हरभरा रोग व्यवस्थापन 🌱(मानकुजव्या, मर व तांबेरा रोग)

0

सुरवातीला पेरणीसाठी मर रोग प्रतिकारक जातींची निवड करावी. (उदा. विजय, विशाल, विराट, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत, जॅकी-9218, आयसीसीव्ही-10, पीडीकेव्ही कांचन, पीडीकेव्ही कनक)तसेच पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा पावडर २.५ किलो प्रति एकर या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत पसरून द्यावी.पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरची किंवा २ ग्रॅम थायरम अधिक २ ग्रॅम कार्बेडाझीमची बीजप्रक्रिया करावी.हरभरा पिकास वरचेवर पाणी देऊ नये. पिकात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
शेतामध्ये रोगग्रस्त झाडे दिसून येताच उपटून नष्ट करावीत.
प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये, कार्बेडाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.प्रादुर्भाव असलेल्या शेतात तीन-चार वर्षापर्यंत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.

तांबेरा रोगास प्रतिबंधक उपाययोजना
पेरणीसाठी तांबेरा रोग प्रतिकारक जातीच्या प्रमाणित बियाण्याचा वापर करावा. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

पेरणीस उशिरा होणार नाही, तसेच पीक जास्त दाट होणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच पिकास शिफारशीप्रमाणे संतुलित रासायनिक खतमात्रा द्याव्यात. विशेषतः नत्राचा शिफारशीपेक्षा जास्त वापर करू नये.जास्त पाण्याचा वापर टाळावा व पिकास वेळेवर व माफक प्रमाणात पाणी द्यावे.वेळेवर खुरपणी, कोळपणी करून पीक स्वच्छ व तणमुक्त ठेवावे. शेत, बांधावरील सहजीवी तण काढून टाकावीत.

कीड प्रादुर्भाव रोखण्यााकरिता नियमित सर्वेक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून जाळून अथवा गाडून नष्ट करावी.
शेतात रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, विद्राव्य गंधक (80 डब्ल्यूजी) 3 ग्रॅम किंवा मँकोझेब (75 डब्ल्यूपी) 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास, प्रोपिकोनॅझोल (25 ईसी) 1 मिलि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »