Thyroid : थायराँईड (Thyroid) साठी काही घरगुती उपाय व उपचार…

0

थायरॉईड म्हणजे काय?

थायरॉईड हे मानेच्या आत असते. थायरॉईड ही अंतःस्रावी ग्रंथी (ट्यूलेस ग्रंथी) चा एक प्रकार आहे, जी हार्मोन्स तयार करते. हा एक सामान्य दोष आहे जो पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतो.

थायरॉईडचे प्रकार

थायरॉईडचे प्रामुख्याने दोन

प्रकार आहेत:-

• हायपरथायरॉइड

• हायपोथायरॉईड

हायपरथायरॉईडीझममध्ये, थायरॉईड हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात आणि हायपोथायरॉईडीझममध्ये, हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात. थायरॉईड ग्रंथी T3 आणि T4 थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक तयार करते, ज्याचा थेट परिणाम पाचन तंत्र, हृदय गती, श्वासोच्छवास आणि शरीराचे तापमान यावर होतो.हे हाडे, स्नायू, लैंगिक, मानसिक वाढ आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. जेव्हा आपल्या शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडते, तेव्हा आपल्या शरीराचे वजन वाढू किंवा कमी होऊ लागते, ज्याला आपण थायरॉईड समस्या म्हणून ओळखतो.

चला जाणून घेऊया, थायरॉईडची उपचार काय आहेत?

उपाय…१
ऊपाशी पोटी
1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा.
1 चमचा धणे पावडर १ वेळा.
1 एक चमचा बडिसोप १वेळा.
पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी
रोज खायची 3 महिने
उपाशी पोटी.

उपाय…२

सकाळी
अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच पाणी ठेवा त्यांने थायरॉईड ग्रंथी ॲक्टिव होऊन सुरळीत काम करते.



उपाय…३

अनुलोम विलोम प्राणायाम 7 मिनिटे.
उज्जायी प्राणायाम 10 मिनीटे.
कपालभाती 10 मिनिटे.
रोज सकाळी संध्याकाळी हे प्राणायाम करा.

उपाय…४

वजन वाढले असेल तर
भोपळ्याचे (लौकी) ज्युस 20ml प्यावे.
एक ग्लास कोमट पाणी 20 मिली कोरफड ज्युस त्यात 10 तुळशीचा रस टाका.

उपाय…५

दररोज तांब्याच्या भांड्यातीलच पाणी प्यायचे.या आजारात तुम्ही कोथिंबिरीचे पाणी पिऊ शकता. कोथिंबिरीचे पाणी बनवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात १ ते २ चमचे धणे संध्याकाळी व सकाळी भिजवावे, चांगले ठेचून गाळून घ्यावे आणि हळूहळू प्यावे.

उपाय…६

नारळाच्या झाडाच्या ४ मूळ्या पेन च्या आकाराच्या घेऊन याचा काढा बनवुन रोज संध्याकाळी 21 दिवस प्यायचे.

उपाय…७

रात्री ब्रश करुन झोपा, सकाळी उठल्याबरोबर आपल्या लाळेने थायराँईड ग्रंथीला स्पर्श करुन सावकाश १० १२ वेळा चोळायचं आहे.

उपाय…८

थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशी सुती कापडाची गरम पाण्याची पट्टी करुन रात्री ३० मिनिटे ठेवायची.

उपाय…९

रोज रात्री झोपतांना सोन्याचा दागिना थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशा पद्धतीने रात्रभर ठेवा.

उपाय…१०

आपल्या आहारातुन पांढऱ्या मिठाचा वापर बंदच करुन त्या ऐवजी
सैंधव मिठ व काळ्या मिठाचा वापर करावा.

उपाय़…११

मूठभर वारुळाची माती, मूठभर कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकून माती शिजवून घ्यावी व आपल्या थायरॉईड ग्रंथी जवळ रोज रात्री झोपताना कोमट असताना 21 दिवस ठेवावे.

उपाय़…१२

थायरॉईड रुग्णांनी त्यांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा. तुम्ही दूध, दही, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकता. त्यामुळे शरीराला भरपूर कॅल्शियम, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्त्वे मिळतील.

उपाय़…१३

अति ताणतणाव आपल्या आजाराचे मुळ कारण असल्यामुळे तणावरहीत जीवन, पुरेशी झोप आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. योगा प्राणायाम ध्यान आहार याने आपला आजार आपण १०० % बरा करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »