. येत्या काही दिवसात चंद्रपूर, गडचिरोलीसह पूर्व विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार तसेच पंजाब व हरियाणासह उत्तर भारतातील ८ राज्यात थंडीच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या २-४ दिवसात महाराष्ट्रातही थंडीचा कडाका तीव्रतेने राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा तडाखा वाढण्यापूर्वीच अचानक हवामानात बदल पाहायला मिळत आहे. शनिवारी विदर्भात पाऊस झाला. आता संपूर्ण महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट येण्याची भीती आहे. नागपूरसह लगतच्या भागात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. येत्या काही दिवसात चंद्रपूर, गडचिरोलीसह पूर्व विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. आहे.

उत्तरेकडून येणारी थंडी अजून तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला आहे.गेल्या २४ तासांत राज्यातील सर्वात कमी म्हणजे ११ अंश सेल्सिअस तापमान जळगाव शहरात नोंद झाले. पुण्यातही तापमान १४ अंशांपर्यंत तर मुंबईत १७ अंशांपर्यंत घसरलेले आहे.दक्षिण कर्नाटकापासून पूर्व विदर्भापर्यंत असलेली कमी दाबाची रेषा कायम असून संपूर्ण राज्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तापमानात सातत्याने घट होत पहायला मिळत आहे. राज्यातील हवामान येत्या ३-४ दिवसात कोरडे राहण्याची शक्यता असून उत्तर-मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाडा तसेच कोकणातही तापमानाचा पारा खालावण्याची शक्यता असून २ ते ३ अशांनी तापमान घसरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »